Horticulture

राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे ही योजना होय. योजना फेब्रुवारी 2016 रोजी राज्य मंत्रिमंडळात मंजूर झाली. या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.

Updated on 24 October, 2021 12:46 PM IST

राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे ही योजना होय. योजना फेब्रुवारी 2016 रोजी राज्य मंत्रिमंडळात मंजूर झाली. या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.

या योजनेचे उद्दिष्ट आहे की टंचाईग्रस्त भागामध्ये पाण्याचा स्त्रोत निर्माण करणे होय. तसेच तेथील जमीन लागवडीकरिता आणण्याचे उद्दिष्ट सरकारचेहोते. यासाठी या योजनेचे आयोजन केले आहे. शेती उत्पन्नामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरते.

 या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण सर्वात मोठ्या आकाराचे शेततळे 30×30×3 मीटर असून सर्वात कमी आकाराचे 15×15×3 मिटर आहे.

मोठ्या आकाराच्या शेततळ्यासाठी रुपये पन्नास हजार इतके किमान अनुदान देण्यात आले आहे. 50 हजार रुपये पेक्षा जास्त खर्चझाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याने स्वतः करायची आहे. शेततळ्याची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागेल.

शेततळ्यासाठी असणाऱ्या अटी

  • कृषीविभागाने म्हणजेच कृषी सहाय्यक,कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे करणे बंधनकारक आहे.
  • शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजाती वनस्पतीची लागवड करावी तसेच शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी देखील शेतकऱ्यांची राहील.
  • पावसाळ्यामध्ये तळ्यात गाळ वाहून येणार नाही व साचणार नाही याची व्यवस्था लाभार्थ्यांनी करावी.
  • शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावी लागेल.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • http://egs.mahaonline.gov.inया संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
  • अर्ज भरण्यासाठी प्रोफाइल वरून लॉगिन करा. व्यक्तिगत किंवा सामूहिक शेततळे हा पर्याय निवडा. त्यानंतर अर्ज दाखल करून एप्लीकेशन नंबर लिहून ठेवा.
  • उल्लेख केलेल्या कागदपत्रांचा पीडीएफ मध्ये अपलोड करून सबमिट करा.
  • डाऊनलोड केलेल्या फॉर्मवर सही करण्यासाठी जिथे जागा असेल तीथे सही करा.
  • तसेच दारिद्र्य रेषेखालील दाखला( असेल तर ), आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस दाखला( असेल तर),सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.
English Summary: magel tyala shettale yojana process condition and process of application
Published on: 24 October 2021, 12:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)