Horticulture

सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीस पोषक असणाऱ्या जमिनीच्या पोताचा व सेंद्रिय पदार्थाचा हास यांच्या संबंधाचा विचार केला तर भारी जमिनीपेक्षा हलक्या व जमिनीत न्हास अधिक होतो. याचे कारण म्हणजे हलक्या जमिनीत हवा खेळती राहते व त्यामुळे कुजण्याचा वेग वाढतो.

Updated on 13 January, 2023 4:50 PM IST

सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीस पोषक असणाऱ्या जमिनीच्या पोताचा व सेंद्रिय पदार्थाचा हास यांच्या संबंधाचा विचार केला तर भारी जमिनीपेक्षा हलक्या व जमिनीत न्हास अधिक होतो. याचे कारण म्हणजे हलक्या जमिनीत हवा खेळती राहते व त्यामुळे कुजण्याचा वेग वाढतो. याउलट भारी जमिनीत हवा खेळती राहण्यास प्रतिबंध होतो व कुजण्याचा वेग मंदावतो. याशिवाय भारी जमिनीत सेंद्रिय पदार्थ व त्यांच्या ज्वलनातून निर्माण झालेले उपपदार्थ चिकणमातीच्या कगांवर स्थिर राहिल्याने त्यांचा -हास कमी होतो.

हवा जितकी अधिक खेळती राहील तितका. सेंद्रिय कर्बाचा कुजण्याचा वेग जास्त राहतो. या बाबींचा संबंध जमिनीच्या मशागतीच्या प्रकाराशीही जवळचा आहे. जितकी मशागत जास्त तितकी जमिनीत खोलवर हवा खेळती राहून सेंद्रिय कर्बाचा -हास झपाट्याने होतो. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचा -हास कमी करण्यासाठी जमिनीच्या मशागतीची पातळी किमान व हलक्या स्वरुपाची ठेवणे अधिक श्रेयस्कर ठरेल. विशेषत: ही बाब हलक्या ते मध्यम जमिनीत अधिक कटाक्षाने लक्षात ठेवली पाहिजे.

जमिनीचे तापमान हा दुसरा घटक आहे. तापमान जितके जादा तेवढा सेंद्रिय पदार्थांचा -हास अधिक होतो. काही शास्त्रज्ञाने सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्याचा वेग ठरवणाऱ्या अनेक घटकांचा व त्यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की एखाद्या भौगोलिक स्थानाचे सरासरी तापमान १० अंश सेल्सिअसने वाढले तर सेंद्रिय पदार्थ कुजण्याचा वेग कमी करण्यासाठी जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करता येतो. परंतु ही व्यवस्थापन पद्धती सर्व ठिकाणी अधिक असलेल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तापमानाचे नियमन तर आहेच परंतु त्याशिवाय तेथे सेंद्रिय पदार्थांची निर्मितीही फार मोठ्या प्रमाणात होत असते.

सेंद्रिय पदार्थातील कर्बाचे गुणोत्तर जेवढे कमी तेवढा सेंद्रिय पदार्थ कुजण्याचा वेग अधिक आढळून येतो. म्हणूनच द्विदलवर्गीय पिकांचे अवशेष हे एकदल पिकांच्या तुलनेने लवकर कुजतात व पर्यायाने सेंद्रिय पदार्थांचा वेगाने व्हास होतो. म्हणून कर्ब: नत्राचे वेगवेगळे गुणोत्तर असणारे शेतातच उपलब्ध होणारे सेंद्रिय पदार्थ वापरल्यास कर्बाची पातळी बऱ्यापैकी राखण्यास मदत होते.

अवघडच झालं! पैसे परत द्या नाहीतर देवावर हात ठेऊन शपथ घ्या, निवडणुकीत पराभव झालेल्या महिलेचा मतदारांना दम..

जमिनीत प्रत्येक प्रकारच्या वनस्पतीच्या मुळाभोवती विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंच्या प्रजाती अधिक प्रमाणात व प्रभावीपणे कार्यरत असतात. म्हणून हिरवळीच्या पिकांमध्ये वेगवेगळ्या पिकांचा समावेश करावा. शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उंचीची विविध मोसमात फुलांवर व फळांवर येणारी सदाहरित तसेच पानगळ होणारी यांचे सुयोग्य मिश्रण असणारी वृक्षराजी वनशेती पद्धतीच्या माध्यमातून निवडणे हितावह होईल.

सूक्ष्म जिवाणूंची कार्ये
टाकाऊ सेंद्रिय पदार्थ व त्यांचे अवशेष कुजविणे.
हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करणे.
वनस्पतीतील अन्नद्रव्यांचे चक्रीकरण करून त्यांची उपलब्धता वाढविणे. संप्रेरकाची निर्मिती करून अविद्राव्य अन्नद्रव्यांचे रुपांतर विद्राव्य स्वरुपात करून
त्यांची उपलब्धता वाढविणे.

कार्बनयुक्त पॉलीसॅकराइड्स या संयुगांची निर्मिती करून जमिनीतील मातीच्या कणांचे संग्रहीकरण सुधारविणे. त्यामुळे जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होणे. जमिनीत मातीत प्रवेश केलेल्या कीटकनाशकासारख्या विषारी द्रव्यांचे विषारीपण कमी करणे.
जमिनीत प्रतिजैविके निर्माण करून पिकांना उपद्रवी असलेल्या सूक्ष्मजिवाणूंचा नाश करणे.
सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून साध्या सेंद्रिय संयुगात रुपांतर करणे (ही संयुगे पिकांकडून सहज शोषून घेतली जातात. उदा. अॅमिनो आम्ले).

'शेतकऱ्यांनो देशात हुकूमशाहाने जन्म घेतलाय आत्महत्या नको संघटिक व्हा'

जमिनीत प्रवेश केलेल्या अनावश्यक अवजड धातूंचा सेंद्रिय संयुगांबरोबर संयोग
पावून त्यांचे पिकांच्या मूळांकडून होणारे शोषण थांबविणे. मातीद्वारे रोगनिर्मिती करणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणे.पिकांच्या वाढीस आवश्यक असणारी नत्र, स्फुरद, गंधक, लोह इत्यादी अन्नद्रव्ये आपण सेंद्रिय खतांमार्फत पुरवितो. मात्र त्यांचे रुपांतर असेंद्रिय अथवा निरेंद्रिय स्वरुपात झाल्यावरच ती पिकांना उपलब्ध होतात. अन्नद्रव्यांच्या रुपांतराच्या या क्रियेत विविध सूक्ष्म जिवाणूंचे कार्य सविस्तर जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीत पिकांना अन्नपुरवठा कसा करावा याची कल्पना येईल. धन्यवाद

प्रा. प्रमोद न मेंढे सर
कृषी विद्या
कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती

माहिती संकलन
मिलिंद जि गोदे

महत्वाच्या बातम्या;
उन्हाळी खरबूज लागवडीचे तंत्र काय आहे? जाणून घ्या..
प्रत्येक गाव स्मार्ट होण्याची गरज, योजनेचे पुढे झाले काय?
IYoM 2023: कृषी जागरणमध्ये बाजरीवरील भव्य कार्यक्रमाचे आयोजन, केंद्रीय मंत्री रुपाला यांच्यासह अनेकांची हजेरी

English Summary: Microorganisms and soil texture...
Published on: 13 January 2023, 04:50 IST