एक्वापोनिक्स शेतीविषयी अल्पशी माहिती
(About Aquaponics Farming In Marathi)
शेतकरी मित्रांनो आपण सर्व जाणतो कि आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो. शेतीचा आपल्या देशाच्या अर्थाव्यवस्थेत खुप मोलाचा वाटा आहे. मानवी जीवनाच्या प्रारंभापासूनच जगात शेती केली जात आहे. कारण कोणतेही पीक घेतल्याशिवाय आणि शेती केल्याशिवाय कोणतेही अन्न उत्पादन होऊ शकत नाही.
शेतीसाठी योग्य माती, सूर्यप्रकाश, पाणी आणि खत आवश्यक असते. या साहित्याचा वापर केल्याशिवाय शेती करता येत नाही. शेतीमध्ये पिके किंवा झाडे काही महिन्यांत किंवा वर्षांत प्रथम जमिनीत रोपे किंवा बिया लावून तयार केली जातात.
आता शेतकरी राजा हळूहळू आधुनिक शेतीकडे आगेकूच करत आहे.आता बदलत्या काळानुसार, नवीन तंत्रांचा वापर करून माती व्यतिरिक्त पाण्यात भाजीपाला पिकवता येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तंत्राबद्दल सांगणार आहोत ज्याला "Aquaponics Culture" म्हणतात.
आज या एक्वापोनिक्स तंत्राचा वापर करून कमी पाण्यात चांगले पीक तयार केले जात आहे. जर तुम्हालाही हे तंत्र वापरून शेती करायची असेल. तर या लेखात तुम्हाला एक्वापोनिक्स शेती म्हणजे काय याची संपूर्ण माहिती दिली जात आहे.
एक्वापोनिक्स शेती म्हणजे नेमकं काय?
एक्वापोनिक्स शेती अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते, पण भारतात एक्वापोनिक्स चे शेत बंगलोर मध्ये आहे. हे भारताचे सर्वात मोठे आणि पहिले एक्वापोनिक्स शेत आहे,ज्याला माधवी फॉर्म असे म्हणतात. या एक्वापोनिक्स तंत्रात पाण्याच्या टाक्या किंवा लहान तलाव तयार केले जातात, ज्यात मासे ठेवले जातात. या माशांच्या विष्ठेने पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढते. हे पाणी तयार टाकीत घातले जाते.
या टाकीमध्ये मातीऐवजी नैसर्गिक फिल्टरचा वापर केला जातो आणि वनस्पती मातीऐवजी पाण्यातून आवश्यक पोषकद्रव्ये शोषून घेतात. यानंतर, हे पाणी पुन्हा फिश टँकमध्ये टाकले जाते. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली जाते, जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही. या तंत्राचा वापर करून वाळवंट प्रदेशात , खारट ठिकाणी, रेताड जमिनीत, बर्फाळ प्रदेशात अशा ठिकाणी पीक सहज घेता येते.
यामुळे, देशात स्थित लाखो हेक्टर नापीक जमीन शेतीसाठी वापरता येईल. या तंत्राचा वापर केल्याने, उपजीविकेचे साधन देखील वाढेल आणि सामान्य शेतीच्या तुलनेत एक्वापोनिक्स तंत्राचा वापर केल्यामुळे 90% पाण्याची बचत होईल. या तंत्रात पीक जमिनीच्या पिकापेक्षा तीनपट वेगाने वाढते. ही पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे, जमिनीत लागवडीच्या तुलनेत या तंत्राचा वापर करून पिकवलेल्या पिकामध्ये 40% पर्यंत अधिक पोषक तत्त्वे असतात. या व्यतिरिक्त, मासे खाण्यासाठी वापरले जाऊ शकता आणि विकून चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतात.
बरं शेतकरी मित्रांनो एक्वापोनिक्स शेतीविषयी महत्वाची माहिती जाणुन घ्या
एक्वापोनिक्स हे एक पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ मॉडेल आहे, ज्यामध्ये हायड्रोपोनिक्सला मत्स्यपालनासह एकत्र करून शेती केली जाते.
»एक्वापोनिक्स तंत्रात, मासे आणि वनस्पती एकाच यंत्रनेत एकत्र वाढतात.
»वनस्पतींना माशांच्या विष्ठेपासून सेंद्रिय खत मिळते, जे पाणी शुद्ध करते आणि संतुलित वातावरण निर्माण करते.
»तिसरा सहभागी म्हणजेच सूक्ष्मजीव किंवा नायट्रायफायिंग बॅक्टेरिया माशांमध्ये असणाऱ्या अमोनियाचे नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. वनस्पतींच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर आहे.
»या हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये, झाडे मातीशिवाय पाण्यामध्ये वाढतात, जिथे मातीची जागा पाण्याने घेतली जाते.
»या प्रक्रियेसाठी नैसर्गिक किंवा कृत्रिम तलाव, गोड्या पाण्याचे तलाव किंवा समुद्रात योग्य तंत्रज्ञान आणि उपकरणे याची आवश्यकता असते.
»
या प्रकारच्या शेतीमध्ये, मासे आणि मोलस्क सारख्या जलीय प्राण्यांचा विकास, कृत्रिम प्रजनन आणि साठवण केली जाते.
»एक्वाकल्चर म्हणजे एकाच प्रजातीच्या प्राण्यांचे उत्पादन घेतले जाते जे मांस किंवा अन्य उप-उत्पादनांचे स्वरूपात असते.
मासेमारी हे याचे उत्तम उदाहरण आहे.
मित्रांनो आता एक्वापोनिक्स शेतीचे काही फायदे आपण जाणुन घेऊया
»चांगले आणि जास्तीचे उत्पन्न (सामान्यपेक्षा 20-25% जास्त) आणि दर्जेदार उत्पादन.
» ज्या जमिनी लागवडीयोग्य नाहीत जसे की: - वाळवंट, खारट, वालुकामय, बर्फाळ इत्यादी शेतीसाठी वापरता येतात.
»वनस्पती आणि मासे दोन्हीचा खाण्यासाठी आणि उत्पन्नासाठी वापर केला जातो.
Published on: 05 September 2021, 11:21 IST