जर आपण फळगळीची समस्या पाहिली तर ही प्रमुख्याने मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जेव्हापासून झाडाला फळधारणा होते तेव्हापासून ते फळ काढणीचा कालावधी पर्यंत अनेक कारणांमुळे फळगळीची समस्या निर्माण होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी फळगळ अधिक तीव्र स्वरूपाचे असते व जास्त नुकसानकारक ठरू शकते.
कारण या कालावधीमध्ये फळे मोठ्या आकाराची झालेले असतात. यासाठी अनेक नैसर्गिक कारणे तसेच, विविध प्रकारचे रोग व फळमाशी तसेच रसशोषण करणाऱ्या पतंगामुळे अर्धी कच्ची फळे पिवळी पडतात व गळून पडतात.
परंतु काही विशिष्ट कालखंडामध्ये ही समस्या फार तीव्र स्वरूप धारण करते. ही समस्या मोसंबी बागेत देखील दिसून येते. या लेखात आपण मोसंबी बागेतील फूल आणि फळगळ का होते याचे कारणे पाहू.
मोसंबी बागेतील फुले आणि फळगळीची कारणे
1- फळ झाडावर जेव्हा फुलांची निर्मिती होते त्यानंतर ती उमलत असताना गळ होते.
2- तसेच पंधरा ते पंचवीस दिवसानंतर दुसरी फुलगळ होते. फळधारणा झालेनंतर लहान फळेदेखील गळून पडतात.
3- बोराच्या आकाराचे व त्यापेक्षा मोठी झाल्यानंतर पक्व होईपर्यंत वाढ झालेली फळेदेखील गळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असते.
4- बऱ्याचदा वाढ झालेल्या फळांमध्ये इथीलीन तयार झाल्यामुळे फळगळीची समस्या उद्भवते.त्यासोबतच रोगग्रस्त झाडे,किडींचा प्रादुर्भाव किंवा दुखापत झालेली व अधिक वयाची झाडे देखील याला बळी पडतात.
5- तसेच कर्ब आणि नत्र यामधील गुणोत्तर यामध्ये असंतुलन झाल्यामुळे देखील ही समस्या उद्भवते.
6- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता राहिली तर पोषक तत्वे योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे देखील झाडाची उपासमार होते व फळगळीची समस्या निर्माण होते.
7- बऱ्याचदा काही कारणास्तव जर पाण्याचा ताण पडला किंवा पाणी जास्त प्रमाणात दिले गेले तरीसुद्धा ही समस्या उद्भवते.
8- बऱ्याचदा तापमानामध्ये अचानक बदल होतो व याचा परिणाम फळांची गळ होण्यावर होतो.
9-पाणी व्यवस्थापन जरी चुकले तरी सुद्धा ही समस्या उद्भवते. बऱ्याचदा कमी किंवा अधिक पाण्यामुळे फळझाडांना ताण बसतो व गळ होते. त्यामुळे संतुलित पद्धतीने पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
10- जर आपण मोसंबी पिकांमधील आंबिया बहराची फळगळ होण्याचा विचार केला तर रसशोषण करणाऱ्या पतंगा मुळे ही फळगळ होत असते. या किडीचे प्रौढ पतंग संध्याकाळी सात ते नऊ या वेळ दरम्यान फळावर बसून सोंड फळांमध्ये खूपसतात व रस शोषण करतात व त्यामुळे गळ होते.
नक्की वाचा:आता सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान; असा घ्या लाभ
Published on: 24 October 2022, 04:35 IST