Horticulture

मोठ्या शहर भागांत किंवा शहर जवळपास शेती असणाऱ्या शेतकरी मित्रांसाठी निशिगंधा (रजनीगंधा) ही फुलशेती रोज उत्पन्न देणारी ठरते...!

Updated on 10 October, 2021 6:42 PM IST

आता संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्यावर निशिगंधा (रजनीगंधा) या फुलशेती ला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.

मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार या फुलांची बाजारपेठ सध्याघडीला अतिशय उच्च मागणी मध्ये आहे.

या फुलांना फुल बाजारपेठ मध्ये दररोज मागणी असते.

तरीही आज घडीला या पिकाची फुलशेती ही आर्थिकदृष्ट्या अतिशय परवडण्यासारखी आहे.

 

निशिगंध लागवडीचे नियोजन

लागवड केल्यापासून निशिगंधा (रजनीगंधा) हे पीक २ ते ३ वर्षे त्याच जमिनीमध्ये असते. त्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.

नवीन लागवडीचे नियोजन - या फुलशेती ची लागवड आपण बारमाही पाण्याची सुविधा असल्यास कधीपण करू शकता..!

लागवडीची पद्धत

गादी वाफे : आकार ९० सेंमी रुंदी, ४५ सेंमी उंची ठेवावी.

सरी  दोन रोपांमधील अंतर ३० बाय ३० सेंमी ठेवावे.

 

खत व्यवस्थापन

हेक्टरी ४० ते ५० टन शेणखत जमिनीत मिसळावे.

हेक्टरी २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद, २०० किलो पालाश तीन हप्यामध्ये (लागवडीच्या वेळी, लागवडीच्या ४५ दिवसानंतर व लागवडीच्या ९० दिवसानंतर) द्यावे.

 

जाती

सिंगल (पाकळ्यांचा एक थर)

सिंगल प्रकारच्या जातींची लागवड ही सुट्टी फुले तसेच फुलदांडे उत्पादनासाठी केली जाते.

या प्रकारात अर्का प्रज्वल, अर्का निरंतर, फुले रजनी, सुवासिनी, बिदान रजनी, पुणे लोकल या जाती उपलब्ध आहेत.

डबल (पाकळ्यांचा एकापेक्षा जास्त थर)

डबल प्रकारच्या जातींची लागवड ही फुलदांड्यांच्या उत्पादनासाठी घेतली जाते.

या प्रकारात वैभव, फुले रजत, अर्का शृंगार, पुणे डबल या जाती उपलब्ध आहेत.

 

कंद प्रक्रिया

लागवडीपूर्वी ३० ग्रॅम वजनाचे कंद कार्बेन्डाझिमच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात २ ग्रॅम) २० मिनिटे ठेवावेत. त्यानंतर लागवड करावी.

 

आच्छादन आणि ठिबक सिंचनावर लागवड

या पद्धतीचा वापर केल्याने मजुरीचा खर्च तसेच पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनातून पिकाच्या गरजेनुसार काटेकोर पद्धतीने पाणी आणि गरजेनुसार खतांची मात्रा देता येते.

लागवड करताना गादी वाफ्यांची रुंदी १.२ मी, उंची ३० ते ४० सेंमी तर लांबी गरजेनुसार ठेवावी. दोन वाफांमध्ये ५० ते ६० सेंमी अंतर ठेवावे. या जागेचा वापर फुले तोडणी तसेच आंतरमशागतीची कामे करण्यासाठी होतो. तसेच दुसऱ्या वर्षी जास्त दाटी होत नाही. झाडांमध्ये हवा खेळती राहून फुलांचे उत्पादन चांगले मिळते.

झाडांची वाढ झाल्यानंतर मुख्य कंदाच्या बाजूने फुटवे निघण्यास सुरवात होते, तेव्हा मल्चिंग पेपरचे छिद्र मोठे करावे.

साधारणपणे एका वाफ्यावर कंदाच्या दोन ओळी लावाव्यात. यामध्ये २ किंवा १ ड्रीपचे लॅटरल पाईप वापरता येतात.

 

जुन्या लागवडीचे व्यवस्थापन

एक वर्षापेक्षा जुन्या निशिगंध लागवडीची योग्य काळजी घ्यावी.

उन्हाळा असल्यामुळे पाणी देणे चालू ठेवावे.

जुनी मेलेली, सुकलेली पाने काढून टाकावीत. फुले संपलेले आणि वाळलेले फुलांचे दांडे कापून टाकावेत.

खतांचे प्रमाण कमी करावे. पाऊस सुरू होण्यापूर्वी सरी किंवा वाफे स्वच्छ करून माती भरणी करावी. शक्य असल्यास शेणखत मिसळून नंतरच माती भरावी.

 

कंद काढणी

कंद पूर्णपणे तयार झाल्यानंतर पाने सुकतात. अशावेळी पाणी देणे थांबवावे, एक आठवड्याने कंद काढण्यास सुरवात करावी

कंद काढतेवेळी त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.काढलेल्या कंदाची लगेच लागवड करू नये. काढणीनंतर किमान १० ते १५ दिवस कंद सावलीत सुकवावेत.

लागवडी पूर्वी कंदांना कार्बेन्डाझिम (१० लिटर पाण्यात २ ग्रॅम)ची बेणे प्रक्रिया करावी. नंतरच लागवडीसाठी वापर करावा.

 

निशिगंधा (रजनीगंधा) पिकाचे लागवडीसाठी संपर्क साधावा

9665918637, 8788504180

 

English Summary: Golden opportunity for income in floriculture cultivation
Published on: 10 October 2021, 06:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)