Horticulture

केळी हे सर्वांचे आवडते फळ आहे.केळी पिकाची लागवड तसेच सर्व दूर होऊ लागली आहे.परंतु जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार म्हणून संबोधले जाते.जळगाव जिल्ह्यात असलेली काळी माती आणि तापी काठची पिवळ्या गाळाची माती केळी पिकासाठी उपयुक्त आहे.या लेखात आपण केळी लागवडीचे व्यवस्थापन आणि खोडवा व्यवस्थापन याविषयी माहितीघेऊ.

Updated on 17 November, 2021 12:09 PM IST

केळी हे सर्वांचे आवडते फळ आहे.केळी पिकाची लागवड तसेच सर्व दूर होऊ लागली आहे.परंतु जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार म्हणून संबोधले जाते.जळगाव जिल्ह्यात असलेली काळी माती आणि तापी काठची पिवळ्या गाळाची माती केळी पिकासाठी उपयुक्त आहे.या लेखात आपण केळी लागवडीचे व्यवस्थापनआणि खोडवा व्यवस्थापन याविषयी माहितीघेऊ.

 केळी लागवडीचे नियोजन

 केळी पिकासाठी उपयुक्त जमीन- केळीलामध्यम ते भारी जमीन मानवते.पाण्याचा उत्तम निचरा होणारी भरपूर हिरवळीचा बायोमास,काडीकचरा असलेली सुपीक जमीन असावी.ज्या जमिनीत केळी लागवड करायचे आहे त्या आधी हिरवळीचे पीक म्हणजेच मुग,उडीद,चवळी,मठ, हरभरा इत्यादी द्विदल पीक परिपक्व करून  त्याचे उत्पादन घेऊन बायोमास जमिनीत टाकावा.सुरुवातीला शेणखताचा भरपूर वापर करावा.

 केळीचे प्रमुख वाण

  • श्रीमंती-केळीची उंच वाढणारी जात आहे.या जातीचे केळीचे घड15 ते 35 किलो पर्यंत येतात.
  • बसराई- हि ठेंगणी जात आहे. 15 ते 20 किलो पर्यंत सागर येतो.साडे चार बाय साडे चार फुटावर लागवड करतात.
  • ग्रँड नैन-ही जात उंच वाढणारे असून 20 ते 45 किलो पर्यंत घडयेतो. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम आकाराची केळी व जास्त फण्यायेतात.त्यामुळे विक्रीच्या व उत्पादनाच्या दृष्टीने तिला मागणी जास्त असते. लागवड ही 5.5×5.5 फुटावर किंवा 6×4.5 फुटावर करतात.6×4.5 फुटावर लागवड करताना दोन रोपांत सहा फूट व दोन ओळीत 4.5 कोटा अंतर ठेवून झिकझाक त्रिकोणातलागवड करावी.म्हणजे दोन झाडात सहा फूट अंतर ठेवून ओळी वाढून झाडांची संख्या वाढते.

केळीचा हंगाम

  • मृग बाग-जून किंवा जुलैत लागवड
  • कांदेबाग- ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये लागवड
  • रामबाग- डिसेंबर ते जानेवारी मध्ये लागवड

केळीच्या कंदांची निवड

केळी लागवडीसाठी कंद मुनवे रोगमुक्त नैसर्गिक बागेतून निवडावी.एकंदर तीन ते चार महिने वयाचे 500 ते 750 ग्रॅम वजनाचे असावे. सर्व साधारण चार ते सात चक्री असलेला कंद निवडावा. कंद लागवड करताना बीजामृत मधे बुडवून करावी.  दर पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी जीवामृत तर दुसरी आंबट ताकाची करावी.

 

 केळीचा खोडवा

 केळीचा खोडवा घेताना केळी निसल्यावर एक पिल प्रत्येक ओळीत कुठल्याही एका बाजूला वाढुद्यावा व बाकीचे पिल कापत राहावे.कापणीनंतर तो खांब कापू नये. फक्त शेंडा कापून पानाच्या आच्छादन करावे.खांबजशाचा तसा उभा राहू द्यावा.खांबवरून हळूहळू सुकत जाऊन त्यातील अन्नद्रव्ये पिल बाग साठी ठेवलेल्या झाडास मिळते.पहिल्या पिकास जसे व्यवस्थापन केलेतसेच पिल बागेस करावे. झाडे निसल्यावर पिल सोडल्याने चार महिन्याचा कालावधी आधीच पील सोडल्याने पुढील पीक चार महिने आधी आपल्या हातात येते.असे अनेक खोडवे घेऊ शकतात.

 केळी खोडवा पिकाचे फायदे

1-खोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागत,रोपे,नवीन लागवडीचा खर्च करावा लागत नाही.

2-मातृ पिकाचे सारी शोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते.पिकाची वाढ लवकर होते व पीक लवकर तयार होते.

3-खोडवा पिकाचे उत्पादन पहिल्या पिकापेक्षा निश्चितपणे अधिक असते.

English Summary: management of banana crop and useful technology for good producction
Published on: 17 November 2021, 12:09 IST