Horticulture

शेवगा पिके भारतात सगळीकडेकमी अधिक प्रमाणात घेतले जाते.तसे पाहायला गेले तर शेवगा पिकाची उगमस्थाने भारत असून त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळेशेवग्याचा प्रसार जगातील अनेक देशांमध्ये झालेला आहे. भारतामध्ये कर्नाटक,आंध्र प्रदेश, आणि ओरिसा या राज्यात शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात केली जाते

Updated on 16 December, 2021 2:00 PM IST

शेवगा पिके भारतात सगळीकडेकमी अधिक प्रमाणात घेतले जाते.तसे पाहायला गेले तर शेवगा पिकाची उगमस्थाने भारत असून त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळेशेवग्याचा प्रसार जगातील अनेक देशांमध्ये झालेला आहे. भारतामध्ये कर्नाटक,आंध्र प्रदेश, आणि ओरिसा या राज्यात शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात केली जाते

महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव, नगर, नाशिक, सोलापूर येथे जिल्ह्यांमध्ये व्यापारी तत्त्वावर शेवगा लागवड केली जाते. थोडेसे अचूक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेवगा पीक उत्तम रित्या येते. या लेखात आपण शेवगा पिकाच्या फुल गळआणि खत व्यवस्थापन या विषयी माहितीघेऊ.

 शेवगा पिकाचे परागीकरण व फुलगळ व्यवस्थापन

 आपल्याला माहित आहेच की शेवगा पिकाला अनेक वेळेस वर्षभर फुले येत राहतात. परंतु यामध्ये प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि एप्रिल ते मे या काळात आर्थिक फायदा मिळवून देतील  या प्रमाणात फुले जास्त येतात.जर आपण शेवगा पिकावरील परागीकरण याचा विचार केला तर फुल उमलले नंतर परागकण सकाळी नऊ ते दहा आणि त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा ते सात या वेळेत जास्त सक्रिय असतात.

शेवगा पिकामध्ये परागीभवन क्रियेत मदत करणारे घटक जसे मधमाशी उपलब्ध असल्यास फळधारणा हि एकूण फुलांच्या 64 ते 68 टक्के इतके असते.धर्म तमाशा नसल्या तर फळधारणा केवळ 42 ते 47 टक्के इतके असते. याचा अर्थ एकंदर 50 टक्के उत्पादन हे केवळ मधमाशांच्या उपस्थितीत वाढते.जय शेतकरी मधमाशा पालन आणि सोबत शेवगा लागवड करू इच्छितात त्यांनीवीस ते पंचवीस शेवगा रोपांच्या साठीएक मधमाशांचे लाकडी बॉक्स ठेवण्यासहरकत नाही.

 शेवगापिकामध्ये निसर्गतः फुल गळ होत असते..जास्त प्रमाणात होणारी फुलगळ ही वातावरणातील बदल, जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता किंवा रोग-किडींचा प्रादुर्भाव यामुळे होत असते. त्यामुळे शेवगा पिकावर कीड व रोगांचे नियंत्रण करणे फार महत्त्वाचे आहे.भिजवा फुलोरा मध्ये असते व भरपूर शेंगा लागाव्यात यासाठी नॅपथील ऍसिटिक ऍसिड( एन ए ए) 10 पीपीएम तीव्रतेचा किंवा 2-4-5 टी या संजीवकाचा दहा पीपीएम तीव्रतेचा फवारा किंवा पाच ग्रॅम 00:52:34प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तसेच मार्च आणि जुलै महिन्यात0.2टक्के सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतल्यास ही फुलगळकमी होते. ऑल उमलल्या नंतर 65 ते 75 दिवसात फळजास्तीत जास्त लांबी आणि वजन प्राप्त होते.

 शेवगा पिकाचे खत व्यवस्थापन

 शेवगा पिकाला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत.  लागवड केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला 100 ग्रॅम 18:46लेखात दिले तर फायद्याचे ठरते. पुढच्या तीन महिन्यांनी 10:26:26 एखाद दीडशे ग्रॅम द्यावे व पाणी असल्यास मार्चमध्ये 18:18:10 हे खत द्यावे. याप्रमाणे जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे दरवर्षी खत मात्रेत 50 ग्रॅमनेवाढ करावी.शेणखत किंवा लेंडीखत छाटणी झाल्यानंतर द्यावी.शक्य असेल तर निंबोळी पेंड व गांडूळ खताचा वापर करावा.

English Summary: management of drumstick flower dropping and pollination and fertilizer management
Published on: 16 December 2021, 02:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)