Horticulture

पेरूच्या झाडाला जर योग्य आकार देण्यासाठी सुरुवातीला हलकी छाटणी करावी. झाडांची उंची मर्यादित ठेवावीकारण छाटणीमुळे नवीन फुटवा येऊन चांगले उत्पादन मिळते. त्याप्रमाणेच बागेत हवा खेळती व स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.

Updated on 27 April, 2021 6:26 PM IST

पेरूच्या झाडाला जर योग्य आकार देण्यासाठी सुरुवातीला हलकी छाटणी करावी.  झाडांची उंची मर्यादित ठेवावीकारण छाटणीमुळे नवीन फुटवा येऊन चांगले उत्पादन मिळते. त्याप्रमाणेच बागेत हवा खेळती व स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे येणारा फळांची प्रतवारी सुधारून रोग, साडीचा पदर व देखील पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी प्रमाणात होतो. जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील मैदानी प्रदेशात हस्त बहारा पासून अधिक आर्थिक फायदा होण्यासाठी लखनऊ 49 हि जात दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

या जातीची फळे आकाराने मोठी व गोल आकाराची असतात तसेच त्यांच्या गर पांढरा असून गोड असतो. या जातीच्या पेरूच्या फळांमध्ये बियांचे प्रमाण अगदी नगण्य असते. या जातीच्या झाडांची वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे उंच न वाढता आडवी वाढतात व त्यांची उंची नियंत्रित ठेवता येते. पेरूची कलमे हे दाब कलम, भेट कलम, छाट कलम आणि गुटी कलम पद्धतीने तयार करता येतात. जर महाराष्ट्राचा विचार केला तर आत्ता सर्वीकडे दाब कलम पद्धतीने पेरूची कलमे केली जाते.

 पेरूच्या लागवडीविषयी

 चांगल्या उत्पादनासाठी आणि झाडांच्या योग्य वाढीसाठी पेरूची लागवड सहा बाय सहा मीटर अंतरावर करावी. झाडाला योग्य आकार यावा त्यासाठी छाटणी फार महत्त्वाचे असते. तसेच छाटणी केल्यामुळे झाडाला नवीन फुटवा फुटून  उत्पादने चांगले येते. तसेच बागेमध्ये सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते. त्यामुळे येणार्‍या फळांची प्रतवारी ही उत्तम येऊन रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. पेरू बागेची स्वच्छता हे फार महत्वाचे असते. कारण बऱ्याचदा रोगग्रस्त कीडग्रस्त फळे तशीच पडलेली असतात. त्यामुळेच बागेत खरोखर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

पेरू बागेतील रोग व कीड

 पेरू बाग प्रमुख्याने पांढरे ढेकूण, खवले कीड, फुलकिडे,  फळमाशी,, खोडावर जाळी करणारे आळी,  सूत्रकृमी या किडींचा चा प्रादुर्भाव सर्रास आढळून येतो.  तसेच व्यवस्थापन जर पुरेसे नसेल तर पेरू वर देवी, पानांवरील ठिपके, फळ सड, फादी  मर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी बागेची आंतरमशागत करून बाग स्वच्छ ठेवावी. बागेत तण  होऊ देऊ नये.  तसेच रोगग्रस्त फांदया  बहार धरण्यापूर्वी बागेतून बाहेर काढून त्यांचा नायनाट करावा.

  

पेरू बागेचे खत व्यवस्थापन

 पेरू झाडाची वाढ जलद जोमदार होण्यासाठी खतांचा संतुलित मात्रा देऊन योग्य असते.  जर खत व्यवस्थापनाचा विचार केला तर नत्र हे तीन वेळेस समप्रमाणात विभागून जून जुलै, ऑगस्ट-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये द्यावेत.  तसेच पालाश देखील जून-जुलै व ऑक्‍टोबर नोव्हेंबरमध्ये समप्रमाणात विभागून द्यावेत. संपूर्ण स्फुरद जून-जुलैमध्ये द्यावी. फळांचा बहार घेणे सुरू झाल्यावर प्रत्येक झाडास पंचवीस ते तीस किलो शेणखत मे महिन्याच्या शेवटी आणि 450 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद व 400 ग्राम पालाश बहाराच्या वेळी आणि उरलेले साडेचारशे ग्रॅम नत्र  फळे धरल्यानंतर द्यावी. पेरू बागेस सुषमा अन्नद्रव्य जसे की जस्त , लोह, बोरॉन ची आवश्यकता असते.

कारण जमिनी मधील कमी झालेले कर्बाचे प्रमाण, वाढलेल्या चुनखडीचे प्रमाण व मुख्य अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येऊन थंडीच्या हंगामात फळ वाढीच्या अवस्थेत पाणी लालसर रंगाचे होऊन फळे वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नत्र, स्फुरद  तसेच जस्त या अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार संतुलित वापर केल्यास अतिरिक्त पाण्याचा वापर टाळल्यास पाने लाल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

जर जस्ताचे प्रमाण कमी असेल तर बहार धरण्या ज्यावेळी शेणखत व रासायनिक खताबरोबर 70 ग्रॅम झिंक सल्फेट प्रति ग्राम प्रति झाड याप्रमाणे द्यावे.तसेच लोहाची कमतरता असल्यास बहार धरण्याच्या वेळेस शेणखत व रासायनिक खताबरोबर 80 ग्रॅम फेरस सल्फेट चा प्रति झाड वापर करावा.  तसेच बोरॉनची कमतरता असेल तर 15 ग्रॅम बोरॅक्‍स प्रति झाड द्यावे.  सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा जर फवारणीद्वारे केला तर फायदेशीर ठरते.त्यासाठी 0.2 टक्का चिलेटेड झिंक याची फवारणी फुले येण्यापूर्वी 15 दिवसांच्य अंतराने दोनदा करावी. तसेच लोहाची कमतरता पडून पिवळी पडल्यास 0.1 टक्का चिलेटेड लोहाची एक ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पीक फुलोऱ्यात पूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी. तसेच बोरॉन ची कमतरता असेल तर बोरिक ऍसिड( दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.

  

पेरू बागेतील किड नियंत्रण

 पेरू बागेत असलेल्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉल वापरून बनविलेल्या रक्षक सापळ्यांचा प्रति एकरी पाच या प्रमाणात वापर करावा व किडीचे सर्वेक्षण आणि नियंत्रण करावे. नियंत्रणासाठी दोन मिली मालिथीयोन प्रति लिटर पाण्यात मिसळून फळांवर फवारावे.. पेरूची फळे सुपारीएवढी लहान असल्यापासून शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा  दहा ग्रॅम कार्बन डान्सिंम किंवा 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणी दर 15 दिवसांनी पाच ते सहा वेळा करावी.

  पांढरे ढेकुन व खवले कीड

  • या किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकयानी 20 ते 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच क्रिप्टोलिमस माँट्रो झायरी हे परोपजीवी कीटक हेक्टरी हजार ते पंधराशे भुंगेरे सायंकाळी सहानंतर झाडावर सोडावेत. गरजेनुसार परत 15 ते 20 दिवसांनी हेक्टरी  हजार ते पंधराशे भुंगेरे सोडावेत. पेरू बागेत मित्र कीटकांना अपायकारक कीटकनाशके फवारणी करू नयेत.

 

English Summary: How to manage a guava orchard
Published on: 25 April 2021, 11:48 IST