Horticulture

सध्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचा विचार केला तर त्याचे प्रमाण है 0.5 टक्के च्या खाली चालले आहे. त्यामुळे जमीन मधीलसेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांना कोंबडी खत आहे उत्तम पर्याय

Updated on 01 February, 2022 10:16 AM IST

सध्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचा विचार केला तर त्याचे प्रमाण है 0.5 टक्के च्या खाली चालले आहे. त्यामुळे जमीन मधीलसेंद्रिय खतांचा वापरवाढविणे आवश्यक आहे. 

 कोंबडी खते वापरल्याने मातीची भौतिक,रासायनिक व जैविक क्षमता सुधारते

 कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. कोंबडी खताचा विचार केला तर या खताची प्रत ही कोंबडी ची जात, वापरण्यात आलेले लिटर चे साहित्य, कोंबडीचे खाद्य, जागा व पाण्याचा वापर यासारख्या घटकांवर अवलंबून असते. या लेखात आपण कोंबडी खताचे फायदे जाणून घेणार आहोत.

 कोंबडी खताचे महत्व

कोंबडी खतामध्ये तेरा अन्नद्रव्ये असतात.त्यामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असतं. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, यूरिक ॲसिड या प्रमाणात आढळते.मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त कॅल्शियम,मॅग्नेशियम,सल्फर, सोडियम, बोरन,झिंक,कॉपर,इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

कोंबडी खताचे चांगले असण्याचे गुणधर्म

1.खताचा रंग भुरकट, तपकिरी,काळपट असावा.

  1. खताचा सामू साडेसहा ते साडे सात दरम्यान असावा.
  2. कणांचा आकार पाच ते दहा मीमीअसावा.

4.कर्ब नत्र गुणोत्तर1:10 ते 1:20 दरम्यान असावे.

  1. जलधारणशक्ती टक्‍क्‍यापेक्षा जास्त असावी.
  • कोंबडी खत वापरण्याची पद्धत
  • मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी.
  • ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळून नये. जर उभ्यापिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे. म्हणजे त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते.त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
  • उभ्यापिकास खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. ओलावा नसेल तर पीक पिवळे पडण्याची शक्यता असते.ताजीकोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये.
  • जमीन व पीक लागवडी नुसार प्रति एकरी पाच ते 20 टन खताचा वापर करावा.
English Summary: poultry fertilizer is most important for crop nutrients and more production
Published on: 01 February 2022, 10:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)