Horticulture

संपूर्ण भारत देशात डाळिंब पिकाची लागवड केली जाते.

Updated on 25 March, 2022 4:04 PM IST

संपूर्ण भारत देशात डाळिंब पिकाची लागवड केली जाते. राज्यातही डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नाशिक जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. डाळिंब फळाला बारामाही मागणी असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी चांगला मोठा नफा कमवितात. डाळिंब मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने याचे सेवन मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते त्यामुळेच बारामाही डाळिंबाचे सेवन मोठ्या प्रमाणात होते म्हणून याला नेहमीच मागणी असल्याचे बघायला मिळते.चला तर जाणून घेऊ डाळीब पिकाचे व्यवस्थापनफळ तोडणीसाठी तयार असल्यास फळे फुटू नयेत म्हणून नियमित हलके पाणी द्यावे. फळ पक्व झाल्यास लगेचच तोडणी करावी. उशिरा फळतोडणी केल्यास आतील दाणे खराब होण्याची शक्यता असते. तसेच फळे तडकण्याचीही समस्या येऊ शकते.

फळतोडणी झाल्यानंतर लगेच मध्यम ते जास्त छाटणी करावी. यामध्ये रोगग्रस्त, गुंतलेल्या, मोडलेल्या, वाळलेल्या, गर्दी असलेल्या फांद्या काढाव्यात. शिफारशीनुसार सेंद्रिय, रासायनिक खते व जैविक खते द्यावीत. प्रत्येक झाडासाठी २०-२५ किलो शेणखत/ १३-१५ किलो शेणखत + २ किलो गांडूळ खत + २ किलो निंबोळी पेंड/ ७.५ किलो चांगले कुजलेले कोंबडी खत + २ किलो निंबोळी पेंड वापरावी. रासायनिक खतांमध्ये प्रतिझाड २०५ ग्रॅम नत्र (४४६ ग्रॅम नीमकोटेड युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१५ ग्रॅम एसएसपी) आणि १५२ ग्रॅम पालाश (२५४ ग्रॅम एमओपी/ ३०४ ग्रॅम एसओपी) दिल्यानंतर हलके पाणी द्यावे.

जैविक फॉर्म्यूलेशन्स उदा.

ॲझोस्पिरिलम sp., ॲस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि पेनिसिलियम पिनोफिलम यांची स्वतंत्र वाढ करून घ्यावी. त्यासाठी १ किलो जैविक फॉर्म्यूलेशन १ टन चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून सावलीच्या ठिकाणी बेड बनवा. त्यामध्ये ६०-७०% ओलावा राखून दिवसाआड उलथापालथ करत रहावे. साधारणपणे १५ दिवसांत जिवाणूंची चांगली वाढ होते. हे मिश्रण १०-२० ग्रॅम प्रतिझाड वापरावे. आर्बस्क्युलर मायकोरायझा (राइझोफॅगस इर्रेगुल्यारिस/ ग्लोमस इंट्राडॅलिसिस) १०-१५ ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणे द्यावे.

पाणी व्यवस्थापन

डाळिंब हे उष्ण कटीबंधातील फळपीक असून, फार कमी पाणी लागते.

डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्ण बंद करावे.त्यानंतर ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास ठिबक सिंचनने द्यावे.

डाळिंबाची बाग फुलोऱ्यात असताना बेताचे पाणी द्यावे.

गाठ सेठ झाल्यानंतर खालील वेळापत्रकाप्रमाणे पाणी द्यावे.

महिना — लि/दिवस/झाड — महिना —लि/दिवस/झाड

जानेवारी 17 — मे —. 44

फेब्रुवारी 18 —जून — 30

मार्च 30 — जुलै — 22

एप्रिल 40 — ऑगस्ट — 20

डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, मर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

फळ काढणी

शाश्‍वत डाळिंब उत्पादन घेण्यासाठी डाळिंब झाडाच्या वयाप्रमाणे फळांचे उत्पादन घ्यावे.

पूर्ण वाढ झालेल्या झाडाला 60 ते 80 फळे घ्यावीत.

डाळिंबाचे फळ पक्‍व झाले की टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात. फळांचा गोलाकारपणा किंचित कमी होऊन फळांना चपटा आकार येतो.

साधारणतः फुलोऱ्यानंतर 150 ते 210 दिवसांनी आणि फळधारणेनंतर 120 ते 130 दिवसांनी डाळिंब काढणीस येतात.

हे लक्षात ठेवा

शिफारशीत मात्रेनुसार फक्त आवश्यक तेवढ्या फवारण्या घ्याव्यात. एकूण फवारण्यांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. पाऊस झाल्यानंतर अतिरिक्त फवारणी घ्यावी.

प्रत्येक फवारणी करण्यापूर्वी सर्व जीवाणूजन्य डाग किंवा कूज प्रादुर्भावित फळे काढून जाळावीत.

बोर्डो मिश्रण ताजे तयार करून त्याच दिवशी वापरावे.

फवारण्या संध्याकाळी घ्याव्यात.

विश्रांती कालावधीत (१०-१५ दिवसांचे अंतर)

(फवारणी प्रमाण प्रती लीटर पाणी)

बोर्डो मिश्रण (१% )

किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्साईड २ ते २.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिली

डाळिंब बुरशीजन्य स्कॅब, स्पॉट्स आणि रॉट्ससाठी काही उपयोगी बुरशीनाशके

(फवारणी प्रमाण प्रती लीटर पाणी)

मॅण्डीप्रोपामीड (२३.४% एससी) १ मिली किंवा

प्रोपिकोनॅझोल (२५% ईसी) १ मिली अधिक अॅझोक्सिस्ट्रॉबीन १ मिली किंवा

अॅझोक्सिस्ट्रॉबिन (२०%) अधिक डायफेनोकोनॅझोल (१२.५% ​​एससी) २ मिली किंवा

क्लोरोथॅलोनिल (५०%) अधिक मेटॅलॅक्झिल एम. (३.७५%) २ मिली किंवा

बोर्डो मिश्रण (०.५%)

ट्रायसायक्लॅझोल (१८%) अधिक मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) २-२.५ ग्रॅम किंवा

क्लोरोथॅलोनिल (७५% डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा

प्रोपिकोनॅझोल १ मिली

टीप

वरीलपैकी कोणत्याही २ बुरशीनाशकाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या कालावधीत १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्यास चांगला फायदा होतो. पुढील काळातील अनेक फवारण्या टाळता येतात.

बोर्डो मिश्रण वगळता इतर फवारणीमध्ये स्प्रेडर स्टीकरचा वापर करावा.

हंगामात कॉपरजन्य बुरशीनाशकांशिवाय कोणत्याही कीडकनाशकाचा वापर २ पेक्षा जास्त वेळा करू नये.

English Summary: In pomegranate farming concentrate this things and earn more money
Published on: 25 March 2022, 04:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)