Horticulture

द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर उडद्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पूर्वी उडद्या किडीचा प्रादुर्भाव फक्त कोवळ्या फुटी असेपर्यंत दिसत होता. पण गेल्या काही वर्षांपासून उघड्या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटीसोबतच आता द्राक्ष घड मण्यांवर दिसू लागला आहे. यामुळे या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाच्या दृष्टीने संपूर्ण फळछाटणी हंगामाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

Updated on 30 October, 2021 7:36 PM IST

द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर उडद्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पूर्वी उडद्या किडीचा प्रादुर्भाव फक्त कोवळ्या फुटी असेपर्यंत दिसत होता. पण गेल्या काही वर्षांपासून उघड्या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटीसोबतच आता द्राक्ष घड मण्यांवर दिसू लागला आहे. यामुळे या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाच्या दृष्टीने संपूर्ण फळछाटणी हंगामाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

जीवनचक्र -

उडद्या नियंत्रणासाठी जीवनचक्र जाणून घेतले पाहिजे. त्यानुसार दोन टप्प्यात नियंत्रणाच्या उपाय योजना राबवाव्यात. अंडी, अळी व कोष अवस्था या जमिनीमध्ये असतात. या अवस्थांचे नियंत्रण करण्यासाठी क्लोथियानिडीन (५० डब्ल्यूडीजी) २०० ग्रॅम प्रति एकर किंवा इमिडाक्लोप्रिड १.५ मिली प्रति झाड या प्रमाणे जमिनीत आळवणी करावी. यामुळे अळी अवस्थेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. या आळवणीमुळे भविष्यात तयार होणाऱ्या प्रौढांचे प्रमाण आपोआप नियंत्रणात राहते. उडद्या किडीची केवळ प्रौढ अवस्थाच जमिनीबाहेर राहून द्राक्ष बागेत नुकसान करते. प्रौढ हे दिवसा उष्णतेपासून बचावासाठी द्राक्ष वेलीवर सावलीच्या बाजूस पानांमध्ये किंवा तणांमध्ये झाडाच्या सालीत किंवा जमिनीमध्ये मातीआड जाऊन बसतात. यामुळे या किडीसाठी दिवसा घेतलेली फवारणी फारशी फायदेशीर ठरत नाही. उडद्या कीड ही प्रामुख्याने अंधार सुरू झाल्यानंतर सक्रिय असते. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजल्यानंतर म्हणजे थोड्या अंधारातच घ्यावी. द्राक्ष वेलीवर सक्रीय असलेले उडद्या किडीचे प्रौढ फवारणीच्या संपर्कात आल्याने चांगले नियंत्रण मिळू शकेल.
वेगवेगळ्या अवस्थेनुसार उपाययोजना

1) फळछाटणीनंतर अवस्था

फळछाटणीनंतर डोळे फुगण्याची अवस्था किंवा फुटी फुटत असतानाच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) १६० मिली प्रति एकर याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. या फवारणीमुळे उडद्याबत पिठ्या ढेकूण, फुलकिडे व तुडतुडे यांच्या नियंणासह मदत होते.
उडद्या नियंत्रणासाठी प्रभावी कीटकनाशके
स्पिनोसॅड(४५ एससी) १०० मि.ली
स्पिनेटोराम (११.७ टक्के एससी) १२० मिली.
फिप्रोनिल (८० टक्के डब्ल्यूजी) २५ ग्रॅम
इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) १६०. मि.ली
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.१ टक्के सीएस) २०० मिली
स्पिनोसॅड व स्पिनेटराम (११.७ टक्के एससी) यांचा वापर सुरुवातील म्हणजे प्राथमिक फुटीच्या व सुरूवातीच्या वाढीच्या अवस्थेत करण्याऐवजी अन्य कीटकनाशकांचा वापर आधी करावा. त्यानंतरी उडद्याचे नियंत्रण मिळत नसल्याचे स्पिनोसॅड व स्पिनेटोराम यांचा वापर करावा.

 

सक्रीय वाढ अवस्था

या अवस्थेत फुलकिडीसाठी नियंत्रणाचे उपाय केले जातात.त्यासाठी वापरली जाणारी फिप्रोनील, स्पिनोसॅड स्पिनेटोराम यांच्या फवारणीनेही उडद्याचेही नियंत्रण मिळते. फुलकिडीसाठी वापरली जाणारी इमामेक्टीन, बॅझोएट व सायअॅण्ट्रानिलिप्रोल ही कीटकनाशके उडद्यासाठी प्रभावी नाहीत. तुडतुड्यांसाठी वापरल्या जाणारी फिप्रोनील, इमिडाक्लोप्रिड, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ही कीटकनाशके उडद्यासाठी उपयुक्त ठरतात. तुडतुडे नियंत्रणासाठी बुप्रोफेझिन हे उडद्या नियंत्रणासाठी काम करत नाही. फिप्रोनीलच्या फवारणीतून फुलकिडे, तुडतुडे अळी व उडद्या या सगळ्या किडींवर नियंत्रण मिळते. त्याच्या क्रियेची पद्धत वेगळी असल्याने ही किडीमध्ये प्रतिरोधक क्षमताही होण्याची शक्यता कमी होते.

फुलोरा व मणी सेटिंग अवस्था (३१-५०)

उडद्या प्रादुर्भाव दिसत असल्यास या कालावधीत फुलकिंडीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पिनोसॅड व स्पिनेटोराम या फवारणीतूनही नियंत्रण होईल. फिप्रोनीलची फवारणी फुलोरा व त्यानंतर घ्यावयची नसेल, तर पहिल्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत एक फवारणी घ्यावी. पिठ्या ढेकण्यासाठी फुलोऱ्याच्या जवळपास अवस्थेमध्ये जमिनीतून आळवमी करतात. या आळवणीमुळे जमिनीत असणाऱ्या उडद्या किडींच्या अळी अवस्थेचाही बऱ्यापैकी नाश होतो.

मणी वाढीची अवस्था (५०-७५)

यामध्ये मणी सेटिंगनंतर अतिरिक्त कोवळी वाढ असते. ती वेळीच काढत राहावे. द्राक्ष बागेत फुलकिडे, तुडतुडे, उडद्या अळी या बहुतेक सगळ्याच किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. कारण त्यातून एकाच वेळी वेलीची वायया जाणारी अन्नद्रव्ये आणि अनेक फवारण्या वाचू शकतात. या अवस्थेमध्ये फुलकिडे, तुडतुडे, अळी यांचा प्रादुर्भाव दिसल्यास इमामेक्टिन बेंझोएटची फवाारणी प्रभावी नियंत्रण करू शकते.

 

५) मणी वाढीची अवस्था (५०-७५)

यामध्ये मणी सेटिंगनंतर अतिरिक्त कोवळी वाढ असते. ती वेळीच काढत राहावे. द्राक्ष बागेत फुलकिडे, तुडकिडे, उडद्या अळी या बहुतेक सगळ्याच किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. कारण त्यातून एकाचवेळी वेलीची वाया जाणारी अन्नद्रव्ये आणि अनेक फवारण्या वााचू शकतात. या अवस्थेमध्ये फुलकिडे, तुडतुडे, अळी यांचा प्रादुर्भाव दिसल्यास त्यावर इमामेक्टिन बेंझोएटची फवारणी प्रभावी नियंत्रण करू शकते.

होरायजन अवस्था (७५ दिवस)

७५ दिवसानंतर मण्यांवर उडद्या प्रादुर्भाव दिसत नाही. नुकसान फारसे होत नाही, मात्र नवीन अतिरिक्त वाढ वेळोवेळी काढत राहिली पाहिजे.

English Summary: Management of flying beetles in the vineyard after pruning
Published on: 30 October 2021, 07:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)