लिंबूवर्गीय फळपिकावर अनेक प्रकारचे बुरशीजन्य , जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोग आढळून येतात. त्यापैकी खोड्कुज, मुळकुज व डिंक्या एक बुरशीजन्य रोग असून त्याची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.
भारताच्या फळपिकाच्या फळपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पन्नाचा विचार केल्यास केळी व आंबा पिकानंतर यांचा क्रमांक लागतो. लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीमध्ये भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात १.२७ लाख हेक्टर क्षेत्र लिंबूवर्गीय फळपिकाखालील आहे. महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीस पोषक असल्यामुळे मोसंबी, संत्रा, कागदी लिंबूच्या लागवडी खालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. विदर्भामध्ये नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यामध्ये संत्रा फळपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
तर मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, नांदेड जिल्ह्यांमध्ये मोसंबी फळपिकांची व पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर येथे मोसंबी आणि लिंबूची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. लिंबू फळपिके आर्थिकदृष्ट्या त्यासाठी बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो. परंतु बऱ्याचवेळा या फळ पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. लिंबूवर्गीय फळपिकावर अनेक प्रकारचे बुरशीजन्य, जीवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोग आढळून येतात. त्यापैकी पायकुज/मुळकुज/डिंक्या हा एक बुरशीजन्य रोग आहे.
प्रामुख्याने फायटोफ्थोरा बुरशीचे संक्रमण सर्वाधिक आढळून येते व या बुरशीमुळे फळ पिकामध्ये विविध रोगांचा प्रकोप दिसून येतो. पालमिव्होरा व सिट्रीफ्थोरा यांचे संक्रमण सार्वत्रिक आढळून येते. या बुरशीमुळे लिंबूवर्गीय कायदेशीर असून फळपिकात लिंक्या, मुळकुज, पायकुज, फळकुज, इत्यादी रोग उद्भवतात. जमिनीत वास्तव्य करणारी ही बुरशी असल्यामुळे जोपर्यंत जमिनीमध्ये या बुरशीचे बिजाणू असतात. तोपर्यंत ओलसर वातावरणात रोगांची निर्मिती हळुहळू सुरूच राहून दिवसागणिक झाडे वाळतात. या बुरशीचा प्रादुर्भाव रोखणे अतिशय कठीण असल्यामुळे एकात्मिक व्यवस्थापनेचा वापर करणे अपरिहार्य ठरते.
रोगाची लक्षणे :-
झाडाचा कलमयुतीचा भाग जमिनीजवळ किया जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे रोगाचा प्रादुर्भाव होऊन तो खोडावर व मुळावर पसरतो. जमिनीलगतच्या बुंध्याची साल कुजते. पानांच्या मुख्य शिरा पिवळ्या पडतात आणि पुढे पूर्ण पाने पिवळी पडून गळतात व फळेही गळतात. झाडाची तंतुमयमुळे कुजतात, अशा मुळांची दुर्गंधी येते. मुळांची साल मऊ होऊन साल मुळापासून अलग होते नवीन तंतुमयमुळे फुटण्याचे प्रमाण हे तंतुमयमुळे कुजण्याच्या प्रमाणापेक्षा कमी असेल तर माडांना अन्नद्रव्याचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. झाड मुळामधील साठवलेले अन्नद्रव्याचा वापर करते त्यामुळे कालांतराने झाडांची मर सुरू होते. कूज मोठ्या मुळापर्यंत जाऊन नंतर झाडाच्या बुंध्यावर पायकूज होतो. तेथे उभ्या चिरा पडतात आणि त्यातून पातळ डिंकाचा स्त्राव होतो. पायकूजयस्त साली खालचा भाग गडद तपकीरी रंगाचा होतो. माठाअंतर्गत अन्नद्रव्याचे अभिसरण मंदावल्यामुळे अकाली बाहेर येऊन फळे अप स्थितीत गळतात. नवीन फुटलेल्या फांद्या हळुहळु सुकतात व ही मर बुंध्याकडे सरकत जाते आणि झाडाचा हास किंवा डायवेक होतो. जास्त पावसाळी वातावरणात फळकूज आणि पानगळ होते.
रोगाचा प्रसार :-
हा रोग फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो या बुरशीचा प्रसार पावसाच्या पाण्यामार्फत किंवा सिंचनाच्या पाण्यामार्फत होतो. रोगग्रस्त रोपे लागवडीस वापरल्यामुळे नवीन लागवडीत रोगाचा फैलाव होतो. जमीन सतत ओली राहणे किंवा जमिनीचे तापमान २६-३२ डिग्री सेल्सियस या रोग वाढीसाठी अनुकूल असते. बुरशीचे बिजाणू प्रतिकुल परिस्थितीत देखील जिवंत राहू शकतात. पावसाळ्यात जमिनीत या बुरशीचे बिजाणू सक्रीय होतात व पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन झाडाच्या खोडावर संक्रमण करतात.
नियंत्रण :-
-
रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आळ्यातून पाणी देण्याची पद्धत बंद करावी. कारण या पद्धतीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
-
झाडाच्या बुंध्याभोवती दोन वर्तुळाकार आळे तयार करून त्यामधून पाणी द्यावे (बांगडी पद्धतीने) जेणेकरून बुंध्याला पाणी लागणार नाही.
-
पावसाळ्यात बागेतून जास्तीचे पाणी बाहेर निघून जाण्यासाठी झाडाच्या दोन ओळीत चर खोदावेत जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल.
-
ओलीताकरिता ठिबक सिंचानांचा उपयोग करावा, अतिभारी निचरा नसलेल्या जमिनीत लागवड करू नये.
-
लागवड करतेवेळी कलम जोड जमिनीपासून २०-२५ सें. मी. उंचीवर असावा.
-
आवश्यकतेपेक्षा झाडांना जास्तीचे पाणी देऊ नये. खोडांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
-
मुळकूजग्रस्त मुळे छाटून त्याठिकाणी प्रयुक्त बुरशीनाशक किंवा कॅप्टन २० ग्राम प्रति १० ली. पाण्यात मिसळून मुळांवर ओतून मातीने मुळे झाकून घ्यावीत.पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर झाडांच्या खोडावर जमिनीपासून ६०-९० से.मी उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट (कि. मोरचूद + १ कि. चुना + १० ली.पाणी) लाबाबी. पायकूजग्रस्त भाग चाकूने खरडून त्याठिकाणी बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड लावावी.
-
सायमोकझिनल अधिक मॅन्कोझेब संयुक्त बुरशीनाशक २० ग्राम १० ली.पाण्यात मिसळून प्रत्येक माहास आवश्यकतेनुसार(२०-३० ली.) द्रावण खोताशेजारी ओतून ओलेचिंब करावे.
-
आंतरमशागत करताना झाडांच्या खोडास,फांचाना आणि मुळांना जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. रोग दिसताचक्षणी ट्रायकोडर्मा हार्जियानम + ट्रायकोडे व्हीरिडी + सुहोमनास फ्ल्यूरोसन्स प्रत्येकी १०० ग्रॅम प्रती झाड १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघात जमिनीतून द्यावा कलम करण्यासाठी सहनशील खुंटाचा वापर करावा.
लेखक -
डॉ. अमोल झापे (पीक संरक्षण विभाग)
कृषिविज्ञान शाखा, ग्रामीण शिक्षण संस्था,
(डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. सलग्नं) पिपरी, वर्धा. मो.9822930358
प्रा. हरिष अ.फरकाडे (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
श्री शिवाजी उध्यानविध्या महाविध्यालय, अमरावती.
मो. 8928363638 इ. मेल. agriharish27@gmail.com
कु. सिरिषा विजय ठाकरे
एम. एस. सी. कृषी (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
इ.मेल. sirishathakare09@gmail.com
Published on: 18 January 2021, 05:28 IST