सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडूनिंबाच्या निंबोळ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशा पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून वर्षभरासाठी साठवून ठेवाव्यात. त्यासाठी घरगुती निंबोळी अर्क तयार करून त्याचा वापर केल्यास खर्चात बचततीसह पर्यावरणाचे संतुलित साधण्यास मदत होते.
कडुनिंबाच्या बियांमध्येअॅझाडि्रॅक्टिन, निंबिन, नींबिडीन, निंबोणीन, निंबीस्टेलॉल,मेलॅट्रीयाल असे अनेक महत्त्वाचे रासायनिक घटक आहेत. हे घटककिडीच्या नियंत्रणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. यांच्या वापराने मित्र कीटकांचेआणि पर्यावरणाचे संवर्धन होते.पावसाळ्याच्या सुरुवातीला शेत परिसरातील कडू लिंबाच्या झाडाच्या पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा कराव्यात.साल व गर काढलेल्या निंबोळ्या बीया सावलीत कोरड्या जागी वाळवाव्यात. पुढे वापरासाठी कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. वर्षभरात कीड प्रतिबंधासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचा अर्क काढून वापरता येतो.
- निंबोळी पासून पाच टक्के अर्क तयार करण्याची पद्धत:-
सावलीत वाळवलेल्या 5 किलो चांगल्या कुटून बारीक करून घ्याव्यात. फवारणीच्या आदल्या दिवशी ही 5 किलो पावडर रात्रभर 9 लिटर पाण्यात भिजत घालावी. सकाळी ते द्रावण फडक्याने चांगले गाळून घ्यावे. दाबून जास्तीत जास्त निंबोळीचा आर्क मिळवावा.या अर्कात 90 लिटरपर्यंत पाणी मिसळावे.
1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम धुण्याची पावडर किंवा साबण चुरा भिजत घालावा. हे द्रावण अन्य 9 लिटर पाण्यात मिसळून साबण चुऱ्याचेद्रावण तयार करावे.दुसऱ्यादिवशी निंबोळी अर्क व साबणचुऱ्याचे10 लिटर द्रावण एकत्र करावे.एकूण 100 लिटर द्रावण तयार होईल.त्यानंतर हे द्रावण फवारणीसाठी वापरावे.
हा निंबोळी अर्क पानावर योग्य रीतीने पसरणे व टिकून राहण्यासाठी कपडे धुण्याची पावडर किंवा साबण चुरा मिसळणे गरजेचे आहे.
- वापर व प्रमाण:-
निंबोळी अर्काचा वापर कापूस, सोयाबीन, तूर,मूग व भाजीपाला यांसारख्या खरीप पिकांवर करता येतो.
निंबोळी अर्क ( 5 टक्के ) पाच मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
निंबोळी अर्कावरकिडीवर होणारा परिणाम:-
- भक्षण रोधक:- पाण्यावर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने कडू बनतात.किडी असे पाणी खाण्यासटाळतात. किडीचा उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या मरतात.
- अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा:- कडू वासामुळे पिकाच्या पानांवर फुलांवर कोवळ्या शेंड्यांवर मादी कीटक अंडी घालत नाही त्यामुळे पुढील पिढी तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.
- प्रजोत्पादन प्रक्रियेत अडथळा येणे:- निंबोळी अर्काची फवारणी मुळे किडी मध्ये नपुसकता येते.नर-मादी मध्ये लिंग आकर्षण कमी होते. परिणाम: पुढील पिढी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
- पिकापासून परावृत्त करणे :- निंबोळी अर्काच्या कडू वासामुळे कीड दिखा जवळ येत नाही.
- किडीच्या कात टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येणे:-किडीचीनैसर्गिक वाढ होताना अळीअगर पिल्लू अवस्थेत शरीरवाढीसाठी नियमित कात टाकणेखूप आवश्यक असते.निंबोळी अर्काची फवारणी मुळे त्यात व्यत्यय येतो.
- अविकसित प्रौढ तयार होणे:- कोषावस्थेतुन निघालेल्या प्रौढ किड्यांमध्ये विकृती, अपंगत्व येणे,अविकसित पंखा तयार होतात. त्याच बरोबर प्रजोत्पादन क्षमता मंदावते आणि पुढील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते
- जीवन कालावधी कमी होणे :- निंबोळी अर्काच्या संपर्कात आलेल्या किडीच्या विविध अवस्थांवर घातकपरिणाम होऊन त्यांचा जीवन कालावधी कमी होतो.
- निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे:-
- निंबोळी खर्च अत्यल्प असतो.
- नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही.
- निंबोळी अर्क बनवणे. हाताळने व वापरणे सोपे आहे.
- घातक किडींना प्रतिबंध, नियंत्रित करीत असले तरी नैसर्गिक शत्रू, मित्र किटकांसाठी फारसे हानीकारक ठरत नाही.
- रासायनिक कीटकनाशकांचा द्वारे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल टाळता येईल.
- निंबोळी अर्क / पेंड वापरल्यामुळे जमिनीतील सुत्रकृमी, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात.
Published on: 26 February 2022, 07:45 IST