Horticulture

फळ पिकांवर येणारी फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव पेरू व्यतिरिक्त आंबा,सिताफळ, टरबूज,खरबूज, संत्रा, डाळिंब व इतर काही वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर देखील आढळून येतो.

Updated on 03 January, 2022 5:58 PM IST

फळ पिकांवर येणारी फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव पेरू व्यतिरिक्त आंबा,सिताफळ, टरबूज,खरबूज, संत्रा, डाळिंब व इतर काही वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर देखील आढळून येतो.

फळमाशी ची प्रौढावस्था घरी दिसणारे मासे सारखे दिसते व साधारण पाच ते सहा मीमीलांब असते. फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द काथ्या रंगाचा असून पंकज सरळ लांब असतात.फळमाशी साधारणतः पिवळसर सोनेरी दिसते.

 फळमाशी ची मादी माशी सर्व फळांच्या पक्वफळात दोन ते तीन मी मी खोल फळाच्या सालीखाली साधारण दहा शंभर ते दीडशे अंडी घालते. या अंड्यातून साधारण दोन ते तीन दिवसात मळकट पांढरा रंगाचे बिन पायाच्या आळ्या बाहेर पडतात. या अळ्या तोंडाच्या बाजूस निमुळते असतात.अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्याफळातील गरावर आपली उपजीविका करतात. परिणामी अंडी घातलेल्या ठिकाणी फळे सडायला लागतात आणि गळतात.

 फळातील गरावर उपजीविका करत असल्याने फळे सडून गळून पडतात. काही फळे बाहेरून चांगली दिसते तरी आतून खराब वकुजलेलेदिसतात.

 फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन

या किडीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केल्याप्रमाणे रक्षक सापळ्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. विद्यापीठाने शिफारस केलेली प्रति एकर दहा ते बारा फळ माशीचे रक्षक  सापळे पिकाच्या उंचीच्या प्रमाणे चार ते पाच फूट अथवा झाडावर टांगून ठेवावे जर तुम्ही संत्रा,मोसंबी, बोर, केळी,चिकू, आंबा, पेरू, सिताफळ, कलिंगड, भोपळा, कारली व काकडी ही पिके घेत असाल तर 

आपल्या बागेत फळमाशी चे सापळे पहिल्या पावसानंतर लगेच वापरायला हवेत. प्रत्येक फळ पिकामध्ये अकाली व परिपक्व अवस्थेतील फळांची मोठ्या प्रमाणातील गळ होण्यामागचे प्रमुख कारण फळमाशी असते. फळांच्या अपरिपक्व अवस्थेतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा किंवा त्याबद्दलची अज्ञानच होय. फळमाशीचा प्रादुर्भाव फळमाशीच्या ट्रॅप द्वारे शक्य होतो. परंतु कोणत्याही फवारणीमुळे ते शक्य होत नाही.

English Summary: integrated management of fruit fly in orcherd plant and harmful
Published on: 03 January 2022, 05:58 IST