बऱ्याचदा जेव्हा पीक उगवून येते तेव्हा ते बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे उगवलेले दिसते. झाडू करून पाहिले तर त्याची मुळे कुजलेले दिसतात. या सर्व समस्या या मातीमधील बुरशीमुळे असू शकतात. त्यामुळे विविध माती व बीजजणित बुरशीरोगांची ओळख व प्रतिबंधक उपायांची माहिती असणे गरजेचे आहे.
थोडक्यात बुरशीच्या प्रसार या विषयी माहिती
मातीमध्ये हजारो प्रकारच्या बुरशी,जिवाणू, विषाणू,निमटोड्सअसतात.त्या आपली संख्या वाढवण्यासाठी बुरशी पिकाच्या मुळांवर वाढत असतात.जेव्हा त्या मुळातून शिरकाव करतात. त्यावेळी झाडाच्या वरील भागाचा अन्नद्रव्य पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. झाडाची वाढ खुंटते व झाड वाळते.विल्ट,शेंडा वाढणे,खोडकुज मुळकुज अशी लक्षणे दिसतात. यास अनेक गोष्टी जसे फायटोप्थोरा, पायथियम, रायझोक्टिनाकारणीभूत असतात. पिकानुसार बुरशीचा प्रकार बदलतो. आपण सर्व साधारण एकत्रित आढावा घेतोय. या रोगांचे बीजाणू पालापाचोळा,बियातसेच यजमान तनावर सुप्तावस्थेत असतात. हेवी जानू अनेक महिने जमिनीत किंवा जिथे असतील तिथे महिनोन महिने टिकून राहू शकतात. जेव्हा तिथे अनुकूल वातावरण तयार होते तेव्हाच ते आपला प्रभाव दाखवतात.परिणामी पीक कमी होते व उत्पादनात घट येते.
प्रतिबंध व नियंत्रण
- द्विदल वर्गातील पिके घेत असाल तर एकदलिय पिकासोबत फेरपालट करावी.
- एकच पीक एकसारखी घेऊ नये.
- उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करून जमीन तापू द्यावी. जेणेकरून बुरशीचे बीजाणू तापमानात निष्क्रिय होतील.
- भरखतामध्ये मध्ये चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्यामध्ये निंबोळी पेंडीचा देखील समावेश असावा.
- रोगमुक्त बियाणे तसेच रोग प्रतिकारक्षम वानांना प्राधान्य द्यावे.
- पेरणी आधी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकानेबीज प्रक्रिया करावी. त्यामुळे मुळात इतर कोणत्याही उपद्रवी बुरशीची वाढ होणार नाही.
- ट्रायकोडर्मा उपलब्ध नसल्यास थायरम किंवा कॅप्टन अशा रासायनिक बुरशीनाशकांचा आधार घ्यावा.
- गोमूत्र व जीवामृत हे उत्तम बुरशीनाशक आहेत. त्यांचे आळवणी केल्यास मर/ कूज रोग नियंत्रण चांगल्या पद्धतीने होते.
- तरीसुद्धा मातीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास कार्बनडेंझिम, कार्बोक्सिन, यासारखे बुरशीनाशके वापरावी.
- कोणतीही रासायनिक बुरशीनाशके वापरतांना लेबल क्लेम नक्की तपासून घ्यावा.
Published on: 03 March 2022, 01:46 IST