Horticulture

नमस्कार मंडळी मि मिलिंद गोदे आपल्या शेतातली माती ही सजीव आहे.आता हे सर्वच मानायला लागले आहेत.कारण मातीमध्ये अनेक जिव जीवाणू आणि अनेक बुरशीचा येथे वास करत आहे हेच तर मातीचे अस्तित्व आहे.त्या सर्वांच्या हालचाली व जिवन मरण या मातीमध्ये तयार होतं.सर्वांचे जिवन चक्र या मातीमध्ये व मातीत उगवणार्‍या पिकांच्या बरोबरीनं चालत असतं

Updated on 08 March, 2022 4:16 PM IST

नमस्कार मंडळी मि मिलिंद गोदे आपल्या शेतातली माती ही सजीव आहे.आता हे सर्वच मानायला लागले आहेत.कारण मातीमध्ये अनेक जिव जीवाणू आणि अनेक बुरशीचा येथे वास करत आहे हेच तर मातीचे अस्तित्व आहे.त्या सर्वांच्या हालचाली व जिवन मरण या मातीमध्ये तयार होतं.सर्वांचे जिवन चक्र या मातीमध्ये व मातीत उगवणार्‍या पिकांच्या बरोबरीनं चालत असतं

मातीमध्ये चालणार्‍या या सर्व जीवन उत्क्रांतीच्या उलाढालीमुळेच माती हे सजीव घटकच आहे हे मानावे लागते.
मातीला मुख्य सजीवपणा देणार्‍या सर्व सजीवांमध्ये गांडूळ हा सर्वात प्रमुख जिव म्हणावे लागेल.आपल्या शेतातल्या मातीचा वरचा सुपीक थर हा तसाच तयार होत नसतो त्या मागे.पुर्वीपासुन चालतं आलेलं निसर्गाच्या अनेक उलाढाली मुळे ही माती शेती करण्यास व कसण्यासाठी योग्य तयार होत असते.
मुख्यता जमिनीचा पोत व जमिनीतील पाणी धारण करून ठेवण्याची किंवा ओल टिकवून ठेवण्याची क्षमता ही शेतीमध्ये सर्वाधिक महत्वाची असते.
शेतातल्या मातीमध्ये आपण जितके मातीचे किंवा सुपिक कण अधिक मिसळू तितका मातीचा पोत वाढणार असतो आणि ती माती अधिक सुपीक होणारच.
आता हा मुद्दा शेती साठी महत्वाचा आहे व समजणं महत्वाचं आहे.आपल्या शेतातल्या मातीचा पोत दोन कारणांनी कमी होत असतो.

पहिले कारण म्हणजे वरचा सुपीक थर हा होणार्या जोरदार पावसामुळे व जमिनीची धूप झाल्यामुळे हा वाहून जातो आणि जमिनीचा पोत व कसं कमी होतो.हा जमिनीचा हा पोत तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात.
पण शेकडो वर्षात तयार झालेला हाच थर वाहून जायला एखादा जोरदार धुमचक्री पाऊस पुरेसा असतो.
या निसर्गाची सुपिक तेची देणगी आपल्या निष्काळजीपणा मुळे काही वेळातच सुपिक मातीच्या रूपाने वाहून जाऊन जाते.
आपन मातीची धूप होऊ नये याबाबत उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.शेतातल्या मातीचा सुपीक थराचा पोत कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे एकचएक पद्धतीने पिकं उत्पादन घेणे.
आपण कोणतेही एखादे पीक घेतो तेव्हा मातीच्या थरा मधली जी सुपिकता आहे ग्रहण करत असतं.

ति सुपिकता म्हणजेच कस शोषून घेऊनच पीक तयार होत असते.
आपण एकच एक पिके घेतो परंतु त्या पिकांने शोषून घेतलेल्या कसाची आणि पोषक तत्त्वांची भरपाई करत नाही हे समजणे महत्त्वाचे आहे.
अशी भरपाई न करता सतत पिके घेतली की, जमिनीची ताकद म्हणजे कर्बा चे प्रमाण कमी होते.परिनाम म्हणजे पिकाचा उत्पादन कमी कमी होत जाते.
मग आपल्या डोक्यात विचार व पर्याय असतो तो म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर त्याला आपन साध्या भाषेत सांगायचे तर पिकाला सलाईन लावणे.पीक तर येतेच परंतु जमिनीच्या कर्बाला त्या खतांचा उपयोगच होत नाही.त्या उलट शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत अशी खते शेतात टाकली की,
पिकांना पोषकद्रव्ये मिळतात आणि जमिनीच्या पोतात भरती करणारे मातीचे कणसुद्धा मिळतात.कारण ही सारी खते पोषक द्रव्ये संपली की, मातीचे रूप धारण करून मातीची घनता वाढवतात.म्हणजे सेंद्रीय खतांनी जमिनीचा पोत सुद्धा वाढत जातो.

जैविक खतांचा हा वेगळा उपयोग आहे. जो रासायनिक खतांनी साध्य होत नाही त्या मागचे कारण जमिनीत कर्ब वाढविताना हिरवळीचे खत व शेनखत याने मातीचे अस्तित्व टिकवून रहाते आपल्या सर्वांना समजावने या लेखाचे उद्दीष्ट आहे... धन्यवाद मित्रांनो
आपला मित्र
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
विचार बदला जिवन बदलेल
milindgode111@gmail.com
9423361185

English Summary: organic carb is soul of soil fertility that important for more food production
Published on: 08 March 2022, 04:16 IST