मागिल 'तीन-चार वर्षापासून'चा अनुभव घेतलेल्या फळ बागायतदार मित्रां सोबतच इतरही संत्रा बागायतदारांना या मोहिमेत भरपूर यश मिळाले आहे.
संत्रा व इतर फळपीका मधील फळगळ व फळसडी करिता फळमाशीचा मुख्यत्वे खुप मोठा रोल असतो. फळमाशीच्या प्रादुर्भावा संबंधित देश-विदेशातील विविध विद्यापीठांच्या संशोधन पत्रकांनुसार संत्रा सोबतच इतर फळपिकांमधील ४०-८०% नुकसान एकट्या फळमाशीमुळे होते. परंतू, याविषयीचे अक्षम्य अज्ञान संत्रा बागायतदारांमध्ये दिसुन येते. आणि त्याच कारणामुळे फळे परिपक्वतेच्या वेळेस पुर्ण बागेत फळगळ/फळसड होवुन बगिचा खाली होतांना पहातांनीची केविलवाणी परिस्थिती बर्याच शेतकर्यांवर शेवटी येते.
संत्रा परिपक्वतेच्या काळात म्हणजेच ऑगस्ट महिन्या पासुन ते संत्रा तोडणी पर्यंत चुकीचे पद्धतीने उशिरा फळमाशीचे ट्रॅप लावणारे... 'वराती मागुन घोडे नाचविणारे' किंवा 'साप गेल्यावर, फरफट (वळखन) पहाणारे' आजमितीस भरपूर शेतकरी आहेत. पंगत बसायच्या अगोदरच माशा येवू नयेत म्हणून ज्यापद्धतीने फिनाईल किंवा इतर औषधांचा वापर पात्र वाढण्या अगोदरच आपण करतो. त्याप्रमाणेच *फळांत रस भरन्याचे अगोदरच अपरिपक्व अवस्थेत पहिल्या पावसानंतर लागलीच फळमाशीचे 'एकरी ९-१० ट्रॅप' लावावेत.
तेंव्हा, आजच जागे व्हा...आणि सामुहिक रित्या गाव स्तरावर सर्वच फळ बागायतदारांनी मिळुन 'फळगळ/फळसडी' मागच्या या अज्ञात शत्रूंपासून सावध रहा. फळमाशी साठी कोणताही रासायनीक औषधांचा वापर होत नसल्या कारणामुळे 'नवसारी कृषी विद्यापीठा'च्या स्वस्त व परिणामकारक "नौरोजी स्टोनहाउस ट्रॅप" चा वापर करा.
या ट्रॅप मध्ये कोणतेही व्यवस्थापन जसे की 'तेल-पाणी किंवा औषध-पाणी' टाकण्याची गरज नाही. यामधील गोळी सुद्धा दिड महिने परिणाम कारकता दर्शवते.
महेश जाधव मो.9503537577
कडेपठार शेतकरी उत्पादक कंपनी लि. पुणे
पेनगंगा जैविक शेती गट ,कोलवड जिल्हा बुलढाणा.
जैविक कृषी मार्गदर्शन केंद्र कोलवड जिल्हा बुलढाणा.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 31 August 2021, 06:13 IST