Horticulture

आपल्याकडे चुनखडीयुक्त जमिनीचे समस्या अनेक शेतकऱ्यांना सतावते. राज्यामध्ये कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमीन आढळतात. विशेषता अवर्षण प्रवण क्षेत्र,जास्त उष्णता,कोरडे हवामान, कमी पाऊस इत्यादींमुळे तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये कचऱ्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते. या लेखात आपण चुनखडीयुक्त जमिनीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 27 November, 2021 1:04 PM IST

आपल्याकडे चुनखडीयुक्त जमिनीचे समस्या अनेक शेतकऱ्यांना सतावते. राज्यामध्ये कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमीन आढळतात. विशेषता अवर्षण प्रवण क्षेत्र,जास्त उष्णता,कोरडे हवामान, कमी पाऊस इत्यादींमुळे तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये कचऱ्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते. या लेखात आपण चुनखडीयुक्त जमिनीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

 चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा आणि व्यवस्थापन

  • जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  • जमिनीत सेंद्रिय खते शिफारस केल्याप्रमाणे दरवर्षी टाकावीत.आताचा अपुरा पुरवठा असल्यास हिरवळीची पिके पेरून ती पंचेचाळीस ते पन्नास दिवसात जमिनीत गाडावे.
  • रासायनिक खते जमिनीवर न फेकता त्या चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत.
  • भाजीपाला आता फळपिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते कुजलेल्या शेणखतात आठवडाभर मुरवून द्यावीत किंवा जीवामृत आत टाकून आठवडाभर मुरवून वाफशावर उभ्या पिकांना द्यावे.
  • स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया द्वारे आता शेणखतात मिसळून करावा.
  • रासायनिक खतांचा वापर करताना माती परीक्षणाद्वारे मात्रा ठरवावी. त्यातील नत्र हे अमोनिअम सल्फेटच्या तर स्फुरद हे डाय अमोनिअम फॉस्फेट च्या स्वरूपात द्या. पालाश हे सल्फेट ऑफ पोटॅश द्वारे पिकांना द्यावे.
  • जमिनीत मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 ते 15 किलो सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा.उदा. लोहासाठी फेरस सल्फेट हेक्‍टरी 25 किलो, झिंकची कमतरता असेल तर झिंक सल्फेट एकरी 20 किलो इत्यादी
  • पिकांवर कमतरतेची लक्षणे उदा.शेंड्याकडील पाने पिवळी पडणे, लहान आकाराचे दिसणे किंवा शेंडा जळणे इत्यादी लक्षणे दिसून येताचसुषमा अन्नद्रव्य (ग्रेड नंबर दोन ) ची फवारणी आठ दिवसाच्या अंतराने दोन वेळा करावे. किंवा चिलेटेड स्वरूपात लोह, जस्ट बाजारात उपलब्ध आहे. त्याचे 0.1 ते 0.2 या प्रमाणात फवारणी करावी.
  • चुनखडीयुक्त जमिनी मध्ये पाणी देण्याची सोय ही ठिबक  द्वारे करावी. नगदी फळपिकांना ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा.
  • चुनखडीयुक्त जमिनीत सहनशील पिकांची लागवड करावी. उदा. कापूस, गहू, ऊस,सोयाबीन, बाजरी, सूर्यफूल, भुईमूग, सिताफळ, आवळा,, बोर आणि चिंच इत्यादी.
  • अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी मळी कंपोस्ट हेक्‍टरी पाच टन या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये नागडी पूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे.
English Summary: management of limestone land later this land useful for take crop
Published on: 27 November 2021, 01:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)