जगातील केळी उत्पादक देशांपैकी भारत हा प्रमुख केळी उत्पादक देश आहे. भारतामध्ये केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरवर्षी जवळजवळ सात लाख हेक्टरवर लागवड होते.या केळी पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. केळी पिकावरील सर्वात खतरनाक रोग म्हणजे पणामा आणि पर्णगुच्छ हे आहेत. त्या लेखात आपण या रोगांविषयी माहिती आणि उपाय जाणून घेऊ.
पनामा किंवा मररोग
या रोगामुळे पनामा केळीचा संपूर्ण नाश झाल्यामुळे त्याला मररोग म्हणतात. आम्लयुक्त जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. हा रोग जमिनीतील कवकांमुळे होतो. केळीच्या पिलांनातसेच मोठ्या खुंटाणाहारोगझाल्यामुळे ते मरतात. गोमिशेल ही जात या रोगास जास्त बळी पडते. प्रथम खुंटावरील साल पिवळी पडून सुकते. नंतर केळीची पाने देरे पिवळी पडून सुकतात.खुंटा भोवती पानेलोंबतात व नुसते खोड उभे राहते. मुख्य खोड सुकून त्याचा पाना पर्यंतचा भाग चिरलेला दिसतो.रोगट खुंट फळधारणा पूर्वीच मरतो. परंतु केळी नेसल्या नंतर हा रोग पडल्यास केळीची वाढ सारखे होत नसून तीअवेळी पिकतात. रोगट गुंठा च्या खालच्या गड्ड्यात काळे रेषा दिसतात.रोगकारक बुरशीचा मुळांवरील अण्ण वाहिन्यांमध्ये वाढते.परिणामी अनरसा चा वरचा मार्ग खुंटतो. अशा खुंटाच्या गड्या लगतच्या पिलांच्या कांद्यातहीरोग कारक कवक जाऊन तेथे रोगाचा उपद्रव होतात.
या रोगावर उपाय
ज्या जमिनीत हा रोग झाला असेल अशा जमिनीत केळी लागवड टाळावी. तसेच केळी लागवडीकरता रोगमुक्त अशा बेण्याचा वापर करावा.या रोगास प्रतिकारक अशा बसराई,हरिसाल यासारख्या जातींची निवड करावी. रोगट बेणे मुळासकट काढून त्याचा नायनाट करावा.जमिनीला पाणी दिल्याने कवका चा प्रादुर्भाव कमी होतो. बोर्डो मिश्रण एक टक्के द्रावण प्रत्येक झाडास पाच लिटर याप्रमाणे दिल्यास रोगाचा प्रसार थांबतो.एक दीड महिन्याने पुन्हा एकदा वरील प्रमाणे सेरेसानद्यावे.
पर्णगुच्छ( बोकड्या )
गेल्या बऱ्याच वर्षापासून या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झालेला असूनशेकडो एकरावरील केळीच्या बागा नाश पावले आहेत.प्रथमच पानाच्या खालील बाजू वर,मुख्य शिरेवर, देठावर व बारीक शिरेवर अतिशय लहान,अनियमित लांबीचे व गडद हिरव्या रंगाचे लांबट चट्टे दिसतात.ही पाने लहान राहतात.या पानांच्या कडा मधील हरी द्रव्यांचा नाश झालेला आढळून येतो.त्याच्या कडा नागमोडी होऊन पिवळ्या पडतात.पाणी ठिसूळ होऊन त्वरित सडतात व वाळतात. पानांचा देठ वाजवीपेक्षा जास्त लांबीचा राहतो.अशा प्रकारच्या पानांमुळे झाडाची वाढ खुंटते. या रोगाचे अखेरच्या अवस्थेतील लक्षणे म्हणजे पानाची लांबी व रुंदी कडील बाजूने वाढ कमी होते.पाने तलवारीच्या पात्यासारखी दिसतात.ती ताठ व सरळ उभी राहतात.अशा पानांचा झुपका शेंड्यावर तयार झालेला असतो. म्हणूनच या रोगास बंटी टोप असे म्हणतात.
यापैकी कोवळ्या पानांमधून सूर्यप्रकाशकडे पाहिले असता पानांवर गर्द हिरव्या किंवा काळसर रंगाच्या तुटक रेषा स्पष्टपणे दिसतात. रोगट झाडातून सहसा घड बाहेर पडत नाही. पडल्यास केळी लहान आकाराची येतात.
या रोगावर उपाय
मुनवे व गड्डे रोगमुक्त शेतातून आणावे.बोकड्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी बागेतील रोगट झाडे उपटून त्यांचा नाश करावा. मुनवे व गड्डे यांना बीजप्रक्रिया करून नंतर सात दिवस कडक ऊनात सुकवून लागवड केल्यास पीक या रोगापासून मुक्त राहते.
Published on: 15 October 2021, 06:13 IST