सध्या जरा कडक उन्हाळा चालू आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र मध्येपारा 42 अंश याच्यापुढे आहे.जर अशा वाढत्या तापमानाचा विचार केला तरअशा तापमानात पिकांची काळजी घेणे खूपच गरजेचे असते.
त्यातल्या त्यातफळबागा म्हटले म्हणजे विशेष व्यवस्थापन गरजेचे असते.जर नवीन लागवड केली असेल तर छोट्या रोपांची काळजी फार विशेष पद्धतीने घ्यावी लागते.हीच बाब केळी पिकासाठी सुद्धा लागू होते.जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होते.आता या स्थितीत जळगाव जिल्ह्याचा तापमान याचा विचार केला तर पारा हा नियमित 42 अंश याच्यापुढे आहे. त्यामुळे नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचीकाळजी घेणे फार मोठे आवाहन केळी उत्पादकांसमोर आहे. जर आपण केळी पिकाचा विचार केला तर हे दमट व मध्यम तापमानात येणारे फळपीक आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी एलआयसीची ही योजना ठरेल फायद्याची, मिळते या योजनेच्या माध्यमातून पेन्शन
तरी सुद्धा अगदी उष्ण वातावरणामध्ये सुद्धा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी केळीचे पीक घेतले जाते. आता खूप तापमान असल्यामुळे केळीच्या रोपांची काळजी घेण्याबाबत जळगाव येथील केळी तज्ञ डॉ. के बी पाटील यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे तो म्हणजे केळीच्या रोपाभोवती मायक्रो क्लायमेट तयार करून रोपांचे उष्णतेपासून संरक्षण करण्याचा सल्ला दिला गेला आहे.
यासाठी तागाच्या सावलीत केळीच्या रोपांची लागवड करावी. ज्या शेतातकेळी लागवड करायची आहे अशा शेतामध्ये महिन्याभरापूर्वीचताग लागवड करणे फायद्याचे ठरते.जेणेकरून केळीच्या या कोवळ्या रोपांना वाढत्या तापमानापासून संरक्षण मिळेल व जमिनीत देखील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यामध्ये दुसरे महत्त्वाचे म्हणजे क्रॉप कव्हर तंत्रज्ञानवापरणे खूप फायद्याचे ठरेल.क्रॉप कव्हर तंत्रज्ञानामध्ये केळी रोपाच्या चारही बाजूंनी12 ते 14 इंच उंच प्लास्टिक कव्हर टोपी सारखे घालावी.
या कवर मुळे जमिनीतील ओलावा टिकून राहिलाच परंतु ठिबक च्या पाण्याने आद्रता तयार होऊन रोपांचा उष्णतेपासून बचाव होईल. केळीच्या लहान रोपांची सेटिंग चांगली होण्यासाठी याचा खूप फायदा होतो.
ज्या वरील दोन उपाययोजना सांगितल्या आहेत त्यापैकीकोणतीही उपाययोजना करणे शक्य नसेल तर कापणी झालेल्या केळी बागेतील हिरवी पाने कापून वापरावित. अशा पानांचा उपयोग हा केळीच्या लहान रोपांना सावली देण्यासाठी जमिनीत उभी करून गाडावीत किंवा ठेवावीत. तिचा झाडांची पाने किंवा कागदाचे पुठठे वापरून देखील रोपांना सावली करणे शक्य असते. (संदर्भ-कृषीरंग)
Published on: 21 April 2022, 02:53 IST