कोरोनाकाळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. बर्याच जणांचे जॉब काढले गेले. अक्षरशा उपासमारीची वेळ आली परंतु तुम्ही जर थोडीफार शेती बद्दल माहिती ठेवून असेल तर आलेल्या संकटामध्ये स्वतःला वाचवू शकतात.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसाय विषयी माहिती देत आहोत. त्या माध्यमातून तुम्ही चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. या व्यवसायासाठी तुमच्याकडे अंगण किंवा छत असणे आवश्यक आहे. आपल्याला माहित आहेच कि सध्या टेरेस फार्मिंग खूप ट्रेंडिंग मध्ये असून या माध्यमातून तुम्ही रोप पैसा कमवू शकतात. यामध्ये तुम्ही मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पाण्याच्या साहाय्याने पुरवून चांगले उत्पादन मिळू शकतात.याउत्पादन पद्धतीला हायड्रोपोनिक असे म्हटले जाते.
हायड्रोपोनिक फार्मिंग
- विनामाती आणि कमी पाण्यातील शेती- यामध्ये मातीची गरज नसते शिवाय पाणी पण खूपच कमी लागते. घराच्या टेरेसवर शेती करण्यासाठी एकक्यारीबनवलेली असते व ती वॉटरप्रूफ असते.
- सेंद्रीय साधनांची मदत- या वाफेमध्ये भेंडी, टमाटे, वांगे,मेथी, पालकांनी मिरचीचे उत्पादन घेता येते. टेरेस फार्मिंग साठी नारळाच्याकाथ्याची गरज असते. घरावर अधिक वजन पडू नये म्हणून मातीचा उपयोग केला जात नाही. शेतीसाठी नारळाच्या सालीऐवजी काही मिश्रण देखील टाकले जाते. त्यामुळे पिके लवकर मोठे होत असतात. जमिनीचा आकार सध्या कमी कमी होत असल्याने या क्यारिलाम्हणजे बेडला मोठी मागणी वाढणार आहे.
- चार फूट बाय चार फूट चार क्यारी लावल्यानंतर एका परिवारासाठी आपण महिन्याभराचा भाजीपाला करू शकतो.
- दिवसेंदिवस कमी होत असलेले शेतीचे क्षेत्र आणि सेंद्रीय अन्नपदार्थांविषयी चा ओढा त्यामुळे अर्बन फार्मिंग मध्ये नव्या पद्धतीचे मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने व्यापारी आणि शहरी शेतकरी छत किंवा पार्किंगच्या जागेत शेती फुलवत आहेत. या पद्धतीत मातीची गरज नसते. मातीची गरज नसल्याने छोट्या जागेत ही पद्धत यशस्वी होते. एक लाख खर्चात आपण दोन लाख रुपयांचा भाजीपाला उत्पादित करू शकतो. या शेतीच्या पद्धतीला हायड्रोपोनिक म्हटले जाते. या पद्धतीने पाण्याच्या साहाय्याने झाडांना पोषक तत्त्वे दिली जातात. झाडे मल्टी लेयर फ्रेमच्यामदतीने टिके पाईपने उगवले जातात आणि त्यातून पोषक तत्त्वे दिली जातात.
Published on: 21 December 2021, 01:56 IST