Horticulture

लिंबूवर्गीय फळे झाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य वाढीकरता खर्च न होता अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडांच्या फांद्या मध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवती सोबत दिसू लागतात. बहार धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. निसर्गतः संत्रा मोसंबी फळ झाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी जून जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या बहरास मुर्ग बहार आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हस्त नक्षत्रात येणाऱ्या बहरास हस्त बहार तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये म्हणजे थंडी संपण्याच्या वेळी येणाऱ्या बहरास आंबे बहार म्हणतात.

Updated on 23 July, 2021 6:20 PM IST

लिंबूवर्गीय फळे झाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य वाढीकरता खर्च न होता अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडांच्या फांद्या मध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवती  सोबत दिसू लागतात. बहार धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. निसर्गतः संत्रा मोसंबी फळ झाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी जून जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या बहरास  मुर्ग बहार आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हस्त नक्षत्रात येणाऱ्या बहरास हस्त बहार तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये म्हणजे थंडी संपण्याच्या वेळी येणाऱ्या बहरास आंबे बहार म्हणतात.

 बहार धरणे करता जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाचे वय व अवस्था पाहून ताण द्यावा. हलक्‍या जमिनीत 35 ते 45 दिवस, भारी जमिनीत पंचावन्न ते 65 दिवस ताण द्यावा. ताना च्या कालावधीत पाऊस पडल्यास सायकोसेल  1000 पी पी एम ( 1000 मिली ग्रॅम प्रति लिटर पाणी ) ची फवारणी करावी.

 आंबे बहार व्यवस्थापन:

 संत्रा मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी जास्त तापमानामुळे झाडे दोनदा विश्रांती घेतात. वाढ थांबल्यामुळे अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः दहा अंश  सेल्सिअसपेक्षा कमी असते. परिणामी झाडांना नैसर्गिक ताण बसतो. यामुळे संत्रा मोसंबीच्या आंबे बहराला नैसर्गिक बहार असे म्हणतात.

 बागेला ताण देणे:

 काळ या जमिनीत झाडे तानावर सोडतच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे  झाडांना ओलावा मिळत राहतो. त्यामुळे झाडाला ताण बसत नाही. पाच डिसेंबर च्या आसपास झाडाच्या ओळींमधून ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. त्यामुळे टोकावरचे तंतूमुळे तुटल्याने झाडाला ताण बसतो. तसेच ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास 2 मिली क्लोरमेक्वाट क्लोडराइड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे कायिक वाढ रोखणारे संजीवक आहे.

 झाडा ताण बसला आहे कसे ओळखावे?

 ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीचे फळे काढावीत. फळे पूर्ण काढून झाल्यानंतर  बागेला पाणी देणे बंद करावे. साधारणपणे 25 ते 35 टक्के पानगळ झाल्यास झाडाला ताण बसला असे समजावे. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास व नंतर ताण तोडल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि ते व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरते.

 अन्नद्रव्य व्यवस्थापन:

 डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून झाडे तानावर सोडल्यानंतर बागेला आडवी उभी नांगरट व वखरणी करावी. तसेच प्रत्येक झाडाला आळी बांधून  40 ते 50 किलो शेणखत टाकून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा झाडाचा ताण तोडताना हलक्या ओलीता अगोदर प्रत्येक झाडाला 450 ग्रॅम नत्र, 300 ग्राम स्फुरद, 300 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे. शेन खतासोबत सात किलो निंबोळी पेंड, 500 ग्रॅम व्हॅम, 100 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू, 100 ग्रॅम ऍझोस्पिरीलम आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम यांचे एकत्र मिश्रण करून द्यावे. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

 अशाप्रकारे दिल्या जाणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या पाण्याला आंबवनी आणि चिंब वनी असे म्हटले जाते.तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. तान सोडल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी पुढे येतात. त्यानंतर उरलेला नत्राचा अर्धा हप्ता फुलोरानंतर एक ते दीड महिन्यांनी किंवा फळे वाटाणा एवढे झाल्यावर द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास मार्च महिन्यात नवीन पालवी आल्यानंतर 0.5 टक्के झिंक सल्फेट, मॅगेनीज सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेट आणि 0.3 टक्के फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी.

 पाणी व्यवस्थापन:

 आंबिया बहराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसले जातात त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरीचे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. म्हणून आंबे बहार घेताना ओलीता कडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. ओलितासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोता प्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

 बहार धरतांना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे?

  • तान देण्यापूर्वी झाडावरील पूर्वीचे फळे, वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात.
  • किती काळ ताण द्यायचा हे जमिनीची प्रत व झाडाचे वय पाहून निश्चित करावे.
  • आवश्‍यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
  • झाडांची नियमित पाहणी करून कीड व रोग नियंत्रणाचे उपाय योजावेत.
  • सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बागेभोवती झेंडूच्या रोपांची लागवड करावी.
English Summary: management of orange fruit garden
Published on: 23 July 2021, 06:20 IST