शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाशांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. मधमाशांच्या माध्यमातून होणाऱ्या परागीभवन यामुळेच आज आपण पृथ्वीवरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो.
उपलब्ध एकूण पिकांपैकी फक्त पाच टक्के पिकांमध्ये स्व परागीभवन घडून येते 85 टक्के पिकात परागीभवन दिसून येते. या लेखात आपण मधमाशी आणि परागीभवन याबद्दल माहिती घेऊ.
मधमाशा आणि परागीभवन
मधमाशी द्वारे परागीभवन होणारी पिके
- फळझाडे व भाजीपाला- लिंबू, संत्रा, मोसंबी,सफरचंद, चेरी, अक्रोड, द्राक्ष, आंबा, डाळिंब, नारळ,आवळा, पपई, टरबूज, भेंडी, वांगी, टोमॅटो, कारली, पडवळ आणि काकडी
- कडधान्य व तेलवर्गीय पिके- कापूस, राई, सूर्यफूल, चवळी, मटकी, उडीद, तुर, वाल, मुग आणि घेवडा
- बीजोत्पादनासाठी- कोबी,कोथिंबीर मुळा, कांदा, मेथी, गाजरआणि लवंग
- तृणधान्य पीक- ज्वारी, बाजरी आणि मका
मधमाशी द्वारे होणारे परागीभवन टिकवण्यासाठी काळजी
- प्रतिहेक्टर विस्तारात मध्ये मधपेट्यांची किती संख्या असावी हे त्या पेटीतील मधमाशांची संख्या, अन्य परागीभवन करणारे कीटकांची संख्या, पिकाचे क्षेत्र व शेजारील शेतातील पीक आदी घटकांवर अवलंबून असते.
- मधपेट्या या पिकाच्या 20% फुल अवस्थेत शतात ठेवाव्यात.
- पेट्या सायंकाळच्या वेळी शेतात ठेवावी. पेट्या जवळजवळ न ठेवता विरुद्ध दिशेला ठेवावे. पेटीच्या वर विविध रंगीत फलक लावावेत. जेणेकरून मधमाशी पेटी ओळखू शकेल.
- शेतामध्ये फुले येण्यापूर्वी किड व रोग नियंत्रण करूनच ठेवावेत
मधमाशी ला फुलांकडे आकर्षित करण्यासाठी
- साखरेच्या द्रावणाच्या भांड्यात ज्या त्या पिकाची फुले थोडा वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर हे द्रावण मधमाशीला खुराक म्हणून ठेवावे.
- शेतामध्ये साखरेच्या पाण्याची किंवा बी एट्राक्टन्टची फवारणी करावी. जास्त प्रमाणात पाणी दिल्याने फुलांचा रस आकर्षक राहत नाही.
- मध पेटी अशा ठिकाणी ठेवावी की जेथे सूर्याची पहिली किरणे पेटीच्या दरवाज्यावर पडतील, जेणेकरून मधमाशी लवकरात लवकर कार्यान्वित होईल.
मधमाशी व परागीभवन करणाऱ्या अन्य किटकांच्या संरक्षण
- शेतात मध्यभागी अथवा एकाकोपऱ्यात मधमाशी मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल असे झाडे लावून बी पार्क तयार करावे. त्यात कोणते रासायनिक कीटनाशक फवारू नये.
- ऊस, केळी, आंबा,पपई आणि चिकू आदींमध्ये मधमाशीला उपयोगी अशा मेथी, मोहरी आणि वाल इत्यादी पिके घ्यावीत.
- मध गोळा करणाऱ्या लोकांना धुराचा उपयोग न करता वैज्ञानिक रित्या मधमाशीला नुकसान न करता मत गोळा करण्याचे प्रशिक्षण द्यावे.
- सामाजिक वनीकरण योजना अंतर्गत जास्तीत जास्त विस्तारात निलगिरी,निम, बोर, जांभूळ इत्यादी वृक्षांची लागवड करावी.
Published on: 08 December 2021, 12:24 IST