Horticulture

फळबाग लागवड करायचे ठरवले असेल तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर महत्त्वाचा मुद्दा येतो. जातिवंत कलमांची निवड व रोपांचा पुरवठा हा होय. फळझाडांची जर किफायतशीर लागवड करायची असेल तर त्यामध्ये रोपवाटिकेचे भरपूर महत्त्व आहे.

Updated on 17 February, 2022 1:10 PM IST

फळबाग लागवड करायचे ठरवले असेल तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर महत्त्वाचा मुद्दा येतो. जातिवंत कलमांची निवड व रोपांचा पुरवठा हा होय. फळझाडांची जर किफायतशीर लागवड करायची असेल तर त्यामध्ये रोपवाटिकेचे भरपूर महत्त्व आहे.

रोपांचा व कलमांचा जातिवंत पना तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण फळझाडांच्या कलमांची निवड कशी करायची याबाबत जाणून घेणार आहोत.

  • कलमे /रोपांची निवड कशी करावी?
  • फळबाग लागवडीसाठी कलमांची निवड करताना ती जातिवंत चांगल्या प्रतीची, दर्जेदार, कीड व रोगमुक्त असावीत
  • कलमेनिवडताना ते कणखर निवडावे.
  • निवडलेल्या कलमांच्या जातीला भरपूर फळे असावीतव त्यांना बाजारात चांगली मागणी असायला हवी.
  • कलमे एक वर्ष वयाची मध्यम वाढीचीआणि 60 ते 75 सेंटिमीटर असावीत.
  • कलम केलेल्या रोपांमध्ये खुट व कलम काडीची जाडी सारखी असावीत जोड एक झालेला असावा.
  • फळझाडांची कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून वीस सेंटीमीटर पेक्षा ऊंच नसावेत.
  • कलमांना व छाट्याना भरपूर मुळे असाव्यात व कलमांच्या फांद्या, पानांची वाढ समतोल व निरोगी असावी.
  • कलमांची खरेदी करताना कृषी विद्यापीठाचे रोपवाटिका, शासकीय रोपवाटिका किंवा परवानाधारक शासन मान्य रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.
  • लागवडीसाठी आवश्‍यक असणाऱ्या रोपांच्या संख्येपेक्षा 15 टक्के रोपे जास्त खरेदी करावीत. व अशी रोपे नांगे भरणे किंवारोपे मर झालेल्या ठिकाणी लावण्यासाठी उपयोग येतात.
  • ऊती संवर्धनाचे रोपे निवडतांना रोपांची पुरेशी हर्डनिंग केलेली असावी.
  • शेंडे कलम/पाचर कलमरोपाच्या  खुंटावरील फूट काढलेले असावे.
English Summary: in orchred planting important is selection of orchred plant in nursury
Published on: 17 February 2022, 12:54 IST