सध्या हिवाळा चालू असून थंडीचे प्रमाण वातावरणात जास्त आहे. काही पिकांना ही थंडी पोषक असते मात्र काही फळपिकांना या थंडीचा फटका बसतो. यामधूनच एक फळ पीक म्हणजे केळी होय. थंडीची जास्त प्रमाण असले की केळीच्या बागांना फटका बसतो.थंडीमुळे केळीच्या झाडांचा रंग बदलतो.
.असे झाले की सावधानता बाळगणे महत्त्वाचे असते.अशावेळी केळी बागा ची काळजी कशी घ्यावी याबाबत याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. याबाबत अखिल भारतीय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
हिवाळ्यात केळी बागावर काय होतात परिणाम?
- दहा अंश सेल्सिअसच्या कमी तापमानाची नोंद होताच केळीची नैसर्गिक वाढ थांबते.
- पाणी पिवळी पडायला लागतात आणि गंभीर परिस्थितीत ऊती मरायला लागतात.
- केळीच्या बागा सर्वसामान्य दिसत असल्या तरी अधिकच्या गारव्यामुळे केळीच्या घडांची वाढ खुंटलेली असते.
- केळीच्या घडाचा आकार वाढलेला दिसतो पण आत मधून तो भाग पोखरला जाऊ शकतो. यालाच घसा खडू असे म्हणतात. त्यामुळे कधीकधी घड परिपक्व होण्यास पाच ते सहा महिने लागतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात घडाची वाढ होत नाही.
अशा परिस्थितीत कशी काळजी घ्यावी?
शक्यतो थंडीच्या काळात फुल लागवड होउच नये. कारण हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे किंवा कधीकधी गुच्छ आभासी खोडातून योग्यप्रकारे बाहेर येत नाहीत म्हणून गुच्छ ची वाढ चांगली होत नाही. टिशू कल्चर पासून तयार केलेल्या केळीतील फुल नवव्या महिन्यात लागतात. तर साकरणे लावलेल्या केळीतीलफुल दहाव्या किंवाअकराव्या महिन्यात येते.
केळीच्या बागेसाठी सिंचनाची योग्य पद्धत..
- केळीच्या बागेसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते.
- वर्षभर केळीच्या बागेला पाणी दरमहा दहा सेंटिमीटर कमीतकमी स्वरूपात वितरित करावे लागते.
- शेळीच्या शेताची माती हिवाळ्यात नेहमीच ओलसर असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्यापूर्वी केळीच्या बागेत हलक्या प्रकारची मशागत करणे गरजेचे असते.
- त्यासाठी लहान ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट करून घ्यावी तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होतास खतांची मात्रा देणे गरजेचे आहे.
- त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होणार आहे.इतर हंगामात नाही पण थंडीमध्ये केळीच्या बागा याची विशेष काळजी हाच महत्वाचा एक पर्याय आहे. ( संदर्भ-हॅलो कृषी)
Published on: 05 January 2022, 06:16 IST