Horticulture

आंबा लागवड ही प्रामुख्याने कोकण विभागात जास्त प्रमाणात केली जाते. तू आता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये आंबा लागवड यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे.आंबा या फळ पिकामध्ये इतर फळपिकांची प्रमाणेच काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो

Updated on 25 November, 2021 12:37 PM IST

आंबा लागवड ही प्रामुख्याने कोकण विभागात जास्त प्रमाणात केली जाते. तू आता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये आंबा लागवड यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे.आंबा या फळ पिकामध्ये इतर फळपिकांची प्रमाणेच काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो

त्यामुळे वेळेत अशा रोगांचा आणि किडींचा बंदोबस्त करणे फायद्याचे असते. या लेखात आपण आंबा या फळ पिकावरील फांदी मररोग याविषयी माहिती घेणार आहोत.

 अंबा फळ पिकावरील फांदी मररोग

  • लक्षणे-बॉट्रीयोस्पेरिया बुरशीचा आंब्याच्या झाडाला झालेला संसर्ग सुकलेल्या फांद्या मधून प्रदर्शित होतो यामुळे पूर्ण पानगळही होऊ शकते. यामध्ये सुरुवातीला झाडाचे खोड रंगहीनहोऊन काळसर पडते. नंतर नवीन फांद्या बुडापासून वरपर्यंत त्याचा परिणाम पानांवर होत नाही तो पर्यंत सुकायला लागतात. पानांच्या शिरा तपकिरी होऊ लागल्यानंतर पाने वरच्या बाजूला गुंडाळली जातात आणि अखेरीस गळतात. शेवटच्या काळात लहान आणि मोठ्या फांद्यातून चिकट स्राव पाझरतो. सुरुवातीला चिकट स्त्रावाचे  थेंब दिसतात. पण जसा या रोगाची लागण वाढत जाते तशी पूर्ण फांदी किंवा खोड ही या चिकट स्त्रावाने भरून जाते. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाची साल किंवा पूर्ण फांदी सुकते आणि चिर पडून फाटते.
  • ही बुरशी झाडांच्या करपलेल्या भागात खूप काळापर्यंत जिवंत राहू शकते. आंब्याच्या झाडाच्या खोडावर आणि फांद्यांवर झालेल्या जखमातुन ही बुरशी आत प्रवेश करते.संसर्गाची तंतोतंत कार्यशैली अजूनही समजलेली नाही. यामध्ये एक शक्यता पकडली जाते की ही बुरशी किड्यांनी झाडाला केलेल्या जखमांमधून किंवा शेतात काम करतेवेळी झालेल्या जखमेतून आत शिरकाव करते. संसर्गाचा प्राथमिक स्त्रोत फांदीच्या मेलेल्या सालीतील बीजाणू असू शकतात.ते झाडाच्यावाढीच्या काळात राहतात आणि पीक काढणीच्या काळात पसरतात.लोह, झिंक आणि मॅगनिज याची कमतरता या रोगाची लागण होण्यास अनुकूल असतात. पाणी आणि गोठण्याचा ताण याच्याशी सुद्धा या रोगाचा संबंध आहे.वर्षातून केव्हाही हा रोग होऊ शकतो पण बहुदा हा रोग वाढीच्या उशिराच्या टप्प्यावर होतो.

 या रोगाचे जैविक नियंत्रण

 या रोगाचे जैविक नियंत्रण करताना बाधित झाडाचे भाग काढून नष्ट करावीत. शेजारची निरोगी फांद्या हीकाढा जेणेकरून या बुरशीचा  पुरता नायनाट होईल.

 या रोगाचे रासायनिक नियंत्रण

  • छाटणी केल्यानंतर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 0.3 टक्के या प्रमाणात जखमांवर लावा.
  • वर्षातून दोन वेळा बोर्डो मिश्रण वापरल्याने झाडांवर या संसर्गाचा प्रमाण कमी होते.
  • थायोफेनेट मिथाईल या बुरशीनाशकाची फवारणी यामध्ये परिणामकारक दिसून आले आहे.
  • झाडाच्या सालीवर चे किडे किंवा क्षिद्रेपाडणारेसुरवंट यांच्या नियंत्रणासाठी बायफेंथ्रीनकिंवा परमेथरिन चा वापर करावा.

 

या रोगावर करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय

  • झाडे निरोगी ठेवा आणि नियमित पाणी द्या.
  • ज्या भागात पोषक तत्वांची  कमतरता आहे किंवा गोठण्याचा ताण येऊ शकतो अशा भागात लागवड करणे टाळा.
  • संभावित संसर्गाच्या लक्षणांसाठी बागेची नियमित निरक्षण करा. जेणेकरून संसर्गाचा सुरुवातीच्या काळातच नियंत्रण करता येईल.
  • झाडांना नुकसान आणि जखम टाळा,कारण द्वारेच बुरशी मध्ये प्रवेश करते.
  • झाडांचा मृत भाग लगेच काढून टाका.
  • संतुलित खत नियोजन करा.

( संदर्भ-plantix)

English Summary: insect and disease management in mango orchard taht symptoms and treatment
Published on: 25 November 2021, 12:37 IST