Horticulture

काही फळबागा २ ते ३ वर्षे टिकणाऱ्या असतात. यामध्ये केळी, पपई, अननस यांचा समावेश होतो. यांचे लागवड अंतर कमी असते.

Updated on 25 April, 2022 10:31 PM IST

काही फळबागा २ ते ३ वर्षे टिकणाऱ्या असतात. यामध्ये केळी, पपई, अननस यांचा समावेश होतो. यांचे लागवड अंतर कमी असते. यामध्ये पहिल्या वर्षी काही हंगामी भाजीपाला पिकांचे आंतरपीक फायदेशीर ठरते. संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, अंजीर या फळबागा दहा वर्षांपेक्षा अधिक टिकतात. त्यांचे उत्पादन २५-३० वर्षांपर्यंत मिळत राहते. अशा बागांतून आंतरपिके घेण्यामुळे अधिक फायदा होतो. 

द्राक्ष, चिकू, नारळ, सीताफळ, काजू या फळबागांमध्ये आंतरपिके घेताना अधिक विचार करावा लागतो. 

आंतरपिके घेण्याचे फायदे -

१.मुख्य फळबागेचे उत्पादन सुरू होईपर्यंतच्या काळात आंतरपिकांपासून आर्थिक कमाई करता येते. २. आपल्याकडील उपलब्ध साधन सामग्रीचा आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करता येतो. ३. उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा पुरेपूर मोबदला घेता येतो. ४. आंतरपिकाच्या लागवडीमुळे जमिनीत सुधारणा घडवून आणता येते. ५. आंतरपिकाचा लाभ मुख्य फळपिकांसाठीही करून घेता येतो. 

आंतरपिके निवडताना घ्यावयाची काळजी-

१. आंतरपीक हंगामी आणि कमी कालावधीत तयार होणारे असावे. 

२. त्याची वाढ आणि विस्तार मुख्य फळपिकांना झाकून टाकणारा अगर अडथळा आणणारा नसावा. 

३. आंतरपिकांमुळे मुख्य पिकावर कीड-रोग यांचा प्रादुर्भाव होणारा नाही अशी त्याची निवड असावी. 

४. फळबागेची जमीन सुधारेल असे आंतरपीक असावे. 

 

हे ही वाचा- जुन्या संत्रा बागेचे पुनरुज्जीवन

 

भारी जमिनीमध्ये संत्र्याची लागवड, अन्नद्रव्याची कमतरता, अयोग्य ओलीत व्यवस्थापन,…

फळझाडांमध्ये कमी कालावधीच्या फळपिकांचे आंतरपीक -

१) डाळिंब, पेरू, चिकू. शेवगा, पपई 

२) आंबा, सीताफळ. शेवगा, पपई 

डाळिंबातील आंतरपीक -

डाळिंबाची लागवड १५ x१० फुटांवर असल्यास त्यामध्ये १५ x ६ फूट अंतरावर 

पपईची लागवड करता येते. म्हणजेच डाळिंबाच्या दोन ओळींमध्ये पपईची एक ओळ लावता येते. पपई लागवडीनंतर साधारणतः ९ महिन्यांनंतर उत्पादन मिळण्यास सुरवात होते. तैवान ७८६ सारखी पपईची जात असल्यास प्रत्येक झाडाला सरासरी ४० ते ४५ फळे लागतात. म्हणजेच प्रति झाडापासून ५० ते ६० किलो वजनाची फळे मिळू शकतात. एकरी १५ ते १६ टन पपई उत्पादन मिळते. 

कोबीचे आंतरपीक -

डाळिंबामध्ये कोबी, प्लॉवर यांचेदेखील आंतरपीक फायदेशीर ठरू शकते. पावसाळी, रब्बी हंगामामध्ये डाळिंब लागवडीनंतर पहिल्या वर्षी ही आंतरपिके घेऊन एकरी उत्पन्न मिळवता येते. तसेच चवळी किंवा श्रावणी घेवडा या द्विदलवर्गीय भाजीपाला पिकांचे उत्पादन जमिनीची सुपिकता वाढवण्यास मदत करते. 

केळीमध्ये फुलकोबीचे आंतरपीक -

८ x५ फूट अंतरावर लागवड केलेल्या केळीच्या दोन ओळींमध्ये फुलकोबीचे (प्लॉवर) आंतरपीक घेता येते. प्लॉवरचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. त्यातील उत्पन्नातून केळी पिकातील खर्च कमी होऊ शकतो. 

काकडीमध्ये मिरचीचे आंतरपीक -

फेब्रुवारी महिन्यात चार फुटांचे बेड तयार करून त्यावर दीड फूट अंतरावर काकडीच्या बियांची टोकण करावी. त्यानंतर तीन आठवड्यांनी मिरचीची रोपे दीड फुटांवर लावावीत. काकडीचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. एका पिकातील उत्पन्नातून दुसऱ्या पिकातील खर्च कमी होऊ शकतो. 

काकडीमध्ये मिरचीचे आंतरपीक -

फेब्रुवारी महिन्यात चार फुटांचे बेड तयार करून त्यावर दीड फूट अंतरावर काकडीच्या बियांची टोकण करावी. त्यानंतर तीन आठवड्यांनी मिरचीची रोपे दीड फुटांवर लावावीत. काकडीचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. एका पिकातील उत्पन्नातून दुसऱ्या पिकातील खर्च कमी होऊ शकतो. 

केळी पिकात खरबूज -

केळीच्या दोन ओळींमध्ये खरबुजाची लागवड करता येते. खरबुजाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळू शकते. खरबुजातील उत्पन्नातून केळीतील खर्च कमी होतो. 

तोंडलीत मिरची -

तोंडली बाग लावल्यानंतर पहिल्या दोन वर्षांपर्यंत त्यामध्ये उन्हाळ्यात ढोबळी मिरची किंवा साध्या (तिखट) मिरचीचे यशस्वी उत्पादन अनेक शेतकरी घेत आहेत. उन्हाळ्यामध्ये कडक सूर्यप्रकाश व जास्त तापमान असते. मात्र तोंडलीचा वेल मंडपावर चढवला असल्याने मंडपाखाली अर्धसावली मिळते. त्यामध्ये मिरचीचे पीक चांगल्या प्रकारे येते. फूलगळीची समस्या कमी होते

English Summary: In horticultural crops take this interprises will be benefits
Published on: 25 April 2022, 10:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)