Horticulture

सध्या बरेच शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादनाकडे वळले आहेत. त्यामध्ये शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचा आणि निर्यातक्षम भाजीपाला पिकवणे कडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल दिसतो. आता बरेच शेतकरी आपला भाजीपाला आदी देशात निर्यात करण्याची तयारी करत असतात.

Updated on 08 December, 2021 8:39 PM IST

सध्या बरेच शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादनाकडे वळले आहेत. त्यामध्ये शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचा आणि निर्यातक्षम भाजीपाला पिकवणे कडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल दिसतो.  आता बरेच शेतकरी आपला भाजीपाला आदी देशात निर्यात करण्याची तयारी करत असतात.

परंतु विदेशात भाजीपाला निर्यात करण्यासाठी बऱ्याचशा कागदपत्रांची आवश्यकता भासते. या लेखात आपण शेतमाल निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेणार आहोत.

 शेतमाल निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे

 आयात निर्यात परवाना

 भाजीपाला निर्यात करण्यासाठी सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांना आयात निर्यात परवाना काढणे आवश्यक असतो.हा परवाना काढण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात.

1-संस्था नोंदणी प्रमाणपत्र, भारताच्या आयकर विभागाकडून मिळणारा कायम खाते क्रमांक व त्याची झेरॉक्स प्रत प्रपत्र बी नुसार बँकेच्या लेटरहेडवर प्रमाणपत्र

2- दोन पासपोर्ट साईज फोटो

 बँकेचे प्रपत्र त्यावरील आपला पासपोर्ट साईज फोटो वर बँक अधिकाऱ्यांची साक्षांकित केलेले आवश्यक असते.

4- सहसंचालक विदेश व्यापार यांच्या नावे इंग्रजी अक्षरात लिहिलेले एक हजार रुपयांचा पुणे किंवा मुंबई येथील राष्ट्रीयीकृत बँकेत देय असलेला डिमांड ड्राफ्ट तसेच प्रपत्रानुसार घोषणापत्र ही आवश्यक असते.

4-A 4 आकारातील पाकीट व तीस रुपयांचे पोस्टल स्टॅंप

5- अर्ज बाबतची माहिती व पत्र यांचे नमुने http://dgft.Delhi.Nic.Inया वेबसाइटवर उपलब्ध असतात.प्रपत्रातील तपशीलवार माहिती भरून अर्जदाराने सहसंचालक विदेश व्यापार यांच्या पुणे किंवा मुंबई कार्यालयात स्वतःच्या हस्तेकिंवा नोंदणीकृत टपाल सेवेने सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

6- त्यानंतर हा आयात निर्यात परवाना मिळाल्यानंतर निर्यातीत वृद्धी परिषदेकडीलनोंदणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असते. यासाठी कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा नवी दिल्ली यांच्या विभागीय कार्यालय किंवा अपेडाच्या वेबसाईटवर नोंदणी करता येते.

शेतमाल सुरक्षिततेबाबत हमी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ग्लोबल गॅप सर्टिफिकेट
  • आरोग्य विषयक प्रमाणपत्र
  • पॅक हाऊस प्रमाणपत्र
  • ऍगमार्क प्रमाणपत्र
  • सॅनिटरी प्रमाणपत्र
  • इत्यादी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते.

 आयातदार कसा शोधावा?

 या सगळ्या प्रक्रियेनंतर आपल्याला भाजीपाला व तत्सम कृषी उत्पादने निर्यात करता येतात. परंतु ते घेण्यासाठी बाहेरील देशातील आयात दार शोधावा लागतो, त्यासाठी अपेडा  सारख्या संस्थांच्या वेबसाईटवर जाऊन माहिती उपलब्ध करता येते. त्यानंतर आयात दाराची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आयात दाराची संपर्क साधून आपला भाजीपाला मालाची माहिती द्यावी लागते.

संबंधित आयात दाराची बाजारातील पत तपासणे फार आवश्यक असते. हेपत तपासणीचे काम एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून केले जाते. निर्यातीसाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी, विमानात किंवा जहाजात जागा आरक्षित करण्यासाठी आणि कस्टम क्लिअरिंग साठी सी एच ए म्हणजेच कस्टम हाऊस एजंटची नेमणूक करणे फायद्याचे असते. एजंट मुंबई व पुण्यात उपलब्ध असतात. जर शेतकऱ्यांनी वरील पैकी कागदपत्रांची पूर्तता केली आणि व्यवस्थित तांत्रिकदृष्ट्या माहिती मिळवली तर आपण निर्यात क्षेत्रामध्ये अग्रगण्य स्थान मिळवून आपली आर्थिक परिस्थिती उंच करू शकतो.

English Summary: if you export vagetable and fruit nessesary this important document
Published on: 08 December 2021, 08:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)