Horticulture

कोकणामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी महत्त्वाची कंद पिके म्हणजे रताळी, कनगर वडीचा अळू, भाजीचा अळू, करांदा, सुरण आणि शेवर कंद ही आहेत. एक कंदांची लागवड कशा प्रकारे करतात याबद्दलची माहिती या लेखात घेऊ कनगर 1- जमीन – कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रियपदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी. भुसभुशीत जमिनीमध्ये मोठ्या आकाराचे व गुळगुळीत पृष्ठभाग असलेलेकंद पोसले जातात. 2- पूर्वमशागत – नांगरून किंवा खोदून जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी 10 मेट्रीक टन या प्रमाणात शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळावे. त्यानंतर 90 सेंटिमीटर अंतरावर सरी वरंबे तयार करावेत. 3- जाती – कनगरा च्या कोकण कांचन या जातीची लागवड करावी.

Updated on 24 June, 2021 1:22 PM IST

 कोकणामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी महत्त्वाची कंद पिके म्हणजे रताळी, कनगर वडीचा अळू, भाजीचा अळू, करांदा, सुरण आणि शेवर  कंद ही  आहेत. एक कंदांची लागवड कशा प्रकारे करतात याबद्दलची माहिती या लेखात घेऊ

 कनगर

  • जमीन – कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रियपदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी. भुसभुशीत जमिनीमध्ये मोठ्या आकाराचे व गुळगुळीत पृष्ठभाग असलेलेकंद पोसले जातात.
  • पूर्वमशागत – नांगरून किंवा खोदून जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी 10 मेट्रीक टन या प्रमाणात शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळावे. त्यानंतर 90 सेंटिमीटर अंतरावर सरी वरंबे तयार करावेत.
  • जाती – कनगरा च्या कोकण कांचन या जातीची लागवड करावी.
  • लागवड- पाणी देण्याची सोय असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवड करावी. सरीमध्ये 60 सेंटिमीटर अंतरावर कंद लावून  मातीने झाकावेत व ताबडतोब पाणी द्यावे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे. अन्य ठिकाणी मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर वरंब्यावर कंद लावावेत. लागवडीकरिता 120 ते दीडशे ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. एक गुंठा क्षेत्रावर लागवडीकरिता 180 ते 200 कंदांची आवश्यकता असते.
  • खते – एक गुंठा क्षेत्रासाठी लागवडीच्या वेळी 400 ग्रॅम नत्र, 300 ग्राम स्फूरद  व 400 ग्रॅम पालाश द्यावे. लागवडीनंतर एका महिन्याने 400 ग्रॅम नत्र द्यावे. लागवडीच्या वेळी द्यावयाचा हप्ता खड्ड्यात विभागून द्यावा व लागवडीनंतर चा हप्ता कडे पद्धतीने द्यावे.
  • आंतर मशागत – लागवडीनंतर वेलास आधार द्यावा. आधारा करिता झाडांच्या सुक्या फांद्या किंवा शक्य झाल्यास बांबू, नायलॉन दोरी व प्लास्टिक सुतळी यांचा वापर करावा. जेथे सरीवर लागवड केलेली असेल अशा ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर वरंब्याची माती ओढून लागवड केलेल्या सरीचे  रुपांतर वरंब्यात  करावी. लागवडीनंतर खते देताना मातीची भर देऊन वरंबे पुन्हा सुधारावेत. आवश्‍यकतेनुसार पिकाची बेणणी करावी.
  • पीकसंरक्षण – पाने कुरतडणाऱ्या अळ्या व पानावरील बुरशीजन्य रोग यांचे निराकरण करण्यासाठी प्रतिलिटर पाण्यात दीड मिली एन्डोसल्फान व दोन ग्रॅम कार्बन डान्सिंग या प्रमाणात मिश्रण घेऊन फवारावे.
  • काढणी व उत्पन्न – लागवडीनंतर सुमारे साडे सहा ते सात महिन्यांनी वेलाची पाने पिवळी पडू लागतात. या वेळेस प्रथम वेली अलग करून नंतर कंदाची काढणी काळजीपूर्वक करावी. हेक्‍टरी 18 टन उत्पन्न मिळते.
  • साठवण – पुढील हंगामामध्ये बियाणे म्हणून कंद वापरण्यासाठी लिटर पाण्यात दोन ग्रॅम बाविस्टीन व दोन मिली मोनोक्रोटोफास या प्रमाणात द्रावण तयार करून त्यामध्ये कांदा बियाणे किमान अर्धा तास बुडवून काढावेत. असे कंद मडक्यात, राखेत  किंवा वाळू मध्ये साठवून ठेवावे.

 

इतर कंद पिके

 कोकणामध्ये घोर कंद, श्वेत कंद, करंदा, सुरण या कंद पिकांची लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते.

  • जमीन – पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी.
  • पूर्वमशागत – लागवडीनंतर ताबडतोब आधाराची व्यवस्था करावी. आधारा करिता झाडांच्या सुक्या फांद्या किंवा शक्य झाल्यास बांबू, नायलॉन दोरी व प्लास्टिक सुतळी यांचा वापर करावा. आवश्यकतेनुसार बेणणी करून भर द्यावी.

 

  • लागवड- पावसाळी लागवड जून-जुलै महिन्यात करावी. पाण्याचा पुरवठा असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पिकाची लागवड करावी. लागवड सरी वरंब्यावर अथवा गादीवाफ्यावर करावी. लागवडीसाठी बेणे म्हणून वापर करावा. शेवर कंदा  साठी बेणे ( फाटा) वापरून लागवड करावी.
  • साठवण – पुढील हंगामामध्ये बियाणे म्हणून वापरायचे कंद काळजीपूर्वक साठवावे लागतात. यासाठी कंद मडक्यात, राखेत किंवा वाळू मध्ये साठवून ठेवावे.

 

इतर कंदाच्या महत्त्वाच्या जाती

  • घोर कंद – कोकण घोरकंद ही गोलाकार वाढणारी जात असून कंद आतून पांढरे असून चवीला उत्तम असतात. या जातीच्या वेलावर कंद धरतात  ते लागवडीसाठी वापरता येतात. सरासरी उत्पन्न पंधरा टन प्रति हेक्‍टरी मिळते.
  • वडीचा अळू – कोकण हरितप्रणी ही जात कंद तसेच पानापासून वड्या तयार करण्यासाठी वापरतात. पान वड्या करण्यासाठी गुंडाळा करताना फाटत नाही. बंद खाताना खवखवत  नाहीत. कांदा चे उत्पन्न सुमारे पाच ते सहा टन प्रति हेक्‍टरी मिळते.

 

English Summary: kand pike lagvad
Published on: 24 June 2021, 01:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)