Horticulture

बोर हे फळपीक कुठल्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. गाळाची तसेच पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकासाठी चांगली असते. तसेच खारवट किंवा क्षारयुक्त जमिनीत देखील बोरीचे पीक चांगले येते. या लेखात आपण बोर लागवडीसाठी उपयुक्त असलेल्या इनसिटूपद्धती विषयी जाणून घेऊ.

Updated on 12 December, 2021 2:04 PM IST

बोर हे फळपीक कुठल्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. गाळाची तसेच पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकासाठी चांगली असते. तसेच खारवट किंवा क्षारयुक्त जमिनीत देखील बोरीचे पीक चांगले येते. या लेखात आपण बोर लागवडीसाठी उपयुक्त असलेल्या इनसिटूपद्धती विषयी जाणून घेऊ.

बोरफळ पिकाची अभिवृधी

बोरीच्या झाडाची अभिवृद्धी बियांपासून तसेच कलमे करून करता येते. यामध्ये बियांपासून तयार केलेल्या झाडाचे गुणधर्म हे  मातृवृक्षासारखे असतील याची काही खात्री नसते. तसेच असे झाडांपासून फळधारणा उशिरा होते. बोरीच्या झाडाचे सोटमूळ फार लवकर वाढून खोल जाते त्यामुळे कायम जागी बी पेरून तयार केलेल्या खुंटावर डोळे भरणे फायद्याचे ठरते.

पॅच/ ठिगळ पद्धत

जुलै-ऑगस्ट महिन्यात पेन्सिल च्या जाडीचे रोपे झाल्यावर जमिनीपासून25 ते 30 सेंटिमीटर उंचीवर कलम करावे.या उंचीवरील खुटाची पाने काढून टाकावीत. डोळे भरण्याच्या चाकूने खोडावरील साधारणपणे दोन सेंटिमीटर उंच व एक ते दीड सेंटिमीटर रुंद काटकोन चौकोनी आकाराची साल काढून टाकावी. निवडलेल्या डोळा काडीवरील फुगीर डोळ्या सह वरील प्रमाणे आकारमानाचे साल काढून ती खुंटावरील सालकाढलेल्या ठिकाणी बसवावी. डोळा उघडा ठेवून ती खालून वर पॉलिथीनच्या पट्टीने घट्ट बांधावी. डोळा फुटू लागल्यानंतर कलमाच्या पाच सेंटीमीटर वरील भाग छाटून टाकावा.

 ढाल पद्धत

 जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस नसताना खुंटावर पंचवीस ते तीस सेंटिमीटर उंचीवर उभा तीन ते दोन सेंटीमीटर लांबीचा काप घ्यावा. काप देताना आतील लाकडास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.डोळा असलेल्या सालीवर ढालीसारखा काप देऊन डोळा अलगद काढावा. डोळा असलेल्या सालीची लांबी खुंटावरील कापा पेक्षा कमी असावे.म्हणजे डोळा चांगला बसतो. डोळा भरलेला भाग दोन ते तीन सेंटीमीटर  रुंद व 20 ते 25 सेंटिमीटर लांब पॉलिथिन पट्टीनेडोळा सोडून बांधून घ्यावा.डोळा फुटल्यावर खुंटाचा शेंडा कडील भाग कलमाच्या दोन ते तीन सेंटीमीटर वरील बाजूस कापून घ्यावा.

 बोरफळ पिकाची लागवड

बोराच्या  रोपाची हलक्‍या जमिनीत पाच मीटर × पाच मीटर अंतरावर तर मध्यम व भारी जमिनीत सहा मीटर× 6 मीटर अंतरावर लागवड करावी.  लागवडीसाठी 60×60×60 सेंटी मीटर आकाराचे खड्डे करावेत.खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा टाकावा.खड्डा 15 ते 20 किलो शेणखत अधिक एक किलो सिंगल सुपर फॉस्फेटव चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावा.

खड्डा जमिनीच्या वर दहा सेंटीमीटर उंचीपर्यंत भरावा. खड्ड्यामध्ये बिया  एकाच ठिकाणी न लावता 15 सेंटिमीटर अंतरावर त्रिकोणी पद्धतीने तीन बिया लावाव्या. उगवणीनंतर सुमारे सहा ते सात महिन्यांनी खड्ड्यामध्ये एकच जोमदार रोप ठेवावे.  पेन्सिलच्या जाडी ची रोपे तयार झाल्यावर त्यांच्या डोळे भरावे.

 बोर पिकांमध्ये घेता येणारी आंतरपिके

बोरीची लागवड प्रामुख्याने हलक्‍या जमिनीत केली जाते. अशा जमिनीत कस व पोत पिकविण्यासाठी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते.सुरुवातीची दोन ते तीन वर्षे भुईमूग,मुग,भाजीपाला आणि एरंडी सारखी आंतरपीक घ्यावे.

English Summary: insitoo method is benificial in bor fruit cultivation for more production
Published on: 12 December 2021, 02:04 IST