लिंबू फळबाग लागवड करण्यासाठी इतर फळबाग प्रमाणे जमिनीची योग्य निवड, तसेच सुधारित जाती यांची निवड महत्त्वाची आहे. गल लिंबु फळबागेच्या पहिल्याच वर्षापासून व्यवस्थित खतांचा पुरवठा केला म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही प्रकारचा खतांच्या वापराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आणि चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. एकदा पण लिंबू लागवड आणि अन्नद्रव्यव्यवस्थापन याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
लिंबू फळबाग लागवड आणि व्यवस्थापन
- लिंबू साठी लागणारी जमीन- लिंबू लागवडीसाठी मध्यम प्रकारची तसेच काळी, हलकी, त्याचा चांगला निचरा होणारी, मुरमाड जमीन उपयुक्त ठरते. परंतु जमिन ही चुनखडीयुक्त नसावी.जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण0.50डेसि. सा.प्रति मीटरपेक्षा कमी तसेचई. सो. टक्केवारी दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी योग्य असते. जमिनीत लागवड करायची त्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करून घेणे महत्वाचे आहे.
- लिंबू फळ बागेचे लागवड पद्धत- लिंबू ची लागवड करण्यासाठी 6×6 मीटर अंतरावर 3×3×3 फूट आकाराचे खड्डे खोदावेत. खोदलेल्या खड्ड्यांची उन्हाळ्यामध्ये उन्हात निर्जंतुकीकरण करून घ्यावे. पावसाळ्यात लागवड करण्याअगोदर कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस(50 टक्के इसी) अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने खड्ड्यांची निर्जंतुकीकरण करावे. खड्डा भरताना त्यामध्ये दहा किलो शेणखत, एसएसपी 2किलो, निंबोळी पेंड एक किलो आणि ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम पोयटा माती मध्ये मिसळून घ्यावे व त्यानंतर लागवड करावी.
- कलमांची निवड व जाती- लिंबू लागवड करताना रोगांना आणि किडनी प्रतिकारक्षम असलेला वाणांची निवड करावी. तसेच रोप घेताना ते खात्रीलायक रोपवाटिकांमधून घ्यावी. लिंबू लागवडीसाठी फुले शरबती, साई शरबती या जातीची निवड आपण करू शकतो.
- लिंबू लागवडीसाठी ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन-
- अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारशीच्या मात्रांच्या 80 टक्के (1083 ग्रॅम युरिया आणि 960 ग्रॅम 00:00:50)प्रति झाडासाठी, प्रति वर्ष दीड महिन्याच्या अंतराने समान हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
- 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति झाड द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेट हे 15 किलो निंबोळी पेंड+15 किलो सेंद्रिय खतांबरोबर द्यावे.
- लिंबू फळबागेसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन- लिंबू झाडा मध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असली तर त्यामध्ये अनेक विकृती निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या सायुक्त मिश्र खतांची फवारणी करणे आवश्यक आहे. एका वर्षात साधारण दोन वेळा झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नीज सल्फेट प्रत्येकी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यासोबतच फेरस आणि कॉपर सल्फेट ची प्रत्येकी तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे चांगले ठरते.
Published on: 26 December 2021, 06:46 IST