Horticulture

शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान, आद्रता व कार्बन-डाय ऑक्सारईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला एक प्रकारचा मांडव म्हणजेच शेडनेट होय. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी तसेच उच्च गुणवत्ता व मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.

Updated on 15 November, 2021 8:54 PM IST

शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान, आद्रता व कार्बन-डाय ऑक्‍साईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला एक प्रकारचा मांडव म्हणजेच शेडनेट होय. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी तसेच उच्च गुणवत्ता व मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.

या लेखात आपण हरित गृह,शेडनेटमध्ये जर पीक घ्यायचे असेल तर व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

 हरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे

  • जर तापमान वाढयाची परिस्थिती असेल तर हरितगृहाचे पडदे दिवसभर उघडे ठेवावेत. शेडनेट सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पसरून ठेवावे व त्यानंतर उघडावे.
  • पाण्याचे व्यवस्थापन करताना सायंकाळी आणि सकाळी वाफसा स्थिती राहील अशा पद्धतीने वाढत्या तापमानात व्यवस्थापन करावे.
  • गादीवाफे असतील तर गादी वाफ्याच्याकडा सकाळी ओल्या करून घ्यावेत.शक्य असल्यास दोन्ही गादी वाफ्यामधील भागांमध्ये पाणी भरून ठेवावे.
  • शेडनेट मधील तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्रीच्या वेळी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे.तसेच आद्रता ही साठ टक्के ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • वाढत्या तापमानाच्या काळात पिकांना अन्नद्रव्यांची गरज कमी असते परंतु पाण्याची गरज जास्त प्रमाणात लागते. यासाठी खतांची मात्रा निम्मी करावी व जिवाणू स्लरीचा वापर वाढवावा.म्हणजे स्थिर झालेली अन्नद्रव्य पिकांना मिळतील.
  • जर नवीन भाजीपाला लागवड करायची असेल तर जमीन तापू द्यावी. मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत व्यवस्थित मिसळावे. यामध्ये तागाची लागवड करून फुलोऱ्यात असताना गाडावा.
  • शेडनेट मधील जुने प्लॉट संपले असतील तर या ठिकाणी नेट उघडी ठेवून नांगरणी करून घ्यावी वमाती तापवावे म्हणजे नैसर्गिक रित्या मातीचे निर्जंतुकीकरण होते.
  • नवीन पीक लागवड करायची असेल तर आगोदर पाणी आणि मातीचे परीक्षण जरूर करावे. त्यानंतर शिफारस केल्यानुसार खतांची मात्रा द्यावी.
  • जर रंगीत ढोबळी मिरची असेल तर झाडांवर फळांचा जास्त भार ठेवू नये टप्प्याटप्प्याने काढणी करावी.
  • भाजीपाला पिकांमध्ये विशेषतः रंगीत ढोबळी मिरचीची लहान फळे वेडीवाकडी आलेली असतील किंवा कीड, रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झाली असतील तर काढून घ्यावी.
  • पिकांचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर भर द्यावा. शक्यतो जैविक खतांचा आणि कीडनाशकांचा वापर करावा.
  • बाजारपेठेतील परिस्थितीचाचांगला अभ्यास घेऊन विदेशी भाजीपाला लागवडीचे व्यवस्थापन करावे.
  • वादळी वारे किंवा जास्त पाऊस यामुळे शेडनेटचे नुकसान होते त्यामुळे शेडनेटचा विमा उतरवणे आवश्यक आहे.
  • तयार शेतमाल चा पुरवठ्यासाठी आणि बाजार भावाच्या माहितीसाठी इ-नाम या संकेतस्थळाचा वापर करावा
English Summary: management of vegetable and other crop in shednet and greenhouse
Published on: 15 November 2021, 08:54 IST