Horticulture

पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. आपण पिकांना पाणी देतो. परंतु किती पाण्याचा 100% व्यवस्थित उपयोग होतो याचा विचार आपण कधी गेला आहे का? कधी कधी आपण पिकांना पाणी देण्याची गरज नसताना देखील पाणी देतो.

Updated on 19 March, 2022 8:03 PM IST

पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. आपण पिकांना पाणी देतो. परंतु किती पाण्याचा 100% व्यवस्थित उपयोग होतो याचा विचार आपण कधी गेला आहे का? कधी कधी आपण पिकांना पाणी देण्याची गरज नसताना देखील पाणी देतो.

आपण बऱ्याच प्रमाणात आता ठिबक आणि तुषार सिंचनाचाउपयोगा पिकांना पाणी देण्यासाठी करतो. यामध्ये पाण्याची बचत होते हे खरेच आहे. परंतु  बऱ्याचदा विजेच्या लपंडावामुळे ठिबकद्वारे देखील पाणी योग्य वेळीआणि योग्य प्रमाणात देणे शक्य होत नाही.म्हणून ठिबक सारखे सारखे तंत्रज्ञान असून देखील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे कठीण जाते.

नक्की वाचा:4 हजार रोज कमवू शकता! योग्य नियोजनाने हा व्यवसाय सुरू केला तर रोज कमवाल 4 हजार रुपये

सध्या पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा आणि पिकांच्या गरजेनुसार पिकांना पाणी देण्यात यावी यासाठी ड्रोनचा देखील वापर होऊ लागला आहे. परंतु हे तंत्रज्ञान वापरणे अल्पभूधारक व सामान्य शेतकऱ्यांसाठी आवाक्याबाहेरचे व आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही. यासाठी ग्रो स्ट्रीम सारखे तंत्रज्ञान अधिक फायदेशीर ठरू शकणार आहे. या लेखामध्ये आपण या तंत्रज्ञानाविषयी माहितीघेऊ.

काय आहे नेमके हे तंत्रज्ञान?

 पिकांना पाण्याचा ताण पडला किंवा पिकांना पाण्याची गरज आहे हे प्रामुख्याने जेव्हा पिकाच्या मुळांच्या परिसरामध्ये मुळाकडून विशिष्ट प्रकारचे रसायन उत्सर्जित केले जातात. त्यांचे महत्त्वाचे काम असते की पाणी आणि आवश्यक अन्नद्रव्य शोषण हे होय. हे पिकांना असलेली पाण्याची गरज आणि उत्सर्जनाचे प्रमाण हे बाहेरील वातावरणानुसार बदलत असते. जेव्हा पीक वाढत असते तेव्हा त्याच्या विविध अवस्थांनुसार त्यामध्ये योग्य बदल होत जातात अव्यवस्था नुसारच वातावरणाशी जुळवून घेत योग्यत्याच प्रमाणात पिकाकडून पाण्याची मागणी केली जाते.

ही सगळी प्रक्रिया सेंद्रिय रसायनांच्या माध्यमातून कार्यरत असते. त्यामुळे पिकांच्या पाण्याच्या मागणीला योग्य प्रकारे न्याय देणारे व पिकांना आवश्‍यक तेवढेच पाण्याचा तो अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे ग्रो स्ट्रीम सिंचन प्रणालीउपयोगी पडते.

नक्की वाचा:शेतीची शोकांतिका! नव्या पिढीला शेतीचे काही देणे घेणे नाही,शेती क्षेत्राला एक व्यवसाय म्हणून बघा

हे प्रणाली रिस्पॉनसिव्ह ड्रिप इरिगेशनया कंपनीने विकसित केली आहे.या तंत्रज्ञानात लॅटरलमध्ये पोअर फिल्ड पॉलिमर चा वापर केला जातो. त्याद्वारेज्या पिकांना पाण्याची गरज असते त्यांच्याकडून सोडलेल्या रसायनांचा वेध घेतला जातो. जेव्हा वनस्पतीं कडून ही रसायने सोडली जातात त्यावेळी लॅटरल मध्ये असलेल्या सूक्ष्म छिद्रा द्वारे लॅटरल मधून पाणी सोडले जाते.  जेव्हा वनस्पतीची पाण्याची गरज पुर्ण होते तेव्हा वनस्पती कडून सोडले जाणारे रसायने आपोआप थांबतात व लॅटरल मधून सोडले जाणारे पाण्याचा पुरवठा देखील आपोआप बंद होतो.

म्हणजेच पिकाच्या पाण्याची जेवढी गरज तेवढीच पाणी या ड्रीप यंत्रणे द्वारे दिले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर अबू धाबी येथील शेतकरी वाळवंटी प्रदेशातस्थानिक भाजीपाल्यांच्या उत्पादनासाठी करत आहेत.पारंपारिक ठिबक पद्धतीपेक्षा या मध्ये 50 टक्के अधिक पाण्याची बचत होत असल्याचा दावा तेथील शेतकऱ्यांनी केला आहे.

( स्त्रोत- ॲग्रोवन )

English Summary: grow stream technology is very crucial and important for water management of crop
Published on: 19 March 2022, 08:03 IST