Horticulture

भारतात आता शेतकरी हळूहळू फळबागा लागवडिकडे आकर्षित होत आहेत आणि सरकार देखील आता शेतकऱ्यांना पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देऊन फळबाग लागवड करण्यासाठी आवाहन करत आहेत. फळबाग लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतो. अशाच फळबाग पिकांपैकी एक म्हणजे डाळिंब. भारतात डाळिंब लागवड चांगली मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात सर्वात जास्त लागवड ही आपल्या महाराष्ट्रात केली जाते. तसेच गुजरात, राजस्थान सारख्या राज्यात देखील आता डाळिंब लागवड यशस्वीरित्या केली जात आहे ह्या राज्यात देखील डाळिंब उत्पादन लक्षणीय आहे.

Updated on 20 October, 2021 7:29 PM IST

भारतात आता शेतकरी हळूहळू फळबागा लागवडिकडे आकर्षित होत आहेत आणि सरकार देखील आता शेतकऱ्यांना पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देऊन फळबाग लागवड करण्यासाठी आवाहन करत आहेत. फळबाग लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतो. अशाच फळबाग पिकांपैकी एक म्हणजे डाळिंब. भारतात डाळिंब लागवड चांगली मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात सर्वात जास्त लागवड ही आपल्या महाराष्ट्रात केली जाते. तसेच गुजरात, राजस्थान सारख्या राज्यात देखील आता डाळिंब लागवड यशस्वीरित्या केली जात आहे ह्या राज्यात देखील डाळिंब उत्पादन लक्षणीय आहे.

. असं असले तरी महाराष्ट्रातील डाळिंब हा क्वालिटीमध्ये ह्या राज्यातील डाळिंबपेक्षा अधिक चांगला असल्याचे सांगितले जाते शिवाय महाराष्ट्रातील उत्पादन हे सर्वात अधिक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी डाळिंब उत्पादनातून चांगली तगडी कमाई करत आहेत. डाळिंब हे आरोग्यासाठी खुपच चांगले असते डाळिंब च्या आयुर्वेदिक गुणांमुळे तसेच चवीमुळे त्याची मागणी मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात बनलेली असते. त्यामुळे डाळिंब लागवड करून बळीराजा चांगला आर्थिक नफा कमवू शकतो. भारतात एकूण डाळिंब लागवडीखालील क्षेत्र 2 लाख 76 हजार हेक्टर एवढे आहे तर एकट्या महाराष्ट्रात 74 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्यात आली आहे. हा आकडा डाळिंब लागवडीचे महाराष्ट्राचे स्थान अधोरेखित करायला पुरेसा आहे.

 कोणत्या जिल्ह्यात होते डाळिंब लागवड

महाराष्ट्रात डाळिंब लागवड पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, अहमदनगर,सांगली, नाशिक ह्या जिल्ह्यात केली जाते. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात देखील थोड्या बहू प्रमाणात डाळिंब लागवड पाहवयास मिळते.

महाराष्ट्रात 74 हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब लागवडिखालील आहे. तसेच महाराष्ट्रात डाळिंब पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशात इतर राज्यात देखील डाळिंब लागवड ही लक्षणीय वाढत आहे.

 डाळिंब लागवडीसाठी लागणारे हवामान

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुसार, डाळिंबाची रोपे ही ऑगस्ट किंवा फेब्रुवारी-मार्चमध्ये लावली जाऊ शकतात. हा काळ डाळिंब लागवडीसाठी सर्वात चांगला  असल्याचे शेतकरी तसेच कृषी वैज्ञानिक सांगतात. डाळिंब लागवड केल्यानंतर जवळपास 3 ते 4 वर्षांनी उत्पादन देण्यासाठी सज्ज होते. डाळिंब हे एक बहुवार्षिक फळझाड आहे आणि त्यामुळे ह्याची एकदा लागवड केली की त्यापासून वर्षानुवर्षे उत्पादन हे मिळत राहते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे उत्पन्नाचे एक हमीचे सौर्स बनते म्हणुनच आता शेतकरी डाळिंब लागवडिकडे चांगलेच आकृष्ट झाले आहेत आणि लागवड करत आहेत.

 डाळिंब लागवडीसाठी लागणारी जमीन

डाळिंबचे पिक तसे बघायला गेले कोणत्याही जमिनीत घेतले जाऊ शकते आणि त्यापासून चांगले उत्पादन देखील अर्जित केले जाऊ शकते. डाळिंब लागवड पडीत, हलकी जमीन,  दणकट जमीन पण पाण्याचा निचरा होणारी, मध्यम काळी पण पाण्याचा निचरा होणारी आणि सुपीक जमीन डाळिंबाच्या लागवडीसाठी योग्य असते, परंतु चांगला निचरा होणारी  सुपीक मुरमाड जमीन निवडल्यास उत्पादन चांगले होते. मित्रांनो डाळिंब लागवड ही पूर्णतः काळया जमिनीत करू नये तसेच डाळिंब लागवड ही जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात सक्सेसफुल ठरत नाही.

 

 डाळिंबच्या जाती

डाळिंबच्या अनेक जाती आहेत पण महाराष्ट्रात भगवा आणि गणेश ह्या दोन जातींची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. ह्या जातीला मागणी जास्त असल्याने ह्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहवयास मिळते शिवाय ह्या जातींचे डाळिंब हे खायला रुचकर लागतात तसेच ह्या जातीच्या डाळिंबाचे दाणे हे नरम असतात आणि दाण्यांचा रंग हा हलका गुलाबी असतो. ह्या जातींमध्ये साखर ही इतर जातींच्या तुलनेत जास्त असते शिवाय ह्यांचे उत्पादन हे लक्षनीय आहे आणि ह्यातूम शेतकरी चांगली कमाई देखील करत आहेत.

English Summary: pomegranet cultivation area in western maharashtra is expand
Published on: 20 October 2021, 07:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)