नमस्कार शेतकरी बांधवांनो
संत्रा फळझाडावर विशिष्ट वेळी बहार येण्याकरीता बहाराच्या पूर्वी बहार टिकविण्याकरीता नंतरची परिस्थिती कारणीभूत असते. हवामानाचा विचार केल्यास संत्रा झाडाला 3 वेळा बहार येतो. परंतु विदर्भात मुख्यतः दोन बहार घेण्यात
1) आंबिया बहार
२) मृग बहार
मृग बहारात साधारणतः जुन-जुलै तर आंबिया बहारात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये फळ धारण होते. फुलधारणे पासुन चा कालावधी साधारणत १३ महिन्याचा असतो. संत्र्यामध्ये अंदाजे ६० प्रतिशत फुले आंबिया बहारात झाडावर येतात. अंदाजे ३० प्रतिशत फुलेमृग बहारात येतात आणि बाकीची २० प्रतिशत फुले सप्टेंबर ऑक्टोबर काळात हस्त बहारात येताता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात केलेल्या अभ्यासात असे दिसुन आले की आंबिया बहारात एका झाडावर सरासरी ३० हजार कुलांपैकी ७८ प्रतिशत फुलांची फळधारणा झाली व त्या पैकी शेवटपर्यंत फक्त ४ टके टिकून राहीली. या उलट मृग बाहरात आलेल्या १५ हजार कुलांपैकी ६ प्रतिशत फुलांची फळधारणा झाली त्यापैकी ५ ते ५.५ टक्के फळ टिकुन राहिली. यावरून असे दिसुन येते की, आंबिया बहरात जरी मृग बहारात पेक्षा दुप्पट फुले येत असली तरी शेवटी फारच कमी फळे झाडावर टिकून राहतात. संत्रा फळांची गळ विविध कारणांमुळे होते. त्यामध्ये मुख्यतः नैसर्गिक करणांमुळे पाण्याची कमतरता, किडी व रोग, मुलद्रव्याची कमतरता, अॅबसीशस रेषा तयार होणे इ. कारणामुळे फळगळ होते.
नैसर्गिक फळगळ
आंबिया बहारात फेब्रुवारी-मार्च महिन्यात फळ धारणा झाल्यानंतर उष्णता मानात एकदम वाढ होते. हे एक प्रमुख कारण आहे. शिवाय दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात या काळात जास्त फरक असल्यामुळे फळांची गळ जास्त होते. संत्र्याच्या झाडावर नैसर्गिक पणे आवश्यकते पेक्षा जास्त फुले येत असतात व फळे टिकून राहण्याकरीता त्यांच्या स्पर्धा निर्माण होते आणि जेवढी फळांना झाडावर पोसण्याची क्षमता त्या झाडात असते तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात. त्यामुळे नैसर्गिक रित्याच फुलांची व फळांची गळ होत असते
वातावरणाचा परिणाम
संत्र्या मध्ये तापमान, आर्द्रता आणि वारा या गोष्टी कारणीभूत ठरतात मागील काही वर्षात एप्रिल महिन्यात आंबिया बहाराच्या फळांची तापमानात झालेल्या बदलामुळे खुप मोठ्या प्रमाणात गळ झाली. तापमानात वाढ झाल्यास विशेषता कच्च्या फळाची गळफार मोठ्या प्रमाणात होते. तापमाना सोबतच हवेतील कमी आद्रता सुद्धा कारणीभूत असते. फेब्रुवारी मार्च महिन्यात तापमानात होणाऱ्या वाढीमुळे आबिया बहाराची गळ नेहमीच दिसुन येते.
अनियमित पाणी पुरवठा
फळधारणा झाल्यानंतर पाण्याचा ताण बसला तर फळांची गळ होते. विशेषतः मृग बहारात फळधारणा झाल्यानंतर पावसाने दांडी मारल्यास फळगळ होण्यास सुरुवात होते तसेच जमिनीत प्रमाणापेक्षा पाणी जास्त झाल्याही फळगळ होऊ शकते.
बागेचे व्यवस्थापन
संत्रा बागेत पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्यास फळाची गळ होते. त्याप्रमाणे आवश्यकते पेक्षा जास्त प्रमाणात तसेच चुकीच्या पद्धतीने खोडाला लागेल असे ओलित केल्यास ही होते. बऱ्याच संत्रा बागेत सल काढण्यात येत नाही. परंतु सल न काढल्यास त्यावर बुरशीची वाढ होऊन फळगळ होते. तसेच फळे काढल्यानंतर सुद्धा फळांची सळ लवकर होते.
अन्नद्रव्यांची कमतरता
काही बागांमध्ये फळ धारण चांगली होऊन सुध्दा फळाची गळ झाल्यामुळे खुप कमी फळे झाडावर शिक्षक राहतात व फळांची प्रत चांगली राहत नाही. जमिनीत मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अत्रद्रव्याच्या कमतरतेमुळे फळांचे योग्य पोषण झाड करू शकते, तेवढीच फळे झाडावर टिकुन राहताता जमिनीत जस्ताचे प्रमाण कमी असल्यास मोठ्या प्रमाणात होते.
नक्की वाचा:संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे व उपाय योजना
किडी व रोग
काही किडी रोगामुळेखुप मोठ्या प्रमाणात फळगळ आढळून येते. आंबिया बहाराची फळे, रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात गळतात. ही फळेदाबुन पाहल्यास त्याला छोटेछिद्र पडलेले असते. त्यातुन रसाची चिरकांडी उडते. काही रोगकारक बुरशी उदा. फायटोथ्योरा,कोलोटोट्रीकम अल्टरनेरीया या बुरशी फळगळीस कारणीभूत ठरतात.जुलै ऑगस्ट महिन्यात मृग बहाराच्या फळाची गळ होते. सतत पाऊस सुरु असल्यास मृग बहाराची फळेकाळी करडी पडून मोठ्या प्रमाणात गळताना दिसून येतात. ही गळ मुख्यतः फायटोप्थोरा बुरशीमुळे होते.
वाटाणा ते बोराच्या आकाराची फळे देठावरील प्रादुर्भावामुळे गळतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मृग बहाराच्या फळावर कोलोट्रोट्रीकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे देठा जवळ काळा डाग पहुन फळगळ होते. अल्टरनेरीया बुरशीची फुलांच्या बिजांडावर लागण होते फळ काढणीच्या अवस्थेत आल्यावर फळाची गळ होते लागण झालेल्या फळाचे दोन भाग केल्यास मधात फोडी जवळ काळा पट्टा आढळतो.
अॅबसीशन रेषा
काही वेळा फळांना चांगला भाव मिळावा म्हणून अधिक काळपर्यंत फळबागेमध्ये फळेराखून ठेवल्या जातात, अशा वेळी फळाच्या देठा जवळ अॅबसीशन रेषा तयार होऊन फळगळ होते. एखादेवेळी मात्र ही रेषा झाडातील संजिवके, जिब्रेलीन, ऑक्झीन यांच्या प्रमाणात अनियमितता आल्यामुळे गळ होते. ही गळ मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आणू शकते. ही गळ वेळीच उपाय योजना करून थांबविणे आवश्यक असते.
संत्रा फळगळ कमी करण्याकरीता करावयाची
उपाय योजना
(१) शिफारशी प्रमाणे खताची (सेंद्रीय व रासायनिक) मात्र योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावी. नत्राची अर्धी मात्र पहिलेपाणी देण्याचे वेळी द्यावी व अर्धी फळे वाटण्या एवढी झाल्यावर द्यावी. खते हे रिंग पद्धतीनेच द्यावीत.
एकात्मीक खत व्यवस्थापन
२) पाण्याच्या पाळ्या ८ ते १२ दिवसाचे अंतराने द्यावे
|प्रमाणात दुहेरी रिंग पद्धतीने द्यावात पाणी टंचाई असल्यास उभ्या आडव्या दांड पद्धतीने किंवा अर्थ आहे पद्धतीने द्यावे ठिबक सिंचनाची सोय असल्यास अधिक चांगले.
३) पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा होण्याची काळजी घ्यावी. मुख्यात : ऑगस्ट-सप्टेंबर, महिन्यात बागेत पाणी साचून राहत असल्यास दोन किंवा तीन ओळीत एकया प्रमाणात उथळ चर काढुन पाणी बागेच्या बाहेर काढावे.
४) बागेच्या भावती दक्षिण व पश्चिम दिशेस वारा प्रतिबंधक झाडे लावावीत. उदा. हेटा, शेवरा, कॅझुरीना इ.
५) झाडावरील सल नियमित काढावे.
६) दोन्ही बहरात फळे वाटाण्या एवढी झाल्यानंतर १ ग्रॅम एन.ए.ए. किंवा १ ग्रॅम जिब्रेलीक अॅसीड आधी अल्कोहोल मध्ये विरघळवून १०० लि. पाण्यात मिसळावे त्यात एक किलो युरीया मिसळावा, याच प्रकारच्या दोन फवारण्या ४० दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. पावसाळ्यात फवारणी करताना
याच द्रावणात कार्बेन्डीझम (बाव्हिस्टीन) हे बुरशीनाशक १ ग्रॅम प्रती लि. पाणी या प्रमाणात मिसळावे.मृग बहाराची फळे पावसाळ्यात काळी / करडी होऊन गळत असल्यास ऑलिएट हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
(८) फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव सप्टें ऑक्टो आणि जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान आढळतो. यासाठी बागेच्या परिसरातील अळीच्या खाद्य तणांचा नाश केल्यास पतंगाचा उपद्रव कमी होण्यास मदत होते. तसेच बागेत रात्री धुर केल्यास पतंगांना फळापासुन पळतुन लावता येते. खाली पडलेली फळेरोज उचलुन खड्डयात पुरुन टाकावीत. पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतात.
त्यामुळे पसरट भांड्यात केरोसीन मिश्रीत पाणी घेऊन त्यावर विद्युत बल्बचे सापळे पाण्यात किंवा संत्र्याच्या रसात किटकनाशकाची आमिष तयार करुन मोठ्या तोंडाच्या उथळ डब्यात झाडावर लटकविल्यास प्रादुर्भाव कमी होतो....
धन्यवाद
डॉ. अतुल पी. फुसे
विषय विशेषज्ञ (उद्यान विद्या) कृषि विज्ञान केंद्र, घातखेड, ता. जि. अमरावती1
माहीती यांच्या मार्गदर्शनानुसार
*Save the soil all together*
माहिती संकलन
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
Published on: 24 April 2022, 09:18 IST