Horticulture

लिंबू पिकावरील प्रमुख व हानिकारक रोग म्हणजे खऱ्या रोग होय. या रोगाला कँकर किंवा देवी रोग देखील म्हणतात. हा जिवाणूजन्य रोग असून झान्थोमोनास सिट्री उप-प्रजाती सिट्री या जिवाणूमुळे होतो.

Updated on 28 September, 2021 7:38 PM IST

हा जिवाणूजन्य रोग असून झान्थोमोनास सिट्री उप-प्रजाती सिट्री या जिवाणूमुळे होतो. लिंबू फळपिक लागवड मधील प्रमुख अडचणींपैकी एक कँकर रोग होय. हा रोग अत्यंत जलद गतीने पसरतो, त्यामुळे नुकसानाची उच्च संभाव्यता असते या कारणाने रोगाच्या व्यवस्थापनाकरिता बराच खर्च होतो. फळावर डाग पडत असल्याकारणाने अशा फळांना बाजारात मागणी राहत नाही. अशी फळे विलग करूनच बाजारात न्यावी लागतात परिणामी उत्पन्नावर प्रभाव पडतो. कँकर रोगामुळे ५० ते ६० टक्के उत्पन्न कमी होण्याची नोंद केली गेली आहे.

रोगाची लक्षणे:-कँकर रोगाचे संक्रमण रोपे अवस्था ते विकसित झाड यावर दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव पाने फांद्या जुन्या शाखा आणि फळे यावर दिसून येतो. या रोगाची लक्षणे पा या व फळे यावर दिसून येतात. सुरुवातीला पानांवर टाचणीच्या टोक ठिपके पृष्ठभागावर दिस ढे लहान, गोल, गर्द हिरवे व पाणीयुक्त हे ठिपके तांबूस रंगाचे खरबरीत होऊन पानांच्या दोन्ही बाजूस दिसतात.

झाडाच्या सर्व भागांवर पसरतो. ( पावसामुळे पानांच्या पृष्ठभागावर पाणी संकुचन होते, पर्णरंध्रातून ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाचे वलय तयार होऊन कालांतराने ते नाहीसे होते. पुढे हे ठिपके फांद्यावर वाढतात आणि झाड देवीचे व्रण ग्रासल्यासारखे दिसते. परिणामी शेंड्याकडील फांद्या  मरतात. तसेच झाडे खुरटल्यासारखी दिसतात. फळांवर ठिपक्यांची वाढ झाल्यास फळे तडकतात. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळतात, फांद्या जळतात व फळांना बाजारात भाव मिळत नाही.

हा रोग फार संसर्गजन्य असून या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पावसाचे थेंब, पाने पोखरणारी अळी पानातील रंध्र व अवजारांद्वारे होतो. पावसाच्या थेंबांमुळे फोडातील सूक्ष्मजंतूमार्फत रोग जिवाणुयुक्त पाण्याचे थेंब आतमध्ये प्रवेश करून संसर्ग वाढवतात. रोगग्रस्त पानांवर पावसाचे थेंब पडून उडणारे थेंब, ज्यात जिवाणू असतात, वाऱ्याबरोबर वाहत जाऊन शेजारील झाडावर पडून रोगाचा प्रसार होतो.

या रोगाच्या प्रसारास कारणीभूत पाने पोखरणारी अळी ज्यास नाग अळी असे सुद्धा संबोधतात ही सुद्धा होय. ही अळी पाने पोखरते आणि आतील हरित द्रवे खाते व असंख्य जखमा तयार करते या जखमांमधून जिवाणूचे संक्रमण पेशींना होते त्यामुळे हा रोग वाढण्यास मदत होते.प्रसार होण्यास अनुकूल हवामान या रोगाचा फैलाव झपाट्याने होण्यास पावसाळ्यातील उष्ण, दमट, ढगाळ व आर्द्रतायुक्त हवामान अतिशय अनुकूल असते. २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान तापमान व समान वितरित पाऊस या वातावरणात रोगाची वाढ जलद होते.

रोगाचे व्यवस्थापन:-

१) निरोगी रोपे लागवडीस वापरावीत.

२) मान्सूनच्या प्रारंभापूर्वी संक्रमित झाडाच्या फांद्या यांची छाटणी करून त्यावर आणि बोर्डोक्स मिश्रणाची १ टक्के तीव्रतेची फवारणी करावी.

३) फांद्या छाटणी प्रक्रियेत आणि व्यापक संपर्कात असलेल्या अवजारांचे निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे. ४) रोगग्रस्त फांद्या, पाने व फळे यांचा नायनाट करावा.

५) कॉपर ऑक्सिक्लोराईड (३० ग्रॅम) अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन (१ ग्रॅम) १० लीटर पाण्यात मिसळून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये एक महिन्याचे अंतराने तीन फवारण्या कराव्यात व चौथी फवारणी फेब्रुवारी महिन्यात करावी. 

६) पाने पोखरणाऱ्या अळीचा कीटकनाशके वापरून बंदोबस्त करावा.

 

स्रोत:- शेतकरी मासिक सप्टेंबर 2021

संकलन - IPM school

 

English Summary: management of khaira disease on the lime
Published on: 28 September 2021, 07:38 IST