फळबागांचे क्षेत्र वाढावे यासाठीराज्य कृषी विभाग आग्रही आहे. सरकार विविध योजना आणत आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात फळबागा घेतल्या जात आहेत. फळबागा घेतली म्हणजे आर्थिक उत्पन्नाला वेळ असतो असे नाह. फळ पिकांमध्ये आंतरपीक घेऊन आपण अधिकचा आर्थिक नफा मिळू शकतो.
आंतरपीक म्हणून कंद पिकाची योग्य निवड तसेच कमी कालावधीच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे.कंद पिकासाठी वेगळे खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही. कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी मध्ये आंतरपीक म्हणून काही कंदवर्गीय पिकांची लागवड फायदेशीर ठरू शकते. राज्यातील अनेक भागात नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये कांदा पिकाचा समावेश आंतरपीक म्हणून करावा.
कंद पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करताना मुख्य फळपिकांच्या कामांमध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
फळ पिकामध्ये आंतरपीक म्हणून कंद पिकाची योग्य निवड तसेच कालावधीच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे. मुख्य पिकाशी अन्नद्रव्य, पाणी,सूर्यप्रकाश इत्यादी मूलभूत गोष्टींची मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होणार नाही याकडे लक्ष द्यावे. कांदा पिकासाठी वेगळे खत व पाणी व्यवस्थापन केले पाहिजे. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही. आंतरपिकाची लागवड करताना मुख्य पिकाचे वय, लागवडीचे अंतर झाडाचा विस्तार,झाडाची ठेवण, मुळाचा विस्तार, मधल्या जागेतील सूर्यप्रकाशाची उपलब्धता, सिंचन सुविधा, जमिनीचा प्रकार, पिकाचा कालावधी इत्यादी बाबींचा विचार करावा.
मुख्य फळ पिकांमध्ये लागवडीच्या सुरवातीच्या कालावधीत पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध असल्यामुळे कंद पिकाची सलग लागवडी प्रमाणे लागवड करण्यास हरकत नाही. मात्र जसजशेफळ पिकाचे वय व विस्तार वाढेल तसतसे पीकनिहाय कंद पिकाची नेहमीच्या लागवड पद्धतीमध्ये योग्य ते बदल करून घ्यावेत.
- कोणत्या फळबागांमध्ये कोणत्या कंद पिकाचे घेणार आंतरपीक :-
- आंबा – कनगर,घोरकंद,कारादांरताळी
- काजू – कनगर, घोरकंद,कारादांसरताळी
- नारळ– सुरण, वडीचा अळू, आरारूट,घोरकंद,शेवरकंद,अळू
- सुपारी – वडीचा अळू, घोरकंद, सुरण
- आंतरपीक सुधारित जात :-
- सुरण – गजेंद्र
- कनगर – कोकण कांचन, श्री लता
- घोरकंद – कोकणघोरकंद, श्री कार्तिकी
- करांदा – कोकण कालिका
- रताळी – कोकण अश्विनी, कमल सुंदरी
- वडीचा अळू – कोकण हरितपर्णी
- शेवर कंद – श्री जया, श्री विजया
- आंतरपिकासाठी लागवड पद्धती:- आंबा व काजू मध्ये कंद पिकाची लागवड करताना खरीप हंगामात बागेतील मधल्या जागेत कनगर, का रंदा,घोरकंद यासाठी 90 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. रताळी पिकासाठी 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या करून लागवड करावी.
अतिपावसाच्या प्रदेशात कंद पिकांची लागवड जमिनीचा उतार लक्षात घेऊन करावे. रताळ्या सारख्या पिकामुळे जमिनीवर अच्छादन तयार होऊन जमिनीची धूप कमी होते तसेच पाणी मृदा संधारणाचे काम होते.
- नारळ बागेतील आंतरपिके :-
योग्य अंतर ठेवलेल्या बागेमध्ये सूर्यप्रकाशाची उपलब्धता आंतरपिकासाठी होऊ शकते. नारळाच्या बुंध्यापासून 2 मीटर अंतर सोडून मधल्या जागेत आंतरपिके घ्यावीत. सुरणाची लागवड 60 सें.मी. बाय 60 सें.मी. अंतरावर तसेच शेवर कंदाची लागवड 90 सें.मी. अंतरावर सऱ्या करून करावी. वडीचा अळू साठी नेहमीच्या 75 सें.मी. बाय 75 सें.मी. अंतरापेक्षा जवळ लागवड करावी.
घोरकंद लागवड करताना 200 ते 250 ग्रॅम वजनाचे बेणे नारळ झाडाच्या सभोवती 2 मीटर अंतरावर आळे करून त्यांच्या वरंबा वर लागवड करावी.
घोरकंदाच्या वेली नारळाच्या सर्व बाजूनी दोरीच्या सहाय्याने आधार देत चढवाव्यात.सुरण, आरारूट, भाजीचा अळू नारळ बागेतल्या मोकळ्या निचऱ्याच्या जागेत खड्डे करून लागवड करावी. या नंतर या खड्ड्यात मातीचाभरद्यावा.
- सुपारी बागेत आंतरपीक :-
झाडाच्या मधल्या उपलब्ध जागेत सुरण, आरारूट, वडीचा अळू या पिकाची लागवड करता येते. तर घोरकंदाच्या वेली सुपारीवर चौकट करून त्यावरचढविता येणे शक्य आहे.
Published on: 13 March 2022, 03:09 IST