Horticulture

मोसंबीची फळगळ यामागे सगळ्यात महत्वाचे कारण हेअन्नद्रव्यांचे असंतुलन हे असते.त्या दृष्टीने हा मोसंबीची फळगळ थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. या लेखात आपण मोसंबी फळ पिकातील फळगड आणि उपाय योजना याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 06 December, 2021 5:20 PM IST

 मोसंबीची फळगळ यामागे सगळ्यात महत्वाचे कारण हेअन्नद्रव्यांचे असंतुलन हे असते.त्या दृष्टीने हा मोसंबीची फळगळ थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. या लेखात आपण मोसंबी फळ पिकातील फळगड आणि उपाय योजना याबद्दल माहितीघेऊ.

मोसंबी पिकातील फळगड

  • यामागे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे मोसंबीच्या एका फळाच्या पूर्ण वाढ होण्यासाठीजवळ जवळ चाळीस पानांची गरज असते.बहराच्या प्राथमिक अवस्थेत पाणी विरहित फांद्यांवर काही फळे पोसले जातात.अशा फळांची वाढ मंद गतीने होऊन ती कमकुवत राहतात.झाड सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी फळ तोडणीनंतरवाळलेल्याफांद्यांची छाटणी करावी.
  • फळांच्या वाढीसाठी प्रमुख यांनी कार्बन आणि नत्राचे संतुलन आवश्यक असतो.नत्रामुळे पेशीक्षय क्रिया कमी होते. पानांमधील एकूण नत्रापैकी अमोनियम या संयुगाचे मात्रा फळाच्या निरोगी वाढीसाठी पोषक असते.युरियाची दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी( एक टक्का)या प्रमाणात फवारणी केल्याने हे मात्रा वाढवता येते.
  • कर्बोदकांचे प्रमाण- फळ वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कर्बोदकांच्या भरपूर उपलब्धतेमुळेपेशीभित्तिका सशक्त होते. बीजांडाच्या आवरण त्यामुळे टणक होऊन भ्रूणाच्या वाढीला मदत होते. अशा वाढलेल्या भ्रूणातून ऑक्सिन संजीवकाचा स्त्राव सुरू होऊन पेशीक्षय टळू शकतो.
  • जमिनीतील आर्द्रता- बागेतील सर्व झाडांना आवश्यक तेवढे सिंचन दिल्यास फळ गळतीस आळा बसतो.पाण्याच्या कमतरतेमुळे फळांचा सुरुवातीच्या वाढीवरअनिष्ट परिणाम होतो.फळात त्वरित पेशी क्षय होण्यास सुरुवातहोते.
  • तापमान-फळ वाढीच्या सुरुवातीच्या काळात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या वर असेलआणि पाणी व्यवस्थापन योग्य नसल्यास फळगळ होते. उच्च तापमान आणि पाण्याचा ताण यामुळे झाडांच्या पानांची पर्णछिद्रेबंद होता.परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.वाढीच्या अवस्थेतील फळांना कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो.त्यामुळे फळगळ होते.

 यावर उपाय आणि नियंत्रण

  • फळगळीच्या नियंत्रणासाठी संजीवकांचा वापर करण्यात येतो.उदा. एनएए,जिब्रेलिक एसिड.संजीवकामूळे वनस्पतीमधील ऑक्सिनचे प्रमाण वाढून पेशीक्षय कमी होतो.
  • नैसर्गिक फळगळ फायद्याची असली तरी वातावरणातील बदलांमुळे होणारी फळगळ थांबवणे आवश्यक असतात. त्यासाठी आंबिया बहराची फळधारणा झाल्यानंतर मे आणि जून महिन्यात एनएए 15 पीपीएमकिंवा  जिब्रेलिक एसिड 20 पीपीएम( 20 मिलीग्राम प्रति लिटर पाणी )अशा फवारण्या कराव्यात.किंवा कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक युरिया एक टक्का( दहा ग्रॅम प्रति लिटर) या मिश्रणाची एक फवारणी करावी.यांच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फळे तोडण्या पूर्वी कराव्यात. ( संदर्भ- ॲग्रोवन)
English Summary: fruit dropping of lemon orcherd reason and treatment and technique
Published on: 06 December 2021, 05:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)