Horticulture

महाराष्ट्राचा विचार केला तर 1990 ते 91 पासून रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित फळझाड लागवड ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. तेव्हापासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर खोलवर रुजली.

Updated on 16 February, 2022 11:56 AM IST

महाराष्ट्राचा विचार केला तर 1990 ते 91 पासून रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित फळझाड लागवड ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. तेव्हापासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर खोलवर रुजली.

संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले एक वरदान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. राज्याचा विचार केला तर 18 लाख हेक्टर ऊन अधिक क्षेत्रावर सध्या फळबागा उभे आहेत. परंतु अद्याप फळबागा लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी व नियोजन या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या लेखामध्ये आपण फळबाग लागवडीसाठी करायच्यात जमिनीची निवड आणि लागवडीआधी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

 फळबागांसाठी जमिनीची निवड

 आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे. ती हलकी, मध्यम की भारी या सर्वांना परिचित असतेच. जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी. यामध्ये जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा पाण्याचा निचरा कसा आहे? या तीन गोष्टींचा अभ्यास करूनच फळबाग लागवडी साठी जमिनीची निवड करावी. जमिनीची निवड करताना निचरा उत्तम असणे आवश्यक आहे.

 फळबागेसाठी कमीत कमी एक मीटर खोली नंतर मुरुमाचा थर असणारी जमीन  निवडावी.भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोटाची जमिनीचा सामू सहा ते साडेसात पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे.जमिनीचा उतार दोन ते तीन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायचे आहे त्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण करून घेणे आवश्‍यक आहे. फार खोल असणाऱ्या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, सोपान जमिनी यातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसतात. परंतु कालांतराने वाढीचा वेग मंदावतो व उत्पादन मिळत नाही. काही वेळा झाडे मरण्याचे संभावना अधिक असते. तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही.

 माती परीक्षण करण्यासाठी फळबाग लागवड क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा?

फळबाग लागवड करण्याकरिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा. सर्वप्रथम  तीन बाय तीन बाय तीन फूट खोलीचा म्हणजे 100 सेंटीमीटर किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पुष्ट भागापासून प्रत्येक फुटातील प्रातिनिधिक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासणीसाठी पाठवावा. माती परीक्षण प्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे. आपली विहीर अथवा बोर चे पाणी क्षारयुक्त व मचूळ असू नये ते गोड असावे देवा माती सोबतच पाण्याचेही रासायनिक परीक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगाने फळ झाडांची  निवड करावी.

English Summary: land selection and taking sample method of soil testing is important in orchred cultivation
Published on: 16 February 2022, 11:56 IST