Horticulture

महाराष्ट्रात कमी पाण्यात कोरडवाहू क्षेत्रात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकामध्ये बर्याआच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये मररोग, तेल्या रोग, फळ तडकणेइत्यादी.डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यासव माती परीक्षण याप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यासबागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.मागील काही वर्षापासून पक्व होणाऱ्या डाळिंब फळावरतेलकट चट्टे आणि फळे तडकण्याचे विकृती मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. जवळजवळ 15 ते 20 टक्के नुकसान हे फळे तडकण्याने होते. या लेखात आपण यामागील कारणे आणि उपाय योजना जाणून घेणार आहोत.

Updated on 15 July, 2021 2:26 PM IST

महाराष्ट्रात कमी पाण्यात कोरडवाहू क्षेत्रात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकामध्ये बर्‍याच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये मररोग, तेल्या रोग, फळ तडकणेइत्यादी.डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यासव माती परीक्षण याप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यासबागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.मागील काही वर्षापासून पक्व होणाऱ्या डाळिंब फळावरतेलकट चट्टे आणि फळे तडकण्याचे विकृती मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. जवळजवळ 15 ते 20 टक्के नुकसान हे फळे तडकण्याने होते. या लेखात आपण यामागील कारणे आणि उपाय योजना जाणून घेणार आहोत.

 

 फळे तडकण्याची कारणे

  • फळत अडकणे हे केवळ एकाच कारणामुळे नव्हता त्यास अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामध्ये चुकीचे पाणी व्यवस्थापन, जमिनीची निवड, हवामानातील बदल व तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी
  • अतिशय हलक्‍या जमिनीत नांगरटीच्या तासात रोपांची लागवड.
  • जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 12 टक्के पेक्षा जास्त असणे.
  • जमिनीमध्ये नत्र,स्फुरद या मुख्य अन्नद्रव्य बरोबर कॅल्शियम व मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता तसेच बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असणे.
  • हवेतील तापमान व आद्रतेत विशेषतः रात्र व दिवसातील तापमानात होणारी तफावत.
  • अवर्षणाचा सारखी परिस्थिती जास्त कालावधीसाठी राहिल्यास फळांची साल खडक होते अशा परिस्थितीत एकाएकी पाऊस पडल्यास किंवा भरपूर पाणी दिल्यास फळांच्या तडकण्याच्या प्रमाणात वाढ होते.

उपाययोजना

1-डाळींबासाठी मध्यम,निचऱ्याची जमीन निवडावी.2×2×2 फूट लांबी× रुंदी× खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये माती अधिक दोन घमेले कुजलेले शेणखत+1/2 किलो सुपर फॉस्फेट+ 50 ग्रॅम फोरेट यांचे मिश्रण करून खड्डे भरूनरोपांची लागवड करावी.

2- माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा खड्डा घेऊन प्रत्येक पहिल्या फुटातील मातीचा पहिला थर, दुसरा थर आणि तिसऱ्या पोटात माती असल्यास तिसरा तर अशा थराप्रमाणे माती घेऊन त्याचे प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.

3- माती परीक्षण अहवालाप्रमाणे सामू हा 6.5 ते 8.0पर्यंत आला असावा. विद्युत वाहकता ही 0.50 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असावी तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण सर्व थरात बारा टक्के पेक्षा कमी असावे.

4- माती परीक्षणावरून डाळिंबास शिफारस केल्याप्रमाणे पूर्ण वाढलेल्या झाडाच्या शेणखत चार ते पाच घमेले तसेच 625 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश प्रति वर्ष प्रति झाडास ताण संपल्यानंतर पहिले पाणी देण्यापूर्वी द्यावेव उर्वरित नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे. पहिली मात्रा ताण संपल्यानंतर बेसल डोस च्या वेळी व उर्वरित मात्रा 12 नंतर 45 दिवसांनी आळे पद्धतीने द्यावी.

5- जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेट द्वारे द्यावे. म्हणजे या खताद्वारे स्फुरद व्यतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा झाडांना होतो तसेच मॅग्नेशियम सल्फेट चा वापर प्रति झाड 25 ग्रॅम प्रमाणे करावा.

 

  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी द्वारे उदा. एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 25 किलो ताजे शेण+ पाच लिटर गोमूत्र+ पाच किलो फेरस सल्फेट+ पाच किलो झिंक सल्फेट + दोन किलो बोरिक ऍसिड एकत्र आठवडाभर मुरवून सातव्या दिवशी झाडांनाच स्लरी  द्यावी.
  • फुले येण्यापूर्वी व 50 टक्के फुले असताना झाडावर फुले मायक्रो ग्रेड 2या द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड  ची फवारणी करावी.
  • बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान व आद्रते  वर नियंत्रण  राहते.
  • जमिनीच्या पोटात यानुसारच पाण्याचे नियोजन करावे.शक्‍यतो ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा व पाण्याचे नियंत्रित वापर करावा. डाळिंब आज जास्त पाण्याचा वापर करू नये काळ्या जमिनीत निचऱ्याची व्यवस्था करावी.
  • तांबड्या व हलक्‍या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास बोरॉन ची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची असताना करावी तसेच ड्रीपद्वारे दोन किलो कॅल्शियम नायट्रेट दोनशे लिटर पाण्यातून एकरी फळ फुगवण याच्या काळात सोडावे.
  • फळांची फुगवण तसेच रंग आणि चव चांगली येण्यासाठी फळ पक्वतेच्या काळात पोटॅशियम शोनाइट दोन किलो+ दोनशे लिटर पाण्यातून ठिबक द्वारे किंवा फवारणीद्वारे 15 दिवसांच्या अंतरानेदोन ते तीन वेळा द्यावे.

 

 

 

English Summary: problem of cracking in pomegrenet fruit
Published on: 15 July 2021, 02:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)