पेरू(guava) हे एक गोड तसेच आंबट फळ म्हणून ओळखले जाते जे की या फळाची झाडे उष्ण हवामानात वाढत असतात. पेरूचा रंग आत मधून पांढरा किंवा लालसर असतो. जर कच्चा पेरू असेल तर त्याचा आतील गाभा सुद्धा परिपक्व झालेला नसतो. परिपक्व असलेला पेरूचा बाहेरचा रंग पिवळा तर आत मधून गाभा मऊ झालेला असतो आणि त्याची चव सुद्धा गोड असते. अनेक पक्षी जास्तीत जास्त पेरू खाण्याकडे लक्ष देत असतात.
पेरू या फळांचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे तर इंग्रजी मध्ये पेरू ला गव्हा असे म्हणतात आणि हिंदी मध्ये अमृद किंवा जाम.
पेरूच्या विविध जाती -
१. पिंक तैवाण पेरू -
बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान पेरू. साधारणपणे या पेरुचे वजन ५०० ग्राम असते जे की आकाराने हा पेरू मोठा असतो. या पेरुचे वैशिष्ट्य म्हणजे आत मधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो जो की चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो. एका शेतकऱ्याने याची बाग धरलेली होती त्यावेळी त्यास या जातीच्या पेरुचे चांगले उत्पादन मिळाले आणि भाव सुद्धा चांगल्या प्रकारे भेटला.
२. लखनवी पेरू -
बाजारात चांगल्या प्रमाणे मागणी असलेला पेरू म्हणजे लखनवी पेरू. लखनवी पेरू हा पिंक तैवान पेरू पेक्षा सर्वसाधारण गोड स्वरूपाचा आहे. मागील काही वर्षांपासून लखनवी पेरू ला चांगली मागणी असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. लखनवी पेरूची भाजी सुद्धा केली जाते जे की ही भाजी चवीला सुद्धा स्वादिष्ट असते. गोवा राज्यात तर लखनवी पेरू पासून आईस्क्रीम तसेच नाताळ च्या दिवशी बर्फी करून वाटली जाते.
हेही वाचा:Guava Farming Business Idea: पेरूच्या लागवडीतून दरवर्षी कमवा 15 लाख रुपयांचा नफा
३. बनारसी -
बनारसी हे पेरूची जात अत्यंत गोड असते जे की कमी प्रमाणात आंबट असते. या जातीची झाडे सुद्धा जोमाने वाढतात तसेच त्यांची उंची पाच ते साडे पाच मीटर असते. या जातीचे फळे गोल्ड आकाराची व पिवळ्या रंगाची असतात. टिकायला सुद्धा या जातीचे फळ मध्यम असते.
४. हरिझा -
हरिझा या जातीचे फळ मोठ्या प्रमाणात उत्पादन देते. या जातीचे झाड सर्वसामान्य साडे तीन मीटर एवढ्या उंचीचे असते. या जातीची फळे हिरवट तसेच पिवळ्या रंगाची असतात. हरिझा ही जात गोड असते तसेच टिकण्यास सुद्धा मदत करते.
५. लाल पेरू -
लाल पेरू या जातीच्या आकाराची फळे मध्यम आकाराची असतात जसे की या जातीची फळे उत्तर कोकण आणि मुंबई च्या भागात आढळतात. या जातीच्या फळाचा गर कडक असतो.
Published on: 24 August 2021, 06:39 IST