सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ व गांडूळ खताला फार मोठे महत्त्व आहे. गांडूळ खता प्रमाणे त्याचा अर्कही उत्तम पिक वर्धक मानला जातो.त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म मूलद्रव्य अस्तित्वात असून ते पिकांना त्वरित उपलब्ध होतात.
परिणामतः पिकांचे प्रतिकारक क्षमता वाढून उत्पादनाला चालना मिळते. या लेखामध्ये आपण गांडूळखत अर्क तयार करणे व त्याचा वापर करणे या घटकांविषयी माहिती जाणून घेऊ.
गांडूळ खत अर्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- दोन माठ एक लहान व एक मोठा
- माठ ठेवण्यासाठी तिपायी
- अर्धवट कुजलेले शेणखत व काही सेंद्रिय पदार्थ
- गिरीपुष्प, लसूण घास व कडुनिंबाचा कोवळा पाला
- पूर्ण वाढ झालेली निरोगी गांडूळे एक किलो किंवा अर्धा किलो
- गरजे इतके पाणी
- तयार होणारा रक्त जमा करण्यासाठी चिनी मातीचे भांडे
- पोयटा माती
गांडूळ खत तयार करण्याची कृती
- एक जुना माठ घेऊन त्याच्या तळाला बारीक छिद्र करून त्या छिद्रात कापडाची वात किंवा कापसाचे वात टाकावी. तो माठ एका तिपाई वर ठेवावा.
- माठाच्या तळाशी जाड वाळूचा चार इंचाचा थर लावावा.
- त्यावर अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर लावावा त्यावर हलकेसे पाणी मारावे.
- नंतर त्याच ओलाव्यात अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली निरोगी गांडुळे सोडावी.
- गांडूळांना खाद्य म्हणून गिरीपुष्प, लसूण घास व कडुनिंबाचा कोळपा ला प्रत्येकी अर्धा किलो शेण स्लरी सोबत मिसळावा.
- मोठ्या माठावर लहान मोठ्या पाणी भरून ठेवावा. त्या खाली तळाला छिद्र करून वात बसवावी.म्हणजे थेंब थेंब पाणी मोठ्या माठात पडेल.
- तिपाईच्याखाली वर्मी वाश जमा करण्यास चिनीमातीचे अथवा काचेचे भांडे ठेवावे
- पहिल्या सात दिवसात जमा झालेले पाणी पुन्हा वरील माठात टाकावे. त्यानंतर सात दिवसांनी जमा होणाऱ्या पाण्यास गांडूळ खत पाणी किंवा वर्मी वाश असे म्हणतात. ते पिकावर फवारणी योग्य असते.
गांडूळ खत अर्क वापरण्याची पद्धत
- पिक फुल, फळावर आल्यावर दहा दिवसांच्या अंतराने वर्मी वाश 5% ( 100 लिटर पाण्यात पाच लिटर) या प्रमाणात फवारणी कराव्या.
गांडूळ खत अर्काचे फायदे
- पीक वाढीसाठी आवश्यक घटक गांडुळाच्या त्वचेमध्ये,विष्टेमध्ये सापडतात. त्यामधून मिळणारे वर्मी वाश पिकांसाठी सर्वात्तम पीक वर्धक आहे
- गांडूळ खत आर्क फुलोरा व फळ पक्वतेच्या अवस्थेत फवारल्याने फुलगळ फळगळ थांबविण्यासाठी खूप मदत होते.
- पिकाची वाढ जोमदार होते तसेच पीक रसरशीत दिसतात.
- विविध पिकांच्या कीड व रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता पिकांमध्ये वाटते.
- पिकांच्या उत्पादनामध्ये निश्चित वाढ बघायला मिळते.
उत्तम दर्जाचे वर्मी वाश मिळवण्यासाठी…
- शेणखत, घोड्याची लीत, लेंडी खत, हरभऱ्याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्त्वाचे खाद्य होय.
- स्वयंपाक घरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष, वाळलेला पालापाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळलेले असतात गांडुळांची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत व गांडूळ खत अर्कतयार होतो.
- हरभऱ्याची व गव्हाचा भुसा शेणामध्ये 3:10 या प्रमाणात मिसळल्यास गांडूळ खता सोबत उत्तम गांडूळ खत अर्क तयार होतो.
- गोबर गॅस, स्लरी, प्रेसमड केक,सेन यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खतअर्क तयार होतो.
Published on: 18 February 2022, 06:12 IST