Horticulture

लिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन,जात यांची निवड महत्त्वाची आहे. पहिल्या वर्षापासून लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होऊन, सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे शक्य होते.

Updated on 02 March, 2022 7:59 PM IST

 लिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन,जात यांची निवड महत्त्वाची आहे. पहिल्या वर्षापासून लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होऊन, सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे शक्य होते.

लिंबू लागवड करण्यासाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी उदासीन सामू असणारी जमीन उपयुक्त ठरते. मात्र जमिनीमध्ये चुनखडी नसावी. साधारणत: शहराचे प्रमाण  0.50डेसी. सा.प्रति मीटरपेक्षा कमी तसेचई.सो. टक्केवारी (.एस.पी.प्रती उपलब्ध असून याचे प्रमाण)10 टक्क्यापेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी योग्य आहे.

 यासाठी ज्या ठिकाणी लागवड करायची आहे तेथील मातीची तपासणी करून घ्यावी. तज्ञांचा सल्ला घ्यावा.

 लिंबाची लागवड करण्यासाठी 06×06 मीटर अंतरावर 3×3×3 फूट आकाराचे खड्डेखोदून घ्यावेत. या खड्ड्याचे उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये निर्जतुकीकरण करुन घ्यावे. पुन्हा पावसाळ्यात लागवड करण्यापूर्वी कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम अधिकक्लोरपायरी फॉस ( 50% इसी)2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने खड्ड्याचे मी  निर्जंतुकीकरण करावे. खड्डा भरताना त्यात शेणखत 10 किलो एस. एस. पी.2 किलो, निंबोळी पेंड 1किलो आणि ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम पोयटा माती मध्ये मिसळून घ्यावे. त्यात लिंबू कलमांची लागवड करावी.

  • लिंबू लागवडीसाठी कलमांची निवड आणि जाती :-
  • लिंबू लागवड करण्यासाठी विशिष्ट रोगांना तसेच किडींना प्रतीकारकक्षम असणाऱ्या वाणाची निवड करावी.
  • खात्रीलायक रोपवाटिकांमधून कलमांची अथवा रोपांची खरेदी करावी.
  • लिंबू लागवडीसाठी साई सरबती, फुले शरबती इ. सुधारित जातींची निवड करू शकतो.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन :-

नवीन लागवड केलेल्या लिंबाच्या बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.

  • नवीन बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन:-
  • उपरोक्त खतांची मात्रा देताना नत्रयुक्त खतांची मात्रा प्रति झाडासाठी समान तीन हप्त्यांमध्ये विभागून द्यावी.( जानेवारी जुलै आणि नोव्हेंबर)
  • नत्राच्या एकूण गरजेपैकी 50 टक्के मात्र रासायनिक खताद्वारे ( युरिया किंवा अमोनियम सल्फेट ) तसेच उर्वरित नत्राची मात्रा सेंद्रिय खते किंवा निंबोळी पेंडच्या स्वरूपात द्यावी.
  • साधारणत: प्रति झाडासाठी 15 किलो निंबोळी पेंड आणि 15 किलो सेंद्रिय खत योग्य फळधारणा झालेल्या झाडांसाठी वापरावे.
  • ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन :-
  • कार्यक्षम अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारशीचा मात्राच्या 80 टक्के (1083 ग्रॅम युरिया आणि 960 ग्रॅम.00.00.50) प्रति झाडासाठी, प्रति वर्षासाठी दीड महिन्याच्या अंतराने समान हप्त्यात ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
  • 1875 ग्रॅमसिंगल सुपर फास्फेट प्रति झाड द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेट हे 15 किलो निंबोळी पेंड अधिक 15 किलो सेंद्रिय खतांबरोबर द्यावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन :-

 लिंबू हे पीक संवेदनशील असून, त्यामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विविध विकृती दिसून येतात. त्या टाळण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संयुक्त मिश्र खतांची फवारणी करावी.

वर्षा मधून साधारण दोन वेळा झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट,मॅगनीज सल्फेट, प्रत्येकी 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तसेच फेरस व कॉपर सल्फेटची प्रत्येकी 3 ग्रॅम प्रति  लिटर पाणी  याप्रमाणे फवारणी करावी.

 अन्नद्रव्यांच्या योग्य प्रमाणातील उपलब्धतेसाठी सेंद्रिय खते प्रति झाड 500 ग्रॅम व्हॅमअधिक 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू अधिक 100 ग्रॅमॲझोस्पिरिलम अधिक 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम मिसळून द्यावे.

English Summary: management of lemon orcherd give more production to farmer (1)
Published on: 02 March 2022, 07:59 IST