Horticulture

भाजीपाला पिके असो की फळपिके विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. योग्य वेळी त्यांचे व्यवस्थित नियंत्रण मिळवण्यासाठी व्यवस्थापन केले तर होणारे नुकसान टाळता येते. नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो.

Updated on 06 July, 2022 9:02 AM IST

भाजीपाला पिके असो की फळपिके विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. योग्य वेळी त्यांचे व्यवस्थित नियंत्रण मिळवण्यासाठी व्यवस्थापन केले तर होणारे नुकसान टाळता येते. नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो.

या लेखात आपण फुलपिके आणि फळपिके तसेच भाजीपाला पिकांवर आढळणाऱ्या भुरी रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत.

 भुरी रोगाची नेमकी माहिती

 थंड आणि कोरडे हवामान हे भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक असते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव अगदी सुरुवातीला जुन्या किंवा बुंध्याजवळील पानांवर आढळून येतो.

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या पानांवर, फुलांच्या कळीवर तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात. नंतर कालांतराने झाडाची पाने पिवळी पडतात व गळतात.

या रोगाचे सगळ्यात महत्त्वाच्या वाईट परिणाम म्हणजे प्रकाशसंश्‍लेषण क्रियेमध्ये बाधा निर्माण होते. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, वेलवर्गीय भाजीपाला तसेच विविध फुलपिके आणि फळपिकांवर मोठ्या प्रमाणात होतो.

नक्की वाचा:खरीप हंगाम 2022: खरीप हंगाम आला पिकांची लागवड करा परंतु अशा पद्धतीने घ्या काळजी, मिळेल भरपूर उत्पादन

भुरी रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे?

1- यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे पीक लागवडीसाठी वाणांची निवड करताना ती या रोगास सहनशील असतील अशा वाणांची करावी.

2- पीक लागवड करण्याअगोदर जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करून घ्यावे तसेच पिकांची फेरपालट करणे फार गरजेचे आहे.

3- तसेच पिकाला पोटॅश हे अन्नद्रव्य कमी पडले तर या रोगाला पीक बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करून पोटॅश आणि कॅल्शियम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक हे भुरि आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.

4- पिकांच्या प्लॉट मध्ये आद्र्रता टिकवून ठेवण्यासाठी शक्य असल्यास तुषार सिंचनाचा वापर करावा.

 भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक उपाय

1- भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी ऍपेलोमायसेस क्वीस्कवालिस पाच मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा

पिकात फवारणी करावी. कारण ॲपेलोमायसेस क्वीस्कवालिस ची बुरशी भुरी रोगाच्या बुरशीवर उपजिवीका करते त्यामुळे रोग नियंत्रणास मदत होते.

2- कीड आणि रोगांचा विरोधी लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन एक मिली प्रति लिटर तसेच कायनेटिन घटक असणारे किटोगार्ड दोन मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेत पूर्वी दोन वेळा फवारणी करावी.

नक्की वाचा:पीक व्यवस्थापन: 'या' गोष्टी आहेत छोट्या परंतु कमी खर्चात जास्त उत्पादन देण्यासाठी आहेत उपयुक्त

 भुरी रोगाचे रासायनिक नियंत्रण

1- शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा.

यामध्ये गंधक 80% दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी ( वेलवर्गीय पीक उन्हाळा हंगाम वगळता ) मायक्लोबुटानील (दहा टक्के डब्ल्यू) असलेले बुरशीनाशक 0.5 ग्रॅम किंवा झिनेब 68% + हेक्साकोनेझोल (चार टक्के डब्ल्यू) असलेले बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.

वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणात चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल.

नक्की वाचा:कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! कापसातील 'रूट नॉट नेमाटोड'ची लक्षणे आणि व्यवस्थापन

English Summary: integrated management bhuri disease in vegetable crop and orchred
Published on: 06 July 2022, 09:02 IST