पेरूला गरिबांचे फळ तसेच उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील 'सफरचंद ' असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पेरूची लागवड अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बुलढाणा, भंडारा आणि जळगाव या जिल्हयात केली जाते. या फळापासून गेली, जाम, रस सरबत, आईस्क्रीम ई. पदार्थ तवर करतात. अशा या महत्वाच्या फळ पिकावर ७० टक्क्यांपेक्षा जास्त किडीचा नोंद झालेली आढळते. त्यापैकी फळमाशी, साल पोखरणारी अडी, मिठ्या ढेकुण आणि स्पायरेलिंग पांढरी माशी या किडी आर्थिक नुकसान करणाऱ्या आहेत.तसेच विवीच रोगापैकी देवी रोग, फांद्यावरील खेया इ. रोग आढळून येतात. त्यापैकी देवी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
अ) किडीची ओळख व व्यवस्थापन
१. फळमाशी :-
भुरकट तपकिरी रंगाची, परमारीसारखी असून पाठीवर पिकच्या रंगाच्या खुणा असतात. फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. पाय नसलेल्या अळ्या फळाच्या आत शिरुन आतील गर खातात त्यामुळे फळे सडतात व गळुन पडतात. जास्त आइटा व मध्यम तापमान किडीच्या प्रादुर्भावास पोषक आहे.
नियंत्रण :
झाडाखाली गडलेली फुले, फळे वेचून नष्ट करावीत. बाग स्वच्छ ठेवावी. फुले येण्याच्या आणि फळ धारणेच्या वेळी सापापर मेग्रीन ४ मि.ली. किंथा फल्युव्हालीनेट ५ मी.ली. किया फेन्थाओन १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. आंबे बहाराची फळे काढून टाकावीत, बगेमध्ये कुजेनलरक्षक सापडा हेक्टरी ५ या प्रमाणात लावून फळमाशी नष्ट करावी.
२. साल पोखरणारी अळी :-
ही अळी फिकट रंगाची असून रात्री सालीच्या आत शिरून जातील भाग पोखरते व नंतर साल खाते. विहीच उपद्रव झालेल्या खोडावर चिद्र आढळून येतात. साल पेखरलेल्या ठिकाणी अळीची जाळीदार दाणेदार विष्ठा आढळते. उपद्रव जास्त असल्यास फांद्या अथवा झाडे वाळून जातात.
नियंत्रण :
तार छिया मध्ये तोचुन अळीचा नाश करावा. अटीने झाडावर केलेली छिठे शोधून त्यात इडीसिटी मिश्रण किंवा पेट्रोल ड्रोपरणे अशा कापसाच्या बोळयाने घालून ओल्या मातीने बंद करावीत. कीड दिसून येतच क्विनालफास २० मिली किंवा फेन्केलेरेट २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३. पिठ्या ढेकुण :-
मोठ्या प्रमाणात पेरूवर आढळते हे डेकुण कोवळया पान, फुलावरती अणि फांद्यातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून मधासारख्या निघणाऱ्या पदार्थावर बुरशी वाढते आणि त्यामुळे पेरूच्या फळांची प्रत आणि उत्पादन घटते.
नियंत्रण:- किशनाल्यास १००० मिली ५०० ली. पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे. व्हार्टसौलीयम लेकानी २० म प्रती १० ली. पाणी या प्रमाणात १० ते १२ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. जैविक कीड नियंत्रणासाठी क्रीत्पोलीमास मान्योनीवारीच्या १५०० किंवा मुंगेरे प्रती हेक्टरी सोडावे. झाडाच्या बुध्यावर ग्रिस था लेप लावावा.
४. स्पायरीलिंग पांढरी माशी :-
पांढरी माशीपेक्षा आकाराने थोडी मोठी असते. पानाच्या खालच्या बाजूस पिले व माशा पानांतील रस शोषतात. परिणामी पाने पिवळी पडून गळतात. झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. पिलांच्या शरीरातून विकट स्नाय पाझरून काळया बुरशीच्या प्रादुर्भाव वाढतो.
किडीचे एकात्मिक नियंत्रण :-
बागेची खोलगट नांगरणी करावी. जमिनीत प्रत्येक झाडाच्या खाली १०० ग्रम पाराथिओन भुकटी मिसळावी. खाली पडलेली पाने, फळे गोळा करून जाळावीत. रक्षक सापळे हेक्टरी १० लावावेत. फळे पक्व होण्याच्या वेळी १० लि. पाण्यात आसीफेट ७.५ ग्रॅम, कार्बारील ४० ग्रॅम याप्रमाणात १० दिवसाच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात. साल खाणाऱ्या अळींची जाळी स्वच्छ करून १० ली पाण्यात कार्बारील (५० टक्के प्रवाही) ८० ग्रम मिसळून प्रादुर्भाव झालेल्या प्रामुख जागेवर फवारावे.
ब) रोगाचे लक्षणे व व्यवस्थापन :-
१) देवी रोग :
हा रोग पॅस्टॅलोशीच सीडी या बुरशीमुळे होतो या रोगाची लक्षणे कोवळया, हिरव्या फळांवर व फांद्यावर आढळतो, रोगाची बुरशी फळाच्या सालीवर वाढलेली आढळते. सुरुवातीला लालसर तपकिरी रंगाचे ठिपके हे लालसर तपकिरी ठिपके पुढे वाढत जाऊन फळांची साल फाटते व फळे तडकतात. रोगट फळे चवीला पनघट लागतात. तसेच फांदीच्या सालीयर बेड्या-वाकड्या आकाराचे खोलगट चट्टे दिसतात.
रोग व्यवस्थापन: बागेतील रोगट फळे नष्ट करावी. पावसाळ्यात झाडावर नविन फुट येण्यापूर्वी आणि अर्धवट पोसलेल्या कोवळ्या पानावर, फांद्यावर व कटाएर १० लिटर पाण्यात २५ ग्रम मंकोझेब व बुरशीनाशकाच्या १५ ते २० दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करावा.
२) फळे सइने :-
हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. फळाच्या देठाजवळ लाल रंगाचे गेल ठिपके दिसतात. पावसाळ्यात या गोल ठीपाल्याचे प्रमाण जास्त असते.
रोग व्यवस्थापन :-
बागेतील रोगट, सडलेली, कुजलेली फळे वेधून नष्ट करावी. २०-२५ ग्राम मंकोझेब १० लिटर पाण्यात मिसळून जून ते ऑक्टोबर या काळात २ ते ३ वेळा १५ दिवसाच्या अंतराने फवारावे.
३) फांदयावरील खैरा रोग :-
या रोगामुळे सालीवर वेड्यावाकड्या आकाराचे खोलगट वळे दिसतात व साल फाटते, रोगट फांद्या सुकतात हा रोग कमी प्रमाणात आढळतो व बुरशीजन्य आहे.
रोग व्यवस्थापन :-
बागेतील रोगट फांद्या काढून नष्ट करावयात. २०-२५ ग्रम मॅनकोझेब १० लिटर पाण्यात मिसळून जून ते ऑक्टोबर या काळात २ ते ३ वेळा १५ दिवसाच्या अंतराने फवारावे.
लेखक
प्रा. मनीषा श्री. लांडे
सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
श्री. संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय, पिंपळखुटा,
ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
Published on: 30 January 2021, 10:57 IST