Horticulture

आंबा हा सगळ्यांचे आवडते फळ, कोणीही असो आंबाची चव घेतल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या आवडीच्या आंब्याचे झाड नसल्याने अनेकजण दुखी असतात. कारण दिवसेंदिवस जमीन कमी होऊ लागली आहे.

Updated on 11 July, 2020 8:49 PM IST


आंबा हा सगळ्यांचे आवडते फळ, कोणीही असो आंबाची चव घेतल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या आवडीच्या आंब्याचे झाड नसल्याने अनेकजण दुखी असतात. कारण दिवसेंदिवस जमीन कमी होऊ लागली आहे. आणि आंब्याच्या झाडासाठी मोठी जागा लागत असते. पण आता तुमचं दुख दूर होणार आहे, आपल्याकडे कमी जागा जरी असेल तरी तुम्ही आमराई करू शकणार आहात. काय आश्चर्यचकित झालात ना ! आता शास्त्रज्ञांनी आंब्यांच्या दोन जाती शोधल्या आहेत. या जातीचे झाड आकाराने लहान असतात. या जातींचे नाव अंम्बिका आणि अरुणिका असे आहे. 

Central Institute of Subtropical Horticulture केंद्रीय उपोष्णकटिबंधीय बागायती संस्थेद्वारे या जाती विकसीत करण्यात आल्या आहेत. संकरित वाण असलेले अंम्बिका आणि अरुणिकाला येणारे फुले आपल्याला आकर्षित करत असतात. या शिवाय या झाडांची वैशिष्ट्ये म्हणजे या वाणांना दरवर्षी फळ येतात. गेल्या शतकाच्या ऐंशीच्या दशकात संकरीत करून दोन्ही जाती विकसित केल्या गेल्या. अंबिका वर्ष 2000 आणि अरुणिकाचे  2005 मध्ये लोकार्पण करण्यात आले. या वाणातील आंबे दिसण्यास सुंदर आहेतच शिवाय चवदार देखील आहेत.  अरुणिका आणि व्हिटॅमिन ए च्या गोडपणाव्यतिरिक्त, हे मॅन्फिफेरिन आणि ल्युपॉल सारख्या अनेक कर्करोगविरोधी घटकांनी परिपूर्ण आहे. अरुणिकाची फळे टिकाऊ असतात आणि त्यांच्या डाग लागल्यानंतरही चववर परिणाम होत नाही.  

या दोन्ही वाणांची लागवड भारताच्या वेगवेगळ्या हवामानात केल्यावर आढळले की बहुतेक ठिकाणी यशस्वीरित्या त्यांची लागवड करता येते. फळ देण्यामुळे झाडाचा आकार दरवर्षी लहान असतो आणि आम्रपालीसारख्या बटू प्रकारापेक्षा अरुणिकाचा आकार 40 टक्के कमी असतो. अरुणिका वेगवेगळ्या हवामानातही चांगल्या पद्धतीने फळ देते.  मग ते उत्तराखंड असो किंवा उडिसाचा समुद्रकिनारपट्टीतील बाग असो तेथे अरुणिकानी आपल्या चवीने सर्वांचे मन जिंकले आहे. अंम्बिका हा वाण गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रेदशासह इतर अनेक राज्यात लोकप्रिय आहे. आम्रपाली या वाणाचे झाडही आकाराने लहान असते, परंतु आम्रपालीपेक्षा अरुणिका या वाणाचे झाड ही अधिक लहान असते, यामुळे लोकांनी अरुणिकाला पसंत केले आहे. नियमित स्वरुपात आंब्याच्या झाडाला मोहोर येऊन मोठ्या प्रमाणात फळे येणे हे या वाणाचे वैशिष्ट्ये आहे.

पण आपल्याला माहिती आहे का आम्रपाली वाणाने अंबिका आणि अरुणिकाच्या आईची भुमिका निभावली आहे. आम्रपाली या झाडासह वनराज या झाडाशी संकरित करण्यात आले, त्यानंतर अरुणिका हे वाण उद्यास आले. तर आम्रपाली आणि जनार्दन पसंदच्या संकरितमुळे अंबिकची उत्पत्ती झाली.  जर्नादन पसंद हे दक्षिण भारतातील वाण आहे, तर वनराज हे गुजरात मधील प्रसिद्ध वाण आहे. आम्रपालीमध्येही  विटामिन ए ची मात्रा अधिक आहे. यामुळे अरुणिकामध्ये विटामिन ए अधिक आहे. दोन्ही वाणांनी पुर्ण देशात भरत असलेल्या प्रदर्शनांमध्ये सर्व ग्राहकांचे मन जिंकले  होते. २०१८ मध्ये अंबिका आणि २०१९ मध्ये अरुणिकाने आंबा महोत्सवात प्रथम क्रमांक पटाकावला होता.  अधिक माहितीसाठी शैलेंद्र राजन, निदेशक केंद्रीय उपोष्णकटिबंधीय बागायती संस्था, रहमानखेडा , लखनौ 226101 , मोबाईल – 8853896692 वर संपर्क करा.

English Summary: Now you can cultivate mango farm in small land
Published on: 11 July 2020, 08:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)