जर आपण केळी लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये केळी लागवड केली जाते. परंतु जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनाच्या दृष्टीने भारतात प्रसिद्ध असून सर्वाधिक केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात होते. आपण पिकांच्या बाबतीत विचार केला तर विविध प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे आता शेतीमध्ये खूप सारा वाव आहे. कारण नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन तर वाढलेच परंतु आर्थिक दृष्ट्या देखील शेतकरी आता सक्षम होताना दिसून येत आहे.
या नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जर आपण केळी लागवडीचा विचार केला तर कमी कालावधीमध्ये जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी टिशू कल्चर हा एक उत्तम पर्याय समोर आला आहे. टिशू कल्चर तंत्राचे फायदे
शेतकऱ्यांना आता कळाल्यामुळे शेतीमध्ये विशेषता फळझाडांच्या लागवडीसाठी टिशू कल्चरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. त्यातल्या त्यात केळी लागवडीसाठी टिशू कल्चरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो. या तंत्राचा वापर करून शेतकरी कमीत कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतात.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान
टिशू कल्चर म्हणजे नेमके काय?
आपण भारताचा विचार केला तर केळीच्या पाचशेपेक्षा अधिक जाती भारतात पिकवल्या जातात. यामध्ये बहुतेक शेतकरी जास्त नफा मिळावा याकरिता टिशू कल्चर तयार केलेली रोपे लागवडीसाठी वापरतात. परंतु यामधील महत्वाची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
यामध्ये रोपांची निवड खूप महत्त्वाची असून योग्य प्रकारचे रोपे निवडावी लागतात नाहीतर रोपे लवकर मरण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य रोपांची निवड केली तर खूप महत्त्वाचे ठरते. टिशू कल्चर लागवडीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असून यामध्ये झाडांपासून पाच ते सहा सक्रिय आरोग्य पाने असावी.
तसेच पानांचा मधला भाग 5.0 सेमी पर्यंत असावा व व केळीच्या झाडाला 25 ते 30 सक्रिय मुळे असले पाहिजे.टिशू कल्चर हे कमी वेळेत जलद काम करते. एवढेच नाही तर टिशू कल्चरच्या साह्याने तयार होणारी नवीन झाडे विविध प्रकारच्या रोगांपासून मुक्त असतात. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले पीक घेतल्यानंतर दुसरे पीक आठ ते दहा महिन्यात पुन्हा येते. अशाप्रकारे शेतकरी 24 ते 25 महिन्यांमध्ये दोन वेळा केळीचे उत्पादन घेऊन नफा कमवू शकतात.
Published on: 04 November 2022, 09:08 IST