डाळिंब या पिकाची लागवड महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये करण्यात आली आहे.विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मागील काही वर्षांपासून डाळिंबावर तेल्या आणि मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बर्याच शेतकर्यांनी डाळींब बाग काढून टाकले. या लेखात आपण डाळिंब फळबागा वरील मर रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कशा पद्धतीने व्यवस्थापन करावे, याबद्दल माहिती घेऊ.
डाळिंब फळा पिकावरील मर रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व्यवस्थापन
1-लागवड शक्यतो गादीवाफ्यावर करावी.त्यामुळे डाळिंबाच्या मुळांना हवेचा पुरवठा व्यवस्थित रित्या होईल.
2- डाळिंब लागवड करता वापरण्यात येणारे माती व इतर मिश्रणहे सौर निर्जंतुक करून घ्यावी. त्यामुळे त्यावरील बुरशी,कीटक आणि सूत्रकृमी यांचा नायनाट होईल.
3- सौर निर्जंतुकीकरण करण्याकरता 50 ते 75 मायक्रॉन जाडीचा एल एल डी पी ईप्रकारचा प्लास्टिक पेपर वापरावा. जमीन व्यवस्थित ओली करून त्यावर कडक उन्हाच्या दिवसांमध्ये पूर्णपणे अंथरूण चोहोबाजूंनी हवाबंद करून सहा आठवड्याकरिता तसाच ठेवावा, त्यानंतर लागवड करावी.
मर रोगास प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उत्कृष्ट प्रकारच्या जैविक मिश्रणाचा ( ॲस्परजिलसनायजर एएन 27 ( एक किलो प्रती एकर) आणि मायकोरायझा रायझोकेगसइरेगुलेसग्लोमसइरेगुलॅरिस( 1 ते 5 किलो प्रती एकर ),ट्रायकोडर्मा हरजियानम,सुडोमोनस स्पे.इत्यादींचा वापर रोपांची लागवड केल्यापासून दर सहा महिन्यांच्या अंतराने करत राहावा.
5- पावसाळ्यामध्ये हिरवळीच्या खतांची म्हणजेच धैचाआणि ताग यांची पेरणी करून फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडावे.
6- माती परीक्षण अहवालानुसार झाडांना बोरॉनखताची मात्रा द्यावी.
7- रोगग्रस्त बागेची पाहणी केल्यानंतर तर व ग्रस्त झाड व सुदृढ झाड यांच्यामध्ये तीन ते चार फूट लांबीचा चर खोदावा. त्याचबरोबर काही प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त झाडांना लेखात नमूद केल्याप्रमाणे रासायनिक उपचार पद्धतीचा अवलंब करावा.
जर झाड 25 टक्क्यांहून अधिक किंवा पूर्णपणे सुकून गेली असल्यास ते झाड काळजीपूर्वक मुळासकट उपसून काढून बागे पासून दूर अंतरावर नेऊन नष्ट करावे. अशी झाडे बागे जवळील परिसरात साठवून किंवा ढीग लावून ठेवू नये.
9-प्रादुर्भाव ग्रस्त झाड काढत असताना त्याच्यामुळे जवळील माती तसेच मुळाचे अवशेष बागेमध्ये इतरत्र पसरू नये त्यासाठी व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून बागेबाहेर टाकावे. त्यामुळे मर रोगाचा प्रसार अन्य झाडांना होणार नाही.
10- म रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच पटकन मुख्य कुडाच्या चोहोबाजूंनी मूळ असणाऱ्या भागांमध्ये तातडीने ड्रेचिंग करावे. त्याचबरोबर रोगग्रस्त झाडाच्या चोहो बाजूंची चार ते पाच झाडांना सुद्धा रसायनांचे प्रतिबंधात्मक ड्रेंचिंग करावे.
11- प्रादुर्भावग्रस्त झाडांना योग्य त्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा उपचार करावा. प्रादुर्भावग्रस्त झाड 25 टक्क्यांहून अधिक वाळून गेले असल्यास अशा झाडांना मुळासकट उपटून नष्ट करणे सोयीचे ठरते.
Published on: 04 December 2021, 03:28 IST