Horticulture

बाजारपेठेतील मागणी चा विचार करून काळाच्या ओघात पीक पद्धतीत बदल करणे फार गरजेचे आहे. उत्पादनवाढीसाठी देखील ते अतिशय महत्त्वाचे आहे.

Updated on 07 March, 2022 2:54 PM IST

बाजारपेठेतील मागणी चा विचार करून काळाच्या ओघात पीक पद्धतीत बदल करणे फार गरजेचे आहे. उत्पादनवाढीसाठी देखील ते अतिशय महत्त्वाचे आहे.

त्यामुळे पारंपारिक पिकांवर भर न देता त्यामध्ये बदल करून  विविध नवीन प्रकारच्या पिकांची लागवड करून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत राहणे फार गरजेचे आहे. जर आपण फुलशेतीचा विचार केला तर फुल  शेतीमध्ये लिली फुलांची लागवड ही अतिशय आणि सर्वोत्तम पर्याय आहे. फुलांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. निव्वळ भारतातच नाही तर जगभरातून फुलांना सतत वाढती मागणी आहे. लिलीच्या फुलांचा उपयोग विशेषतः सजावटीसाठी जास्त प्रमाणात केला जातो. यामध्ये वेगळ्या रंगाचे फुलांचे  प्रकार असून शेतकरी लिली फुलांची लागवड करून उत्पन्नाची नवीन दारे उघडी करू शकतात.लीली ही जात विदेशी फुलांची असली तरी भारतामध्ये ती दिवसागणिक प्रसिद्ध होत आहे. जर लिलीची लागवड पॉलिहाऊसमध्ये केली तर वर्षभर उत्पादन घेणे शक्य आहे. पण  अजूनही आपल्याकडे लिलीच्या फुलांचा लागवडीला व्यावसायिक स्वरूप आलेले नाही. सध्या भारताचा विचार केला तर हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश तसेच आंध्र प्रदेश मध्ये लिलीची  लागवड शेतकरी करतात. सध्या काही प्रमाणात महाराष्ट्रात देखील लिली लागवड केली जात आहे.

लिली फुलांची लागवड पद्धत

 लिली ची लागवड तीन टप्प्यांमध्ये केले जाते. यात पहिल्या टप्प्यात टिशू प्रक्रियेतून नर्सरी तयार करतात. हे काम मोठ्या प्रयोग शाळा किंवा कंपन्यांमध्ये केले जाते. दुसऱ्या टप्प्यात नर्सरीत लागवड केली जाते. या वनस्पतीला फुले मिळत नाहीत तर कंद मिळतात. तिसऱ्या टप्प्यात एकंदर भांड्यांमध्ये लावले जातात व यातूनच फुले मिळतात. डोंगराळ राज्यांमधील वातावरण लिली फुलासाठी अनुकूल आहे. अशा भागातील शेतकरी पॉलिहाऊस शिवाय उघड्यावर ही लिलीची लागवड करू शकतात. तर मैदानी भागात लिली लागवडीसाठी पॉली हाऊसची  आवश्यकता असते.

पॉलिहाऊसमधील लिली लागवड

 पॉलिहाऊसमध्ये लागवडीसाठी अडीच किलो कोकोपीट,अडीच किलो गांडूळ खत, अडीच किलो स्ट्रा आणि पाच किलो कोळशाची राख आवश्यक आहे. या सर्वांचे एकंदरीत मिश्रण लागवड करणार असलेल्या क्षेत्रावर टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर कंदाची लागवड करावी लागते. कंद वाढायला तीन महिने लागतात पण याच काळात चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन केले तर नुकसान टळणार आहे. लागवडीनंतर तीन महिन्यानंतर कंद तयार होते आणि त्यानंतर त्याची मुळासकट काढणी केली जाते.

 आपल्या देशातील उपलब्ध बाजारपेठ

 लीली फुला च्या माध्यमातून भरघोस उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडते. मात्र ज्याप्रमाणे कांद्याच्या रोपाला मागणी आहे त्याचप्रमाणे या लीली फुलांचे कंद विकून मोठे पैसे कमवता येतात.जर तुम्हाला कंद विकायचे नसतील तर ते भांड्यात ठेवा आणि फुले वाढवून थेट विका. आधीच तयार केलेले मिश्रण प्रत्येकी तीन कदानी भरलेले आहे.त्यानंतर कंद मिश्रणाने झाकला जातो. 

लागवड केल्यानंतर लगेच पाणी फवारणे महत्त्वाचे आहे.सात दिवसानंतर पॉलिहाऊस चे तापमान 20 ते 25 अंश यावर निश्चित करणे योग्य आहे. लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी हिरवी कमी दिसते आणि त्यानंतर लगेचच फुले फुलतात. लिली ची लागवड सध्या भारतात फारच कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांशीआधीच  व्यवहार करतात व त्याचा फायदा असा होतो की शेतकऱ्यांना बाजारात जाण्याची गरज पडत नाही.

English Summary: lili flower cultivation is most profitable and benificial for farmer
Published on: 07 March 2022, 02:54 IST