जर आपण आंबा पिकाचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बागेमध्ये मोठ्याप्रमाणात मोहोर आलेला असतो. पावसाळा संपल्यानंतर बागांचे साफसफाई केली जाते. त्यामध्ये बागेतील दाट वाढलेला आंबा झाडांच्या फांद्यांची विरळणी करावी.
झाडांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.या लेखात आपण आंब्याच्या मोरा वर प्रामुख्याने येणाऱ्या किडिंचीमाहिती आणि लक्षणे जाणून घेणार आहोत.
आंबेमोहर वर एक पडणाऱ्या किडी आणि व्यवस्थापन
- तुडतुडे-पिल्ले व प्रौढ आंब्याचा मोहोर, कोवळी पाणे यातून या किडी रस शोषतात. परिणामी मोहर व लहान फळांची गळ होते. तुडतुड्यांचा शरिरातुन स्त्रवणाऱ्या मधा सारख्या चिकट पदार्थावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. पाने काळी पडतात.
नियंत्रण
- बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशाप्रकारे फांद्यांची विरळणी करावी.
- वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिलाच्या अवस्थेत असतानाच किटकनाशकांची फवारणी करावी.
- फवारणी प्रति लिटर पाणी- डेल्टामेथ्रीन(2.8 टक्के प्रवाही)0.9मिली
- मोहोर येण्यापूर्वी फवारणी करावी.
बागेतील हापुस,रायवळ अशा सर्व झाडे व त्यांच्या खोडांवर फवारणी करावी. कोडां वरील सुप्तावस्थेतील तुडतुडे यांचे नियंत्रण होते.
फुलकिडे
पिल्ले व प्रौढ फुलकिडे पानाचे साल खरडुन पानातील रस शोषतात.पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होऊन अधिक प्रादुर्भाव मध्ये पानगळ होते. शेंडे शिल्लक राहतात. कोवळ्या फळांवर सालं खरवळल्यामुळे काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाचे होते.
नियंत्रण
1-पालवी वरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 1.5 मिली
- फळांवरील फुलकिडिंच्या च्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी स्पिनोसॅड( 45 टक्के प्रवाही) 0.25 मिली किंवा थायमेथॉक्झाम ( 25%)2 ग्राम
मीज माशी
- प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर, मोहरावर तसेच लहान फळांवर आढळतो.
- मादी माशी सालीच्या आत मध्ये अंडी घालते.अळ्या बाहेर पडल्यानंतर पेशीवर आपली उपजीविका करतात. परिणामी त्या ठिकाणी बारीक,फुगीर, गाठ तयार होते. पूर्ण वाढलेली अळी गाठीला छिद्र पाडून जमिनीवर पडते. शेंडे जळतात. त्यामुळे मोहोर गळतो किंवा वाळतो तसेच मोहराची दांडी वेडीवाकडी होते.
- लहान फळांवर प्रादुर्भाव झाल्यावर वाटाण्याच्या आकाराची फळांची गळ होते.
मीज माशी चे नियंत्रण
1-अळ्या जमिनीत असल्यामुळे झाडाखालची जमीन उकरून त्यात शिफारशीत दाणेदार कीटक मिसळावे.
- झाडाखाली काळे प्लास्टिक अंथरूण घ्यावी. कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्या प्लास्टिकवर पडतात. जमिनीत जाता न आल्याने मरतात.
शेंडा पोखरणारी आळी
- अळी पालवीच्या तसेच मोहराच्या दांड्याला छिद्रपाडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते.
- कीडग्रस्त फांदी तसेच मोहोर सुकून जातो. फांद्यांवर गाठी निर्माण होतात व अशा फांद्या अशक्त राहतात.
या किडीचे नियंत्रण
- सुरुवातीस प्रादुर्भाव कमी असतांना कीडग्रस्त पालवी किंवा मोहोर किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावेत.
लाल कोळी
1-लाल रंगाचे आकाराने अतिशय लहान कोळी उघड्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही.पानामागे त्यानी बनवलेली बारीक जाळी दिसतात. जाळी खाली राहून पानातील रस शोषतात. पाने तेलकट, तांबूस होऊन अर्धवट वाळतात. नंतर भरपूर पानगळ होते.
नियंत्रण
- लाल कोळीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
पाण्यात मिसळणारे गंधक( 80% भुकटी) दोन ग्रॅम अथवा डायकोफॉल दोन मिली
Published on: 02 December 2021, 05:33 IST